Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मार्गशीर्ष व. ४ स्वामी श्रद्धानंद यांचा खून !

A
Ashutosh badave
Sun, 01/03/2021 - 07:16
💬 1 प्रतिसाद
आज काय घडले ... स्वामी दयानंद शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशी सुप्रसिद्ध गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणे खून झाला. स्वामींचा जन्म शके १७७८ मध्ये पंजाबांतील तळवण गांवी झाला. यांचे मूळचे नांव मुनशीराम असे होते. प्रथम हे नास्तिक होते, परंतु पुढे दयानंद सरस्वतींच्या व्याख्यानांचा परिणाम यांच्यावर होऊन हे पक्के आर्यसमाजी बनले. लाहोर येथे वकिली सुरू केल्यावर यांनी हिंदूच्या उपेक्षित भागाकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. यांचे 'सद्धर्मप्रचारक' साप्ताहिक प्रथम उर्दू लिपीत निघत असे, पण पुढे ते देवनागरी लिपीत निघू लागले. यांनी.स्त्रीशिक्षणावर एक लेखमाला लिहिली व जालंदर येथे सन १८९० मध्ये कन्याशाळा सुरू केली. विधवाविवाह व अनाथरक्षण या प्रश्नासंबंधीहि यांनी लोकांना प्रत्यक्ष कार्याची दिशा दाखविली. पुढे यांनी प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा पुरुस्कार केला व त्यासाठी हे पैसे जमवू लागले. सन १९०२ मध्ये हरिद्वारजवळ गंगा नदीच्या किनाऱ्यावर झोपड्या बांधून यांनी गुरुकुलाच्या कार्यास सुरुवातहि केली. पुढे या गुरुकुलाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याला विश्वविद्यालयाचे स्वरूप आले. त्यानंतर सन १९१७ मध्ये यांनी संन्यास घेतला. रौलट बिलाविरोधी झालेल्या चळवळीत यांनी बरेच कार्य केले. दिल्ली पोलिसांनी जमावावर बंदुका झाडण्यास सुरुवात केली तेव्हा हे निधड्या छातीने पुढे झाले व स्वतःवर निशाण धरणाच्या पोलिसांना म्हणाले, “मी हा श्रद्धानंद, चालव गोळी" अर्थातच पोलिस नरम पडले. मलबारांतल्या मोपल्यांनी हिंदूंना बाटविण्यास सुरुवात केली, तेव्हां हे तेथे धांवत गेले आणि त्यांनी अनाथांचे रक्षण केले. शेवटी दिल्ली येथील आपल्या आजारातून बरे होत असतां मार्गशीर्षे व. ४ रोजी अब्दुल रशीद नांवाच्या एका इसमाने रुग्णशय्येवर पडलेल्या या वृद्ध संन्याशास गोळी घालून ठार केले. सबंध हिंदुस्थानला जबरदस्त धक्का बसला. -२३ डिसेंबर १९२६

प्रतिक्रिया द्या
1380 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पॉइंट ब्लँक Tue, 01/05/2021 - 09:12 नवीन
चारीही लेख वाचेल. माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद __/\__
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा