Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कशाला हवी ही दुकानं?

B
Bhakti
Tue, 12/22/2020 - 14:49
💬 8 प्रतिसाद
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय. अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ? सामान्यांन नंतर सो ..सोफास्तीकेटेड यांचे दुकाने म्हणजे अगदीच जगमान्य प्रकारातील.आधी काहीतरी नवे म्हणून पाहायला अनुभवायला आपण जातो पण एक नंतर पुढची पायरी अधिक छान असे म्हणत म्हणत पुढे जातो..पण हे सर्व ज्ञान फुकट नाही..त्यासाठी पैसा मोजावा लागतो.मग तुम्हीपण कोणाला तरी फुकट तुमच्या दुकानातल ज्ञान वाटायला लागता वा या साखळी व्यापाराचे भाग होता.दुसऱ्याची शकले वाटत राहणे म्हणजे हिप्नोटीझिम सारखाच प्रकार वाटतो. कठीण काळ असतो तेव्हा ह्या दुकानातले सांगतात ,तो वरचा पाहून घेईल.तेव्हा अदृश्य शक्तीच साथ देणार असते तर ..कशाला ही दुकाने..ह ...मूर्त्यांचे अवडंबर झाले तर या शक्तीचा अवमान होऊ शकतो.संतानी कधी अट्टहास एला नाही,ते मार्गक्रमण करत होते.लोक त्यांना जोडले गेले. आपले शक्तिस्थान मनातच पूजावे.. ..काही अवघड काळात सेल्फ हिलिंग करावे .ते नाही जमल्यास जवळचे असतातच ना..आणि तेही नाही जमले तर मानसोपचार तज्ञाकडे जाणे हाही उपाय आहेच ना..अमका तमका दुकानवाला असे म्हणतो म्हणून अस स्वत:ला फसवण्याच पाप आहे.

प्रतिक्रिया द्या
4972 वाचन

💬 प्रतिसाद (8)
आ
आनन्दा Tue, 12/22/2020 - 16:49 नवीन
तुम्ही पण टाका एक दुकान.. हा का ना का
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 12/23/2020 - 09:10 नवीन
भारी आयडिया आहे. प्राण जाय पर शान ना जाये या सिनेमात भरत जाधवची बायको रवीना टंडन असेच "लक्ष्मीदेवी" या नावाने दुकान उघडते, बर्‍याच समस्या सुटतात. धमाल गोंधळी सिनेमा आहे. https://www.youtube.com/watch?v=r7bc4Zaufm4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
R
Rajesh188 Tue, 12/22/2020 - 21:25 नवीन
आणि चिंता वाटत असेल जगाची तर स्वतःचे आयुष्य संसार,नोकरी सोडून फक्त समाज सेवे साठी वाहून घ्या. फक्त उंटा वरून शेळ्या haku नका
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 12/22/2020 - 22:00 नवीन
Bhakti,
तेही नाही जमले तर मानसोपचार तज्ञाकडे जाणे हाही उपाय आहेच ना.
मानसोपचार हे ही एक प्रकारचं दुकानच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 12/23/2020 - 04:44 नवीन
काल टीव्हीवर कोकरे महाराज आणि त्यांच्या सातशे गायींची बातमी पहिली. खरं चांगलं काम करत आहेत, तूर्तास त्यांना मदत करणार आहे..
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 12/23/2020 - 05:45 नवीन
दुर्दैवाने दुकानातल्या मालापेक्षा दुकानातल्या झगमटाला महत्व दिले जाऊन दुकानांचे मॅाल्स झाल्याचं दिसतं हे वास्तव आहे. काही अवघड काळात सेल्फ हिलिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळण्यासाठी आणि शिकण्यासाठी दुकान हवंच! - (दर्जेदार माल असणारं दुकान शोधावं ह्या मताचा) सोकाजी
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 12/23/2020 - 07:16 नवीन
मला माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळालंय... कदाचित कोणाला हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर मिळो. एक लिहायचं राहिले.योगायोग म्हणत जगणं जेवढ छान आहे,तो प्रकार या दुकानांच ग्राहक होत पुढे जाण्यात नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 12/23/2020 - 14:49 नवीन
याची वाट पाहात असतात. . . त्यांना पुढच्या फळीवर झोपायचं असतं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा