भिक्षां देहि च पार्वति
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥
जगदगुरु शंकराचायांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रातील हे शेवटची दोन कडवी. शेवटून का सुरुवात केली असा प्रश्न पडणे साहजिक आहे . बाकीच्या १० कडव्यांमध्ये देवीच्या स्वरूपाचं आणि गुणांचं वर्णन केलं आहे. पण शेवटची दोन कडवी फारच सुंदर आहेत कारण ह्या मध्ये देवीकडे स्वतःच्या उन्नतीसाठी मागणं आणि समाजासाठी आपला काय भाव असावा हे खूप छान पद्धतीने सांगितलं आहे .
त्यावर विवरण करण्याआधी थोडसं अन्नपूर्णा ह्या देवीबद्दल जाणून घेऊ. अन्नपूर्णा हे देवी पार्वतीचं संपूर्ण विश्वाचं पालनपोषण करणारं स्वरूप आहे . भिक्षुक स्वरूपात आलेल्या महादेवाला अन्नदान देते आहे अशा स्वरूपात हि देवी सहसा दाखविली जाते. जस की लेपाक्षी मधील एक शिल्पात दाखवले आहे
पण हे शिल्प पार्वती अन्नपूर्णा कशी झाली ह्याची गोष्ट सुद्धा सांगते - महादेव एकदा भिक्षुकाचं स्वरूप घेऊन पार्वती समोर प्रकट होतात आणि तिच्याकडे भिक्षा मागतात . पार्वती अन्नदान देण्याचा संकल्प घेते आणि भिक्षुकाला अन्नदान देण्यासाठी येते. तेवढ्यात तिची परीक्षा घेण्यासाठी आलेले महादेव तिचे वस्त्र खेचतात. शिल्पामध्ये पार्वतीचं वस्त्र खाली पडताना दाखवलं आहे. पण भिक्षुकाच्या ह्या उदंडपनाची पर्वा न करता आपण घेतलेला संकल्प पूर्ण करणे महत्वाच आहे हे जाणून ती भिक्षुकाला अन्नदान देते . तिच्या ह्या संकल्पनिष्ठेवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होतात आणि पार्वती अन्नपूर्णा म्हणून ओळखली जाईल असा वर तिला जातात .
आता विचार करूयात
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति
ह्या ओळीचा. समजामध्ये भिकाऱ्याला जास्त सन्मान मिळत नाही, इतका धडधाकट असूनसुद्धा कष्ट करून स्वतःचं अन्न मिळवायचं सोडून फुकटचं भीक मागून खातोय असा विचार त्यांच्या बाबतीत केला जातो . पण जर एखादि धार्मिक व्यक्ती , धर्मपाठ करणारा विद्यार्थी , साधू किंवा संत भिक्षा मागायला आला तर त्याला हे निकष लावले जात नाहीत. हेटाळणी होत नाही उलट त्याला पूज्य मानले जाते. कारण त्यांचे भिक्षा मागण्यामागील भाव वेगळे आहेत. जेंव्हा एखादी धार्मिक व्यक्ती भिक्षा मागते तेंव्हा त्याने/तिने स्वाभिमान/अहंकार त्यागून निर्मल मानाने हात पसरलेले असतात . त्याला कुठल्याही गोष्टीचा लोभ नसतो, ज्ञान-संपादन आणि वैराग्य प्राप्तीसाठी जिवंत राहण्यासाठी जितकं अन्न गरजेचं आहे तितकंच भिक्षा स्वरूपात मिळवावं हा त्याचा उद्देश असतो. म्हणून तो पूज्य मानला जातो. आणि असेच निकष भिक्षा/दान देणाऱ्यालासुद्धा लावता येतील. भिक्षा/दान देताना कुठलीही अपेक्षा ना ठेवता जर दान दिले तर ते पुण्यकर्म मानले जाते. पण दान करताना त्यातून काही फायदा घ्यायचा उद्देश असेल , जसकी काही काम त्या व्यक्ती कडून करून घेणं, तर ते दान राहत नाही, व्यापार होतो . म्हणजे दिवाळी-मध्ये मोलकरणीला फराळ द्यायचा आणि त्याबदल्यात तिच्याकडून जास्त काम करून घ्यायचा. किंवा केलेल्या दानधर्मातून प्रसिद्धी मिळवायच्या हेतुने त्याचा गाजावाजा करायचा. जर दान देनाऱ्याचा उद्देश पवित्र नसेल तर तो सुद्धा भिकारी ठरतो. ह्या देवाणघेवाणीच्या समीकरणातून लोभ, अहंकार वजा केले तर कृतज्ञ भावाने घेणारी व्यक्ती मदेवासारखी पुज्य होते आणि सेवाभावाने देणारी व्यक्ती पार्वती सारखी महान होते.
अन्नदानाला श्रेष्ठ दान मानण्यात आलं आहे, कारण उपाशी पोटाला तत्वज्ञान , पाप-पुण्य , धर्म-अधर्म ह्या गोष्टी पचत नाहीत. स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या पोटाची आग माणसाला गुन्हेगार बनन्यास भाग पाडू शकते. समाज आपली काळजी करत नाही असा भाव उत्पन्न होऊ शकतो आणि मग अराजकता माजू शकते . ह्या-उलट जर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न दिले किंवा गरजवंताला मदत केली तर त्याच्यामध्ये कृतज्ञता जागरूक होईल आणि तो त्याची परतफेड पुढे दुसर्या कुणाला तरी मदत देऊन करेल. कदाचित असच काहीतरी शेवटच्या ओळीतून सुचवायचं असेल
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥
सर्व शिवभक्त माझे बांधव आहेत आणि माझा देश तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे - धार्मिक माणसामध्ये समाजप्रती बंधुभाव असणे गरजेचं आहे आणि त्याला देशाचा अहित होईल असल्या कुठलल्याही कार्यात सहभागी होता नाही येणार कारण समाजाला किंवा देशवासीयांना दुखवणं हे प्रत्यक्ष महादेवाला दुखावन्यासारखं आहे असा त्याचा मतितार्थ असेल.
इतका सगळा अर्थ त्या चार आळींअध्ये दडला आहे. पूर्ण स्तोत्र आणि त्याचा अर्थ पुढिल लिंक वर मिळेल.
https://greenmesg.org/stotras/annapoorna/annapoorna_stotram.php
आणि मला आवडलेलं युट्युबवरील त्याचं गीत
https://www.youtube.com/watch?v=qx1JyoP5W5c
दक्षिण भारतात अन्नपूर्णेची बरिच मंदिरे आहेत. बाळाच्या अन्नप्राशनाचा कार्यक्रम ह्या मंदिरांमध्ये केला जातो. देवीची विधिवत पूजा करुन, बालासाठी बनवलेले अन्न देवीला नैवद्य दाखवले जाते. मग गाभर्याच्या उंबरठ्यावर बाळाला ठेवून, सोन्याच्या अंगठी त्या अन्नात बुडवून , ते बाळाला चोखवले जाते.
जाता जाता मी पाहिलेली अन्नपूर्णेची सर्वात सुंदर मुर्ती- दारसुरम येथील ऐरावतेश्वर मंदिरातील.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chabidar Chabi | Girlz | Praful-Swapnil | Sagar Das | Naren Kumar | Vishal Devrukhkar