मराठी रेडिओ
माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा:
रूपा धारप
देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
असेच कधीतरी ट्यून इन रेडिओ वगैरे सारख्या गोष्टी सापडल्या जिथे मुंबई अस्मिता वाहिनी ऐकता येत होती. मग प्रॉपर रेडिओ ऐकणं सुरू झालं. काही काळाने प्रसारभारतीवर देशभरातल्या रेडिओ चॅनल्सचा खजिना सापडला आणि लॉटरी लागल्यासारखंच वाटलं. महाराष्ट्रातल्या इतक्या शहरांमधून आकाशवाणी ऑनलाईन ऐकता येते हा नवीनच शोध लागला. मग काय, चॅनल सर्फींग करत करत भरपूर मराठी गाणी, कार्यक्रम ऐकणं सुरू झालं.
पण नुकतेच प्रसारभारतीने हे रेडिओचे पेज काढून टाकले आणि अॅप सुरू केले. आणि मला अॅप नको होते. मग अजून शोधाशोध करत बसण्यापेक्षा आपणच एक पेज बनवून आपल्या ब्लॉगवर का टाकू नये असा विचार मनात आला. आणि त्याप्रमाणे onlineradiofm.in वरच्या लिंक्स जमा करून महाराष्ट्रातल्या विविध शहरातली आकाशवाणी एका पेजवर मिळेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे अॅपशिवाय मराठी रेडिओ ऐकणं आता खूप सोपं झालं.
माझ्यासारखेच आकाशवाणीचे चाहते इथे मायबोलीवर खूप असतील असं वाटलं आणि म्हणूनच सर्व मायबोलीकरांसाठी ही लिंक इथे देते आहे.
https://marathiradiostations.blogspot.com/p/marathi-radio.html
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vijanasurabhi | Bachelor Party |