Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले.

A
Ashutosh badave
Tue, 01/05/2021 - 13:27
आज काय घडले... मार्गशीर्ष व. ५ छत्रसाल बुंदेले यांचे निधन ! शके १६५५ च्या मार्गशीर्ष ब.५ रोजी बुंदेलखंडाचा अधिपति छत्रसाल बुंदेला यांचे निधन झाले. याच्या वयाच्या चौदाव्या वर्षीच आईबाप निवर्तन होवून राज्याची वाताहात झाली होती. तेव्हां यांने 'नशीब' काढण्यासार्टी मोगल दरबारकडे धाव घेतली. मीर्झा जयसिंग याच्या पदरी तो राहू लागला. जयसिंगाबरोबर त्याने अनेक लढायांत पराक्रम करून दाखविला. परंतु पुढे मोंगल दरबारांतील बेइमानीपणा पाहून मोगलांच्या सेवेतून तो मुक्त झाला. याच वेळी श्रीशिवाजीमहाराज यांची आगऱ्याहून सुटका झाल्यामुळे त्यांचे नांव भारतांत दुमदुमून राहिले. तेव्हां छत्रसाल दक्षिणेत आला व शिकारीच्या निमित्ताने शिवरायांची याने भेट घेतली. यांची तेजस्विता पाहून आपले गमावलेले उत्तरेतील 'स्वराज्य' काबीज करण्यास श्रीशिवाजी राजांनी याला प्रवृत्त केले. याच प्रसंगी शिवाजी राजांनी यास एक तरवार भेट केली; आणि तिच्या जोरावर छत्रसालाने लढायांवर लढाया मारण्यास सुरुवात केली. तहवर खाँ, अनवर खां, सदरुद्दीन आदि शूर सरदारांचा पाडाव केला आणि यमुना व चंचळा या नद्यांच्या दक्षिण प्रांताचा म्हणजे सर्व बुंदेलखंडाचा हा मालक झाला. सन १७३२ सध्ये अहमदशहा बंगश याने छत्रसालावर स्वारी केली. या वेळी छत्रसालांचे वय एक्याऐशी होते. स्वतःचे अंगी शक्ति न राहिल्याने या वृद्ध राजाने स्वातंत्र्य-रक्षणासाठी दक्षिणेतील बाजीराव पेशव्यांचे साह्य मागितले आणि छत्रसालाने त्याला पत्र लिहिलें। -जो गति ग्राह गजेंद्रकी सो गति जानहुं आज । बाजी जात बुन्देल की राखो घाजी लाज -॥" आणि या विनंतीप्रमाणे बाजीरावाने बंगशचा संपूर्ण पराभव केला. तेव्हां कृतज्ञता म्हणून आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा याने बाजीरावास दिला. असे सांगतात की, त्या वेळी प्रसिद्ध असलेला भूषण कवि याच्या दरबारी गेला होता. त्या वेळी याने त्याच्या पालखीला खांदा देऊन त्याचा सत्कार केला. १४ डिसेंबर १७३३ छत्रसाल बुंदेला

प्रतिक्रिया द्या
701 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा