लोकांचे देह कचर्यासारखे उचलून नेताना, रक्ताने वाहणार्या हाताला मलमपट्टी करण्याऐवजी त्यावर कॅमेरा रोखणार्यांना, ताज हॉटेल जळताना त्याचे रसभरीत वर्णन करताना पहावले नाही. :-(
भयंकर दुर्दैवी घटना.
काही कारणामुळे मला टीव्हीवर फक्त हिंदी न्यूज चॅनल्सच दिसत आहेत. अतिशय घृणास्पद कव्हरेज आणि भाषा. चीप. आता नेटवर आय.बी.एन. लोकमत आणि एन.डी.टी.व्ही दिसते आहे. खूपच बरे आहे. पूर्ण ठीक नाहीच.
दहशतवादी कुलाबा कॉजवेच्या शेवटी पोचले आहेत. 'बूटलेगर्स' च्या बाहेर चकमक चालू झाली. ४ पोलिस शहीद.
बिपिन कार्यकर्ते
तात्या व मिपा सदस्यांनी काळजी घ्यावी व आपापली ख्याली खुशाली कळवावी....
च्यामारी इथ जग महागाई आणि मंदी आणि कशाकशान रोज मरतय अन ह्या लोकाना दहशतवाद सुचतो...तात्यांच्या शब्दात अंमळ **** च आहेत...:)
मुकुल
2 नायजेरीयन लोकं घुसले म्हणे एके४७ घेऊन.. आपली लोकं झोपलेली असतात काय ?? असे कसे घुसुन गोळीबार करतात?
बरंच काय काय होतंय.. सीएस्टी,ताज हॉटेल च्या आसपास गोळीबार.. पार्ल्यात बाँबस्फोट.. रीगल थिएटर,ओबेरॉय हॉटेल मधे आग..
:(
मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी ..
http://idesitv.com/nepal.php इथे न्युज दिसत आहे..
इथे व्यवस्थीत आणि डिटेल कव्हरेज आहे ...
http://www.ndtv.com/convergence/ndtv/video/video_live.aspx?id=1
मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी ..
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3761446.cms
हेच बघत होतो आता. :(
मुंबई वासी आपली खुशाली कळवा रे.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अजूनही माझ्या अंगाला किंचित कंप आहे! X(
फारच उद्वेगजनक घटना आहेत.
(मृतांबद्दल शोक वाटतो. जखमींना लवकर आराम पडो ही प्रार्थना. अधिक कोणी बळी पडू नये ही इच्छा.)
चतुरंग
करकरे किंवा साळसकर अतिरेक्यांचे लक्ष्य नव्हते. ते नंतरच्या गोळीबारात शहीद झाले. सकाळ मध्ये बातमी आहे की करकरे बाँबच्या (बहुधा ग्रेनेडच्या) स्फोटात जखमी झाले.
अतिशय दुर्दैवी घटना.
दरवेळी हेच लिहावे लागते, परिस्थितीत कसलाही बदल घडून येत नाही.
साधी माणसे बळी जातातच, यावेळी पोलिसही लक्ष्य बनले.
आपले सरकार नक्की काय करीत आहे?
मी स्वतः परदेशात असल्याने सुखरूप आहे. पत्नी आणि मुलगी मुंबईला सुखरूप आहेत. सर्व हितचिंतक मि.पा. करांचे आभार..
१६ जणांचा जीव गेला. एक परदेशी महिला सुद्धा म्रुत्युमूखी पडली.. बरेच जखमी ..पर्यटनाचा ओघ कमी व्हावा हा उद्देश दिसतोय.
बाकीच्या मुंबईकर मिपाकरांनी लवकर खुशाली कळवावी .. सर्वजण सुखरूप रहावेत अशी देवाकडे प्रार्थना करतो.
खादाडमाऊ
वाहिन्यांचे बातमीदार आणि नागरिक मुक्तपणे अपघातस्थळी वावरत आहेत...अपघातस्थळ "सील" वगैरे करत नाहीत का?
तशातच आता नेते या ठिकाणांना भेटी द्यायला येतील, उगाच पोलीस यंत्रणांवरचा ताण कशाला वाढवतात ही मंडळी?
नाही नाही.. नेते कशाला येतील तिथे ( मरायला!) .. त्यांना आदेश मिळालेत म्हणे, जागा सोडू नकाचे.. इथे बाकीचे लोक ओळख पाळख नसताना धावतायत.. आणि नेत्यांच्या जिवाची काळजी घेणं चालू आहे..
संताप येतो असं स्फोट अन गोळीबार वाचलं की.. कधी संपणार हे सगळं?
http://bhagyashreee.blogspot.com/
देवा, मुंबईचे अन माझ्या भारताचे या अतिरेक्यांपासून अन दुश्मनांपासून रक्षण कर रे!
मुंबईकर मिपाबंधु-भगिनिंनो... सुखरुप असल्याचे कळवा हो लवकर.
आपला,
(चिंतीत) भास्कर
आम्ही येथे वसतो.
रोज मरे त्याला कोण रडे "
हे आता रोजचेच होणार आहे का?कधी थांबणार हे दुष्टचक्र?अजुन किती निरपराधांचे बळी घेणार हे दहशतवादी
मिपाकर आणि त्यांचे आप्त व समस्त मुंबईकर काळजी घ्या बाबांनो रात्र वैर्याची आहे.आपली खुशाली कळवत रहा.
विलेपार्ले येथे झालेला स्फोट भयंकर होता .असे आताच माझ्या वहिनीने फोन करुन सांगितले .ती बिचारी घरात सुद्धा त्या आवाजाने कोसळली.
विधानभवनाजवळ देखिल गोळीबार सुरु आहे असे समजते?मुख्यमंत्री बिळात जाऊन बसले असतिल?
"अनामिका"
प्रचंड लोकसंख्येला आणि भीतीला तोंड देताना नियंत्रण ठेवणे अवघड असते. टीका करु नका.
आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!!
चतुरंग
>>आताच समजलेल्या बातमीनुसार ए.टी.एस. चे एक अँटी टेररिस्ट स्पेशलिस्ट विजय सालसकर आणि प्रमुख हेमंत करकरे हे दोघेही मृत्यूमुखी पडलेले आहेत!! पोलिसांच्या मनोधर्याची कल्पना करा त्यांना ह्या वेळी धीराची आणि मदतीची गरज आहे!!!
हे मला ठाऊक नव्हतं. क्षमस्व.
अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं..
नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अशोक कामटे, विजय सालसकर.. यांनाही मारलं..
नक्की.. काय? मुंबई पोलिसांना धडा शिकवायचा उद्देश होता का आतंकवाद्यांचा?
डेक्कन मुजाहिद्दिन ने.. जबाबदारी घेतली आहे.. ७८ मृत्यू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हा हल्ला आहे!
ताज हॉटेलच्या सर्वात जुन्या अशा हेरिटेज विंगमधे स्फोटामुळे मोठी आग लागलेली आहे.
अतिरेकी हे ताज आणि ओबेरॉयमधे अजूनही आहेत आणि ए.टी.एस. व कमांडोज दोन्ही ठिकाणी घुसले आहेत.
ट्रायडंट हॉटेलमधे लष्कराचे जवानही आले आहेत.
जवळजवळ युद्धसदृश परिस्थिती आहे!!
चतुरंग
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)Wed, 11/26/2008 - 21:43नवीन
रात्री सव्वा वाजता दिल्लीहून २०० कमांडोंचे एक विमान मुंबईला रवाना झाले. रात्री अडीचला ते मुंबईला पोहोचेल, आणि ताज, ओबेरॉय, कामा इस्पितळ येथील ओलीसांना सोडवण्याचा प्रयत्न करेल.
असे शिवराजजींनी सांगितले. मात्र शिवराजजी अतिरेक्यांना "दीज पर्सन्स" असे संबोधत होते. अद्यापही हे लोक अतिरेकी आहेत, ह्याची जाणीव शिवराजजींना झालेली दिसत नाही.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
अतिरेक्यानी विजय साळस्कर, अशोक कामते, हेमंत करकरे अशा अधिकार्यानाही कंठस्नान घातले आहे. अतिरेकी सरळ सरळ थुंकले आहेत आपल्या तोंडावर असे वाटते आहे. अशा जगण्यापेक्षा मरण बरे..
पुण्याचे पेशवे
ईंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होतं असं विचारून त्यांची झोप मोड करायची इच्छा नाही.
यावेळीही आपण निषेध, खेद व्यक्त करण्यापलिकडे काय करणार आहोत? फार उत्सुकता आहे.
सारखे हल्ले होत असतात मुंबईत.. मग आधीपासून या यंत्रणा,सुरक्षा व्यवस्था का नाहीत आपल्याकडे..
मला पोलिसांच्या धैर्याचं कौतुक आहे. पण नंतर धावाधाव का नेहेमी.. आधी पासून नाही का काही करता येणार..
मटात त्या नायजेरीयन हल्लेखोराचा फोटो पण आहे. म्हणजे आपले रिपोर्ट्स जास्त धाडशी म्हणायचे पोलिसांपेक्षा..
आत्ताच सिएनेन वर वाचलं, की अन-ऑफिशिअल न्युज आहे की त्या लोकांनी परदेशी लोकांना ओलिस ठेवलेच आहे. प्लस अमेरिकन्,ब्रिटीश पासपोर्ट्स असलेल्या लोकांची माहीती मागितली आहे..
एटीसचे अधिकारी, पोलिस यांचा मृत्यु.. :(
काही कळत नाहीए.. इथे बसून नुस्ता जिवाला घोर लागलाय.. तिथल्या लोकांची काय परिस्थिती असेल.. किती टेन्शन... युद्धच वाटतेय खरंच!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी