जे न देखे रवी...

माझ काय चुकलं

Primary tabs

माझ काय चुकलं

भंडाऱ्यातल बाळ माझ्या स्वप्नात आलं
म्हणल आजोबा , मला देवानी नाही नेल

नऊ महिने तीच्या पोटात
खुप काही ऐकलं
बाहेर आल्यावर तीचं
तोंड सुद्धा नाही पाहिलं

निघाली होती आणायला
करून स्वागताची तयारी
हळूच घेऊन जा रे
आजी होती म्हणायली

अधीर झालो होतो भेटायला
बघुन साऱ्यांची स्वप्नं
म्हटलं होत मनाशीच
लवकरच येतो खेळायला

पळा पळा धावा धावा
चहूकडे गोंधळ माजला
अंधार झाला सगळीकडे
छतावरचा दिवा पण विझला

इवले इवले पाय माझे
सांगा पळू मी कसा
काका, मावशी, ताई
ओरडून बसला माझा घसा

माह्या लेकराला वाचवा
माझी माय आरडत होती
पदरानी तोंड दाबून
टाचा खरडत होती

काय झालं कस झालं
कळलच नाही
सुरू व्हायच्या आधीच
सारं काही संपलं
कळलच नाही
यात माझं काय चुकलं

भंडाऱ्यातल बाळ माझ्या स्वप्नात आलं........

सर्व गेलेल्या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली व परीवांराला........
शब्द सुचत नाहीत......
१०-१-२१

बाप्पू

झालेली घटना अत्यंत दुर्दवी..
विचार करूनच अंगावर काटा येतो.