Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (कृपया विकासने सुरु केलेल्या दुसर्‍या धाग्यावर प्रतिसाद देऊन सहकार्य करावे!)

व
विसोबा खेचर
Wed, 11/26/2008 - 19:14
🗣 72 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23066 वाचन

💬 प्रतिसाद (72)
य
यशोधरा Wed, 11/26/2008 - 19:29 नवीन
आत्ताच बातमी समजली.. :( फारच भयानक आणि चीड आणण्याजोगे आहे हे सगळे! मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना?
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 11/26/2008 - 19:30 नवीन
मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना? हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ध
धनंजय Wed, 11/26/2008 - 21:03 नवीन
मुंबईकर मिपावासी ठीक आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
संदीप चित्रे Wed, 11/26/2008 - 21:18 नवीन
सगळे ठीक आहेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्रियाली Wed, 11/26/2008 - 23:06 नवीन
लोकांचे देह कचर्‍यासारखे उचलून नेताना, रक्ताने वाहणार्‍या हाताला मलमपट्टी करण्याऐवजी त्यावर कॅमेरा रोखणार्‍यांना, ताज हॉटेल जळताना त्याचे रसभरीत वर्णन करताना पहावले नाही. :-( भयंकर दुर्दैवी घटना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 23:08 नवीन
सत्य परिस्थिती दाखवतानाही माध्यमांना तारतम्य बाळगायला हवे हे नक्की!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/26/2008 - 23:19 नवीन
काही कारणामुळे मला टीव्हीवर फक्त हिंदी न्यूज चॅनल्सच दिसत आहेत. अतिशय घृणास्पद कव्हरेज आणि भाषा. चीप. आता नेटवर आय.बी.एन. लोकमत आणि एन.डी.टी.व्ही दिसते आहे. खूपच बरे आहे. पूर्ण ठीक नाहीच. दहशतवादी कुलाबा कॉजवेच्या शेवटी पोचले आहेत. 'बूटलेगर्स' च्या बाहेर चकमक चालू झाली. ४ पोलिस शहीद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वाटाड्या... Wed, 11/26/2008 - 19:30 नवीन
तात्या व मिपा सदस्यांनी काळजी घ्यावी व आपापली ख्याली खुशाली कळवावी.... च्यामारी इथ जग महागाई आणि मंदी आणि कशाकशान रोज मरतय अन ह्या लोकाना दहशतवाद सुचतो...तात्यांच्या शब्दात अंमळ **** च आहेत...:) मुकुल
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/26/2008 - 19:33 नवीन
2 नायजेरीयन लोकं घुसले म्हणे एके४७ घेऊन.. आपली लोकं झोपलेली असतात काय ?? असे कसे घुसुन गोळीबार करतात? बरंच काय काय होतंय.. सीएस्टी,ताज हॉटेल च्या आसपास गोळीबार.. पार्ल्यात बाँबस्फोट.. रीगल थिएटर,ओबेरॉय हॉटेल मधे आग.. :( मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. http://idesitv.com/nepal.php इथे न्युज दिसत आहे..
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/26/2008 - 19:47 नवीन
इथे व्यवस्थीत आणि डिटेल कव्हरेज आहे ... http://www.ndtv.com/convergence/ndtv/video/video_live.aspx?id=1 मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
क
कपिल काळे Wed, 11/26/2008 - 19:37 नवीन
मुंबईकर मिपा सदस्य सुखरुप आहेत ना?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/26/2008 - 19:38 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3761446.cms हेच बघत होतो आता. :( मुंबई वासी आपली खुशाली कळवा रे. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 19:48 नवीन
अजूनही माझ्या अंगाला किंचित कंप आहे! X( फारच उद्वेगजनक घटना आहेत. (मृतांबद्दल शोक वाटतो. जखमींना लवकर आराम पडो ही प्रार्थना. अधिक कोणी बळी पडू नये ही इच्छा.) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/26/2008 - 20:13 नवीन
मुंबयवासी मिपाकरांनो, काळजी घ्या रे! प्रथम तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची सुरक्षितता जपा आणि मग तुमची खुशाली इथे कळवा... -पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कोलबेर Wed, 11/26/2008 - 21:32 नवीन
अजूनही माझ्या अंगाला किंचित कंप आहे! एटीएस च्या प्रमुखाला अतिरेक्यांनी कंठस्नान घातल्याचे ऐकले आणि क्षणभर बधीर झाल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नंदन Wed, 11/26/2008 - 23:48 नवीन
वाटले. मानसिक खच्चीकरणाचा एक डाव म्हणून करकरे, साळस्कर सारख्या अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यात आले असावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
घ
घाटावरचे भट Wed, 11/26/2008 - 23:55 नवीन
करकरे किंवा साळसकर अतिरेक्यांचे लक्ष्य नव्हते. ते नंतरच्या गोळीबारात शहीद झाले. सकाळ मध्ये बातमी आहे की करकरे बाँबच्या (बहुधा ग्रेनेडच्या) स्फोटात जखमी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चित्रा Wed, 11/26/2008 - 23:20 नवीन
अतिशय दुर्दैवी घटना. दरवेळी हेच लिहावे लागते, परिस्थितीत कसलाही बदल घडून येत नाही. साधी माणसे बळी जातातच, यावेळी पोलिसही लक्ष्य बनले. आपले सरकार नक्की काय करीत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टारझन Wed, 11/26/2008 - 19:51 नवीन
देवा रे ... मुंबई सुरक्षित ठेव !! - टारझन
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 11/26/2008 - 19:54 नवीन
बातम्या पहायचे धाडस ही होत नाही आहे. :( खुपच मानसिक त्रास होतो हे वाचुन, ऐकुन.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 11/26/2008 - 19:59 नवीन
मी स्वतः परदेशात असल्याने सुखरूप आहे. पत्नी आणि मुलगी मुंबईला सुखरूप आहेत. सर्व हितचिंतक मि.पा. करांचे आभार.. १६ जणांचा जीव गेला. एक परदेशी महिला सुद्धा म्रुत्युमूखी पडली.. बरेच जखमी ..पर्यटनाचा ओघ कमी व्हावा हा उद्देश दिसतोय. बाकीच्या मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. सर्वजण सुखरूप रहावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Wed, 11/26/2008 - 20:06 नवीन
वाहिन्यांचे बातमीदार आणि नागरिक मुक्तपणे अपघातस्थळी वावरत आहेत...अपघातस्थळ "सील" वगैरे करत नाहीत का? तशातच आता नेते या ठिकाणांना भेटी द्यायला येतील, उगाच पोलीस यंत्रणांवरचा ताण कशाला वाढवतात ही मंडळी?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/26/2008 - 20:09 नवीन
नाही नाही.. नेते कशाला येतील तिथे ( मरायला!) .. त्यांना आदेश मिळालेत म्हणे, जागा सोडू नकाचे.. इथे बाकीचे लोक ओळख पाळख नसताना धावतायत.. आणि नेत्यांच्या जिवाची काळजी घेणं चालू आहे.. संताप येतो असं स्फोट अन गोळीबार वाचलं की.. कधी संपणार हे सगळं? http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फास्टरफेणे
फ
फास्टरफेणे Wed, 11/26/2008 - 20:24 नवीन
रामदास कदम भेट देउन गेले...(साध्य काय कुणास ठाउक!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
प्राजु Wed, 11/26/2008 - 22:25 नवीन
रूग्णांना बंधक बनवले आहे अतिरेक्यांनी.. याला काय म्हणायचं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फास्टरफेणे
य
यशोधरा Wed, 11/26/2008 - 20:11 नवीन
खरय गं भाग्यश्री..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/26/2008 - 20:12 नवीन
तेव्हा.. खूप भिती वाटली. जपून रहा.. संताप होतो आहे जीवाचा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 20:28 नवीन
पंतप्रधानांनी घटनेची निंदा केली आहे. सरकारची जबाबदारी संपली. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 11/26/2008 - 20:33 नवीन
देवा, मुंबईचे अन माझ्या भारताचे या अतिरेक्यांपासून अन दुश्मनांपासून रक्षण कर रे! मुंबईकर मिपाबंधु-भगिनिंनो... सुखरुप असल्याचे कळवा हो लवकर. आपला, (चिंतीत) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Wed, 11/26/2008 - 20:34 नवीन
रोज मरे त्याला कोण रडे " हे आता रोजचेच होणार आहे का?कधी थांबणार हे दुष्टचक्र?अजुन किती निरपराधांचे बळी घेणार हे दहशतवादी मिपाकर आणि त्यांचे आप्त व समस्त मुंबईकर काळजी घ्या बाबांनो रात्र वैर्‍याची आहे.आपली खुशाली कळवत रहा. विलेपार्ले येथे झालेला स्फोट भयंकर होता .असे आताच माझ्या वहिनीने फोन करुन सांगितले .ती बिचारी घरात सुद्धा त्या आवाजाने कोसळली. विधानभवनाजवळ देखिल गोळीबार सुरु आहे असे समजते?मुख्यमंत्री बिळात जाऊन बसले असतिल? "अनामिका"
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/26/2008 - 20:47 नवीन
बापरे.. अघटित.. शब्द नाहीत... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 11/26/2008 - 20:54 नवीन
टाईम्स मधे ८० लोक मृत आणि २५० जखमी झाल्याचं सांगितलंय. भयानक आहे हे. आणि आता हे एटीएस वाले काय करत होते?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Wed, 11/26/2008 - 21:06 नवीन
एटीएस चे लोक साध्वीच्या पाठी आहेत. चॅनेल्सवाल्यांना मुलाखती देण्यापुढे वेळ कुठे त्यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 21:14 नवीन
प्रचंड लोकसंख्येला आणि भीतीला तोंड देताना नियंत्रण ठेवणे अवघड असते. टीका करु नका. आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Wed, 11/26/2008 - 21:47 नवीन
>>आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!! हे मला ठाऊक नव्हतं. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कपिल काळे Wed, 11/26/2008 - 22:29 नवीन
हो ते करकरे ए टी एस वाले , कामटे आणि साळसकर मारले गेले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
य
यशोधरा Wed, 11/26/2008 - 21:20 नवीन
अजून एक अधिकारी अशोक कामतेही शहीद... आता तरी राजकारण्यांना अक्कल येणार आहे का?? X(
  • Log in or register to post comments
म
मृदुला Wed, 11/26/2008 - 21:18 नवीन
बातमी मिपावरच समजली. आधी काही एप्रिल फूल प्रकार असावा असे वाटले. पण खरीच बातमी आहे हे कळल्यावर अवाक झाले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/26/2008 - 21:24 नवीन
अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं.. नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/26/2008 - 21:25 नवीन
अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं.. नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा? डेक्कन मुजाहिद्दिन ने.. जबाबदारी घेतली आहे.. ७८ मृत्यू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 21:35 नवीन
हा हल्ला आहे! ताज हॉटेलच्या सर्वात जुन्या अशा हेरिटेज विंगमधे स्फोटामुळे मोठी आग लागलेली आहे. अतिरेकी हे ताज आणि ओबेरॉयमधे अजूनही आहेत आणि ए.टी.एस. व कमांडोज दोन्ही ठिकाणी घुसले आहेत. ट्रायडंट हॉटेलमधे लष्कराचे जवानही आले आहेत. जवळजवळ युद्धसदृश परिस्थिती आहे!! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 21:43 नवीन
रात्री सव्वा वाजता दिल्लीहून २०० कमांडोंचे एक विमान मुंबईला रवाना झाले. रात्री अडीचला ते मुंबईला पोहोचेल, आणि ताज, ओबेरॉय, कामा इस्पितळ येथील ओलीसांना सोडवण्याचा प्रयत्न करेल. असे शिवराजजींनी सांगितले. मात्र शिवराजजी अतिरेक्यांना "दीज पर्सन्स" असे संबोधत होते. अद्यापही हे लोक अतिरेकी आहेत, ह्याची जाणीव शिवराजजींना झालेली दिसत नाही. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 21:47 नवीन
आवाज थरथरत होता त्यांचा बोलताना. सरदार पटेलांचा आत्मा तळमळला असेल!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कपिल काळे Wed, 11/26/2008 - 22:31 नवीन
चापून चोपून भांग. ह्यातून वेळ मिळाला तर ते काही कारवाइ करतील.... आता दिले की कमांडो पाठवून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 11/26/2008 - 21:39 नवीन
अतिरेक्यानी विजय साळस्कर, अशोक कामते, हेमंत करकरे अशा अधिकार्‍यानाही कंठस्नान घातले आहे. अतिरेकी सरळ सरळ थुंकले आहेत आपल्या तोंडावर असे वाटते आहे. अशा जगण्यापेक्षा मरण बरे.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 21:42 नवीन
लष्कर आणि नौदलाला सज्ज रहाण्याचे आदेश आहेत!! चतुरंग
  • Log in or register to post comments
ए
एक Wed, 11/26/2008 - 21:52 नवीन
ईंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होतं असं विचारून त्यांची झोप मोड करायची इच्छा नाही. यावेळीही आपण निषेध, खेद व्यक्त करण्यापलिकडे काय करणार आहोत? फार उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
य
यशोधरा Wed, 11/26/2008 - 21:45 नवीन
त्या शिवराज पाटलांनाच द्यायला हवे "दीज पर्सन्स" च्या ताब्यात आधी! किती कणाहीन मंत्री! :(
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Wed, 11/26/2008 - 21:47 नवीन
वाहिन्यांवरुन अतिरेक्यांची इमेल वाचली जात आहे. १९४७ साली राज्ये हडपली त्याचा सूड घेत आहोत असले असंबद्ध इमेल पाठवले आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 11/26/2008 - 21:47 नवीन
सारखे हल्ले होत असतात मुंबईत.. मग आधीपासून या यंत्रणा,सुरक्षा व्यवस्था का नाहीत आपल्याकडे.. मला पोलिसांच्या धैर्याचं कौतुक आहे. पण नंतर धावाधाव का नेहेमी.. आधी पासून नाही का काही करता येणार.. मटात त्या नायजेरीयन हल्लेखोराचा फोटो पण आहे. म्हणजे आपले रिपोर्ट्स जास्त धाडशी म्हणायचे पोलिसांपेक्षा.. आत्ताच सिएनेन वर वाचलं, की अन-ऑफिशिअल न्युज आहे की त्या लोकांनी परदेशी लोकांना ओलिस ठेवलेच आहे. प्लस अमेरिकन्,ब्रिटीश पासपोर्ट्स असलेल्या लोकांची माहीती मागितली आहे.. एटीसचे अधिकारी, पोलिस यांचा मृत्यु.. :( काही कळत नाहीए.. इथे बसून नुस्ता जिवाला घोर लागलाय.. तिथल्या लोकांची काय परिस्थिती असेल.. किती टेन्शन... युद्धच वाटतेय खरंच!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा