Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... पौष शु.१ राजारामशास्त्री भागवत यांचे निधन !

A
Ashutosh badave
गुरुवार, 01/14/2021 - 06:22
राजाराम भागवत शास्त्री शके १८२९ च्या पौष शु. १ रोजी महाराष्ट्रांतील सुधारक व प्रसिद्ध नवविचारप्रवर्तक राजारामशास्त्री भागवत यांचे निधन झाले. तीन वर्षे मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जुन्या शास्त्यांजवळ पांच-सहा वर्षे संस्कृतचे अध्ययन केले. त्यानंतर ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये संस्कृत शिकवू लागले. याच वेळी त्यांनी बॉम्बे हायस्कूल व मराठा हायस्कूल काढून तेथे बावीस वर्षे अध्यापन केले. कर्ते समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याति होती. वेदोक्त धर्माकडे त्यांचा ओढा असून जातिभेद व खाण्यापिण्याचे निर्बंध यांविरुद्ध ते होते. मूलगामी व स्वतंत्र विचार त्या वेळी समाजाला न झेपल्यामुळे त्यांची काही काळ उपेक्षाच झाली. क्वचित् प्रसंगी ते विक्षिप्तहि ठरत. शब्दांच्या व्युत्पत्त्या व भाषाशास्त्रांतील नवे सिद्धांत यांच्या प्रतिपादनास मराठीत त्यांनीच सुरुवात केली. त्यांची 'विधवा-विवाह शास्त्र का अशास्त्र ?', 'मराठ्यासंबंधी चार उद्गार', 'ब्राह्मण व ब्राह्मणधर्भ' 'व्रात्यस्तोम' इत्यादि पुस्तकें प्रसिद्ध आहेत. राजारामशास्त्री यांचा जन्म शके १७७३ मध्ये राजापूर तालुक्यांत झाला. यांच्या घराण्याचे मूळचे नांव 'राऊत' असे होते. कोणी एक पुरुष पेशव्यांकडे बारगीर असून तो चाबूकस्वार व अश्वविद्यानिपुण होता. म्हणून हे नांव यांच्या घराण्यात होते. पुढे राजारामशास्त्री नावारूपास येऊन त्यांची नेमणूक सेंट झेवियर कॉलेजांत संस्कृतचे प्रोफेसर म्हणून झाली. स्वतः पदवीधर नसतांना त्यांनी अंगच्या गुणांवर ही कामगिरी सुमारे तीस वर्षे चांगल्या रीतीने पार पाडली. सन १८८४ मध्ये 'बाँचे हायस्कूल' नावाची जी संस्था मुंबईस निघाली तिच्या संस्थापकांत राजारामशास्त्री हे एक होते. शास्त्रीबोवांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी 'वार्ताहार' नावाचे एक मासिक काहीं दिवस काढले होते. भाषाशास्त्रावरहि शास्त्रीबोवांचे लिखाण अत्यंत महत्त्वाचे आहे. 'मराठ्यांविषयी चार शब्द' यासारखे ऐतिहासिक लेखहि यांनी लिहिलेले आहेत. ४ जानेवारी १९०८

प्रतिक्रिया द्या
800 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा