शिक्षणाचे मानसशास्त्र: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला....
आजोबांचे डोळे चकाकले. "द गेम इज अफूट माय डीअर वॉटसन. लेट अस कँच द चॉकलेट चोर!"
घडले असे: चिंटू, चिऊ आणि त्यांची चुलत भावंडे मिनी आणि मोंटू पहिल्या मजल्यावर शेजारी राहतात. आजी आजोबा तळ मजल्यावर रहातात. दुसऱ्या मजल्यावर आजोबांचे भाऊ आणि त्यांची मुलं रहात होती, पण गेली काही वर्षे ते इंग्लंड-अमेरिकेत आहेत. बिल्डिंग मध्ये अजून तिसरे कुणी नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे घर असल्यासारखे आहे. सहाजिकच, चौघेही मुलं बहुतेक एकत्रच असतात. सगळे दरवाजे सताड उघडेच असतात, मुलं सर्व घरात मुक्तपणे वावरतात. मुलं रोज संध्याकाळी चार वाजता आजोबांच्या सोबत सोसायटीच्या ग्राउंडवर खेळायला जातात. आजोबा आपल्या बरोबर एक पिशवी घेतात, त्यात एक पाण्याची बाटली आणि ताईआत्याने दिलेला टॅबलेट असतो. कधी मुलांना खाऊ असतो आणि कधी परत येताना थोडीशी भाजी पिशवीतून आणतात. साडेसहा सातच्या सुमारास आजोबा आणि मूल घरी येतात. मुलांचे दोन्ही बाबा पण खाली आजोबा आजीची विचारपूस करायला ह्या वेळेस येतात. कधी सगळे खाली येऊन एकत्र जेवतात. आ्जी मग स्पेशल काहीतरी करते. मुलांना खूपच मजा येते. आज असेच चार वाजता सगळे बागेत आले. मिनींनी आपली नवीन सायकल आणली होती. खरतर बाग फार लांब नव्हती, बिल्डिंग पासून करेक्ट गेट टू गेट पाचशे मीटर. ग्राउंडला दोन तीन राउंड मारून आजोबा नेहमीच्या बाकड्यावर बसले. आज त्यांची गॅंग अली नव्हती म्हणून ते मुलांचा खेळ पाहत बसले होते. थोड्या वेळात चिंटू आला आणि त्यांनी आजोबाना, मी बॅडमिंटनची रॅकेट शटल घेऊन येतो असे सांगून, धावत घरी गेला. चिंटू चांगला फाष्ट धावतो पण आज त्याला जाऊन यायला 20 मिनिटे लागली. का रे वेळ लागला असे विचारल्यावर, फ्रीज मधून पाणी घेतलं प्यायला, आणि नेहमी प्रमाणे आजीने ग्लास विसळून जागेवर ठेव सांगितले, त्यात 10 मिनिट वेळ गेला असा म्हणाला. मिनीने सॅडल घातले होते, तुमची पहिली सिंगल्स होई पर्यंत मी बूट घालून येते असे म्हणून ती सायकल स्टँड कडे गेली आणि सायकलवर घरी गेली. बूट आजी कडेच होते त्यामुळे वर जावे लागले नाही. बूट घालायच्या आधी स्वयपाकघरात धावत जाऊन पाणी प्याली. तिलाही जाऊन येऊन वीस मिनिट लागली. “तू तर सायकलवर गेली, मग वेळ का लागला?” बूट घालायला वेळ लागत नाही का? म्हणून मिनीने थोडेसे त्रासूनच उत्तर दिले. जाऊ दे म्हणून सगळे पुन्हा एकत्र खेळायला लागले. तेव्हड्यात मोंटूला तहान लागली. तो आजोबांकडे गेला आणि पाणी द्या म्हणाला. पण आज आजोबा पिशवी विसरले होते. त्यांनी त्याला ती घेऊन येण्यासाठी घरी पाठवलं. लवकर ये म्हणल्यावर मोंटून मनगटावरच्या घड्याळात स्टॉप वॉच चालू केला आणि पळाला. एक मिनिटात मोंटूने मिनीची सायकल घेतली आणि घरी येऊन आजीकडे पिशवी मागितली. आजीने फ्रीज उघडून पाण्याची बाटली आणि तिथले लांबडे चॉकलेट बार्स पिशवीत भरले आणि मोंटू कडे पिशवी दिली. परत येऊन मोंटूने सायकल स्टँडवर लावली आणि पुन्हा धावत एक मिनिटात आला. सगळं मिळून बारा मिनिटात परत आला. आजीने फाईव्ह मिनिट्स वेस्ट केले, नाहीतर अजूनही लवकर आलो असतो अशी फुशारकी मारली सवयी प्रमाणे. मुलांचा खेळ संपल्यावर सगळे घरी आले आणि आजोबांना पिशवीतले चॉकलेट आठवले. पण पिशिवीत तीनच चॉकलेट होते! मी तर चार आणले होते सकाळी, प्रत्येकाला एक या हिशोबाने. “फ्रीजमधले मी सगळे दिले होते हो” आजीने सांगितले. पिशवीला भोक नाही, मग कसे पडले असतील? स्वयंपाकघरातही खाली पडलेले नव्हते.द केस ऑफ द मिसिंग चॉकलेट बार! स्ट्रेंज! आजोबा पुटपुटले.
आजोबांनी मुलांना विचारले तेव्हा चौघांनी कानावर हात ठेवला. मग आजोबांनी थोडा विचार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तरळला. "द गेम इज अफूट वॉटसन. नाऊ लेट अस कँच द चॉकलेट चोर!" आजोबांनी आपली शेरलॉक होम्सची टोपी घातली आणि चोर शोधण्याचा विडा उचलला. “It is a mistake to theorize before one has data. Insensibly one begins to twist facts to suit theories, instead of theories to suit facts.” (Sherlock Holmes in A Scandal in Bohemia.) आजोबांनी शेरलॉक होम्सचा डायलॉग मारल्या शिवाय राहवलं नाही. चौकशी अर्थातच आजी पासून सुरू झाली. दुपारी कुणी आलं होतं का? आजोबांनी आजीला विचारले. आजी म्हणाली, "आता दुपारी कोण येणार? कचऱ्याची गाडी आला होता दुपारी एकच्या सुमारास. मी कचरा गाडीत टाकला आणि मग टीव्ही पाहत बसले जरा वेळ." आजीने जरा तिरसटच उत्तर दिले. "आणि हो विसरलेच बघा. साडेतीनच्या सुमारास तुम्हीच फ्रीज उघडलं आणि औषध घेतलं होतं ना? आणि मोंटू आला असेलच! कार्ट कधी स्वस्थ बसतच नाही. खाली वर चालूच असत, आणि सारखा फ्रीजमध्ये कारभार करतो. इकडचे तिकडे तिकडचे इकडे करतो, शिस्त म्हणून नाही पोराला. पण काम सांगितले तर नाही म्हणत नाही हो, कांम चटकन करतो. तसा लाघवी आहे." आजी एकदा बोलालयला लागली की थांबणे कठीणच! "संध्याकाळी चिंटू आला होता आणि फ्रीज उघडून पाणी प्याला. मी फ्रीजच दार हळू लाव आणि ग्लास विसळून ठेव सांगितलं तर तसाच पळाला. मीच राहिलेलं उष्ट पाणी टाकून ग्लास विसळून ठेवला. मग मिनी आली. पोरगी गुणांची हो! ग्लास विसळून स्वच्छ पुसून जागेवर ठेवला. हात सावकाश आहे पण नेटका आहे बरं. शेवटी मोंटू आला. मी पिशवी भरून दिली त्याला. पिशवीभरे पर्यंत वरती जाऊन बाबा आलेत का बघून आला तेवढ्यात. स्वस्थ बसतच नाही दोन मिनिटं सुद्धा." "अरे हो, आज कचरा नेणाऱ्याची मुलगी पण आली होती त्याचा बरोबर. चांगले मार्क मिळाले तिला. पेढा देऊन नमस्कार केला मुलीने. मी पण तिचे तोंड गोड केले काहीतरी देऊन. काय ते आठवत नाही बाई आत्ता." मग आजोबांनी मुलांना विचारले "ग्राउंड पासून चालत यायला किती वेळ लागतो" पळत आणि सायकलवर किती लागेल? मुलांनी एकच गदारोळ केला 2 किंवा फारतर फार तीन वर एकमत झाले शेवटी. मग आजोबा जऱ्या करड्या आवाजातच मुलांना म्हणाले " बी सिरीयस वाँटसन्स. गेट टू गेट 500 मीटर अंतर, म्हणजे एक किलोमीटर मूलं जाऊन आली. मिने, गूगल कर जरा." मिनीने सांगितले, "चालण्याचा स्पीड साधारण 10 ते 12 मिनिट प्रति किलोमीटर असतो, तर सायकलवर, धावत 7 ते 8 मिनिट लागतील." आजोबा म्हणाले "आजी गेव्ह समथिंग, चिंटू धावत गेला होता, आणि मिने तू आणि मोंटू ने सायकल वापरली ..., दॅट वी नो सो फार. सो हु टुक द फोर्थ चॉकलेट?" आजोबांचा संशय कुणावर आहे सांगू शकाल? **************************************************गोष्ट, लेसन प्लॅन पूर्ण करण्यापूर्वी थोडी पार्शवभूमी
************************************************** हा उपद्व्याप कशासाठी? उद्दिष्ट: हा धडा पूर्ण केल्यावर, विद्यार्थी खाली नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्षात कश्या करता येतील हे कथित सत्य/काल्पनिक प्रसंगाच्या अनुषंगाने करून दाखवू शकेल.- चिकित्सक विचार सारणी
- प्रभावी संभाषण / संप्रेषण कौशल्य
- सहसंवेदना
- नात्यांची जपणूक
- निर्णय क्षमता
- स्वत: बद्दलची जागृती Self Awareness
- दुसऱ्याचा भावना समजावून घेणाऱ्या सहसंवेदना Empathy
- चिकित्सक विचार सारणी Critical Thinking
- सर्जनशील / सृजनशील सारणी Creative Thinking
- निर्णय क्षमता Decision Making
- समस्या निवारण Problem Solving
- प्रभावी संभाषण / संप्रेषण कौशल्य Good Communication
- नात्यांची जपणूक Interpersonal Relationship
- तणाव व्यवस्थापन Management of Stress
- भावनांची यशस्वी जुळवणी Management of Emotions
लेसन प्लॅन - वर्गात काय कराव
*********************************************************** पाहिले सत्र: प्रस्तावना आणि विचार आरंभ
प्रथम आपले उद्दिष्ट आणि आपण काय करणार आहोत हे वर्गाला सांगा. सत्रात भाग घेण्याचे नियम सांगा. गोष्टीची छापील प्रत सगळ्यांकडे आहे ही खात्री करा. मग गोष्ट वाचून दाखवा. गोष्ट वाचुन झाल्यावर मुलांचे गट करा. प्रत्येक गटाला आपापसात चर्चा करून आजोबांचा संशय कुणावर असेल याचे उत्तर शोधायला सांगा. मुलं चर्चा करताना त्यांचा प्रश्नांचे उत्तर फक्त गोष्टीत दिलं आहे तेव्हडेच द्या, वाढवू नका. उत्तर नसेल तर, दिलेली नाही असं सांगा. पंधरा मिनिटांनी, एक एक गटास आपले मत मांडण्यास सांगा. कुठलीही टीका टिप्पणी नको. फक्त छान, उत्तम असे कौतुक करा. पुढे आपण डिटेल चर्चा करू असे सांगा. कुणी चोर कोण हे सांगितलं तर ते स्वीकारून त्याची नोंद ठेवा.********* दुसरे सत्र: शास्त्रीय विचार पद्धत
इंग्रजीत दिलेलं शेरलॉक होम्सचे वाक्य समजावून सांगा. (It is a mistake to theorize ... माहितीचा आधार घेऊनच विचार व्यक्त केले पाहिजे. आधीच काहीतरी ठरवून किंवा पूर्वग्रह करून मिळणारी माहिती त्याला जुळवण्यासाठी वेडीवाकडी तोडू-दुमडू नये. हे चुकीचं आहे.) विचार करण्याची विविध पद्धती सांगा. Logical, Deductive, Analytical, Scientific, Evidence based reasoning म्हणजे काय हे सांगा. (वाचकहो, अधिक माहिती: गूगल गुरुजी!) मुलांना प्रथम सर्व शक्यता मांडायला सांगा. उदा: 1. एक चॉकलेट दुकानंतच राहिल्या/पडल्यामुळे तीनच आणले होते. 2. आजीने कचरेवाल्याच्या मुलीला दिले आणि विसरली. 3. आजोबांनीच खाल्लंपण आजी रागवेल म्हणून सांगत नाहीत. 4. आजीने खाल्ले, पण आजोबा रागावतील म्हणून सांगत नाही. 5. चिऊ आलीच नव्हती पण बाकीचे तिघे आले होते. त्यामुळे तिघांपैकी एक कुणीतरी घेतलं असेल. सगळे रागावतील म्हणून सांगत नाही. आता फळ्यावर एक तक्ता तयार करा. पहिल्या कॉलममधे (उभी रांग) घरातल्या आणि आले-गेलेल्या लोकांची नावे लिहा. पहिल्या रो (आडवी रांग) वरती ज्ञात धागेदोरे असे लिहा (फॅक्टस अँड एव्हीडेन्स). त्याचा खाली दुसऱ्या रकान्यात स्वयंपाकघरात आले होते का असे लिहा. तिसऱ्या रकान्यात फ्रिजमधे डोकावले का असे लिहा. पुढचे रकाने रिकामे ठेवा. दुसऱ्या कॉलम मधे व्यक्ती स्वयंपाकघरात आली होती का याचे उत्तर हो/नाही असे भरण्यास सुरू करा. एक दोन भरल्यावर मुलांना पूर्ण करायला सांगा. दहा मिनिटं वेळ देऊन मुलांना कुठे आलात विचारा आणि त्यांच्या सल्ल्याने फळ्यावरचा तक्ता भरा. जिथे नाही उत्तर येत त्या रोवर काट मारा - ही व्यक्ती आता संशयित नाही. या तक्त्यावरून आता पाच संशयित आहेत असे सांगून गोष्टीचा पुढचा भाग सांगा. **************************************************गोष्टीचा पुढचा भाग -
आजोबांनी आता मुलांकडे मोर्चा वळवला. मुलांना आज दुपारी कोण काय करत होता विचारले. आज आम्ही दुपारी एकत्र पिक्चर बघितला टीव्ही वर, खाली आलोच नाही असे मुलांनी सांगितले. कुणीही जागेवरून उठलं नाही? असे कसे होईल? पाणी प्यायला आणि बाथरूमला जायला उठलो, पण खाली कोणी आलं नाही, मुलं आपल्या सांगण्यावर ठाम होती. आजोबांनी आपली संशयितांची यादी बघितली आणि ... ************************************************** वर्गात मुलांना विचार करून आपले मत मांडू द्या. (संशयितांच्या यादीत फरक होतो का असे विचारायला हरकत नाही.) सर्वांना आत्तापर्यंतचा तपास वापरून निष्कर्ष मांडायला सांगा. निष्कर्ष मांडण्याची पद्धत POINT, EVIDENCE, EXPLAIN, (PEE) शिकवा. हळूच यातून मोंटू यादीतून बाहेर पडतो इकडे त्यांना न्या. आता राहिले आजी, आजोबा, चिंटू आणि मिनी. पूर्ण निष्कर्षास येण्यासाठी अजून माहिती हवी याकडे मुलांना वळवा.********* तिसरे सत्र: चिकित्सक विचार – Critical Thinking
पहिल्या सत्रात कुणी कुणाचे नाव चोर म्हणून सांगितले त्याची आठवण द्या. आता चार संशयित आहेत, तर पुढे कसे जावं हे मुलांना विचार करून सांगू द्या. सर्व रास्त सूचना स्वीकारा, जास्त टिप्पणी नको. संपूर्ण आणि सर्वांगीण विचार न करता कुणावर आरोप करण्यामुळे नाते संबंधावर होणारे दुष्परिणाम सांगा. आपल्याच घरात, आपल्यासाठीच आणलेली वस्तू घेतली तर आपण चोर होतो का? खाल्ले असेल कुणी मुलांनी, राहीलं असेल मागे असं म्हणून सोडून दिले तर चालले असते का? मुलांना विचार करू द्या, सर्व विचार स्वीकारून चिकित्सक विचारसरणी म्हणजे काय ते सांगा. (विषय विस्तारासाठी खाली लिंक आहे ती पहा हवे असल्यास.) गोष्टीचा शेवटचं भाग सांगा. **************************************************गोष्टीचा पुढचा भाग -
मग आजोबांनी स्वयंपाकघरात जाऊन कचऱ्याची टोपली बघितली. ती रिकामी होती. “Once you eliminate the impossible, whatever remains must be the truth Watson!” ― Sherlock Holmes in The Sign of Four आजोबा मिळालेल्या माहितीवर विचार करू लागले… ************************************************** इंग्रजीत दिलेलं शेरलॉक होम्सचे वाक्य समजावून सांगा. (Once you eliminate the impossible, ...) मुलांना निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न करू द्या. निष्कर्ष असा आहे: टोपलीत व्रँपर नाही म्हणजे दुपारी कुणीही चॉकलेट घेतलं नाही. हा निष्कर्ष ग्राह्य धरला तर राहिले दोघेच - चिंटू आणि मिनी. त्यांनी ते घेतले असेल तर खाल्ले कधी? त्या एकलेअर्स - गोळ्या नव्हत्या, लांबडे चॉकलेट बार होते. खाण्यास 3 ते 4 मिनिटं वेळ लागेल! व्रँपर कुणी सहसा खिशात ठेवत नाही, टोपलीत टाकतात, किंवा आळशी तिथेच जेवणाच्या टेबलवर ठेवतील. म्हणून आजोबां एक चॉकलेट विसरले हाच योग्य निष्कर्ष. (आजीने कचरेवल्याचा मुलीला दिले आणि विसरली हा निष्कर्ष सुद्धा चालू शकेल.) सारांश सांगा आणि धडा संपल्याचे सांगा. गृहपाठ म्हणून काय शिकलो ते लिहून काढायला सांगा. ********************** समाप्त *************************** • विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक विचारांची रुजवणूक करणे काळाची गरज - Ujjwala D. Lonkar, Ph.D. Principal Sharadabai Pawar College of Education for Women SCHOLARLY RESEARCH JOURNAL FOR INTERDISCIPLINARY STUDIES SJIF 2014 = 4.889 ISSN 2278-8808 http://www.srjis.com/pages/pdfFiles/146650614018.Lonkar%20Mdm.pdf • National Education Policy 2020 document (includes the desirability of teaching critical thinking skills) https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/NEP_Final_English_0.pdf • WHO LIFE SKILLS Dr.C.Karthik Deepa Assistant Professor Department of Education Avinashilingam University https://www.slideshare.net/mobile/deepachitravel/life-skills-39480615) • Balbharati books http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx राजा वळसंगकर 4.2.2021
💬 प्रतिसाद
(15)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/05/2021 - 05:48
नवीन
आवडले.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 02/05/2021 - 09:13
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
B
Bhakti
Fri, 02/05/2021 - 13:02
नवीन
NCERT कडून ही मार्गदर्शक वाङ्मय छापले जाते, पण ते वाचून मी साशंक राहिलो.??
का बरे?
परीक्षेत शिकवले ते शिकले का हे बघितले जाते. पण WHO लाईफ स्किल कौशल्यांना परिक्षेत बघितलं जाते का हे पण पाहण्याचा मी प्रयत्न केला. मॉडेल क्वसचन पेपर बघितल्यावर या उद्दिष्टांकडे तितकेसे लक्ष दिले जात असावं असे वाटतं नाही.
मान्य
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Fri, 02/05/2021 - 17:44
नवीन
सर्वांचे आभार.
>> Bhakti >> NCERT चे सगळं मटेरियल मी वाचलं नाही म्हणून मला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. जेव्हडे वाचलं त्यात विचार प्रवृत्त करण्याचा प्रयत्न जुजबी वाटला - ओपन एनडेड प्रश्न दिसले नाही. पाढे पाठ करणे आणि गुणाकार करता येणे यासारखा हा फरक आहे.अकॅडेमिक रिगर शिवाय स्मृती कौशल्य भक्कम होत नाही.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Fri, 02/05/2021 - 18:09
नवीन
हो काही अंशी तुमच मत बरोबर आहे.पण त्यांचा content खुपचं. Precise असतो.नवे संदर्भ आणि भाषा सोपी असते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 02/05/2021 - 18:50
नवीन
मुलांत विकसित करण्यासाठी, रुजवण्यासाठी देणाऱ्यांची तेवढी तयारी कशी करून घेता येईल?
याच दशभूतांचा अभाव, हजारो विद्यार्थ्यांना डिंगऱ्या असूनही नौकरी कामधंद्या पासून वंचीत ठेवतो.
>>> हेच सध्याच्या पिढीतील बहुतांश शिक्षकांविषयी म्हणता येईल का?
जर तसे असेल तर हे शिक्षक "फ्युचर रेडी" कसे करता येतील?
कारण शिक्षक "तयार" झाल्याशिवाय पुढील गोष्टी कठीण आहेत.
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Fri, 02/05/2021 - 23:53
नवीन
>> शिक्षक "फ्युचर रेडी" कसे करता येतील ...
मिलियन डॉलर क्वसचन!! बी एड एम एड च्या अभ्यासक्रमात डोकावले पाहिजे. केवळ विषय ज्ञान असून चालत नाही, शिकवण्यासाठी लागणारे स्किल्सही हवेत. इन्स्ट्रुकशन डीझाइन अँड डिलिव्हरी विषय शिकवलं पाहिजे ... शिक्षकांना काही विशिष्ट स्किल्स प्रशिक्षण दिले पाहिजे...
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 02/06/2021 - 15:00
नवीन
शिक्षकांवर फार भिस्त राहील असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 02/06/2021 - 14:58
नवीन
लेख सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. पण भारतात नोकरी करण्यासाठी या इतक्या गोष्टी लागत असाव्यात का?
१) चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य असणे.
२) त्या कौशल्यानुरुप संधी मिळणे
३) वशिला/ओळख
४) ऑफिस पॉलिटिक्सचा तारतम्याने वापर करता येणे.
५) वरिष्ठांची मर्जी संपादन करणे.
ही कौशल्ये अधिक लागत असावीत असे वाटते.
चौकसपणा, हुशारी हे काहीवेळा वरिष्ठांना त्रासदायक गुण असल्याने त्यापासून फायद्यापेक्षा तोटाही होऊ शकतो.
रँचो कितीही बुद्धिमान असला तरी त्याला संधी चतुरसारखे लाळघोटे काम करत असलेल्या कंपन्यांकडूनच मिळणे हेच वास्तव आहे. तांत्रिक ज्ञानात एडिसन बुद्धिमान होता पण टेस्ला त्याच्यापेक्षा हुशार होता. आजही एडिसनची कंपनी जिवंत आहे.हे टेस्लाला साधले नाही.म्हणजेच चांगली बौध्दिक पातळी वापरायची संधी मिळणे हे चांगली बौध्दिक पातळी असण्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Sat, 02/06/2021 - 21:29
नवीन
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Sat, 02/06/2021 - 21:30
नवीन
>> उपयोजक >> गुगल, युट्युब वर शिकण्यासाठी एकलव्याची निष्ठा आणि कष्ट हवेत ... :-O चांगली गोष्ट अशी की ते अंगठा मागणार नाही.
>> .. संधी मिळणे ... थोडे ऑप्टिमिस्टिक? टेस्ला कमर्शियल नव्हता, त्याला एक वेगळ्या विषयाने पछाडले आणि त्यांनी आपलच नुकसान करून घेतलं. तरीही काळाने न्याय दिलाच! आज त्याचे नववा जगात सगळे जण घेतात... एडिसन साहेबांचे पण काँट्रिब्युशन DC पॉवर जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्स उभे केले.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 02/07/2021 - 04:45
नवीन
सर सलामत तो पगडी पचास!
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sun, 02/07/2021 - 07:11
नवीन
गुगल,युट्यूब असो की इमारतीत भरणारी शाळा. अर्धवट ज्ञान असलेला शिक्षक कुठेही असू शकतो. पण युट्युब,गुगलचा फायदा हा की अर्धवट ज्ञान असलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ न बघण्याचा आणि ज्ञानी शिक्षकाचा व्हिडिओ बघण्याचा पर्याय सहजपणे उपलब्ध असतो.
हे चॅनल बघा. एका अशुद्ध मराठी भाषाशिक्षकाचे चॅनल.आनि पानि करणारा असा भाषा शिक्षक इमारतीत भेटला काय नि युट्यूबवर भेटला काय.तो काय मार्गदर्शन करणार?
https://youtu.be/CQ2rcu8Z-bU
टेस्लाचं नाव जरी आज गाजत असलं तरी टेस्लाला याचा काहीच फायदा झाला नाही.तुम्ही नोकरीच्या दृष्टीने म्हणालात ना! त्यादृष्टीनं म्हणालो.
बाकी टेस्ला बुद्धिमान होता हे मान्यच आहे.पण तो काळ वेगळा होता.आज संशोधनासाठी चिकार पैसा लागतो.एकट्याने संशोधन करणे बरेच खर्चात पडते.त्यासाठी कोणत्यातरी संशोधन संस्थेचे पाठबळ हवे.ते मिळण्यासाठी मी वर म्हणालो ते गुण/अवगुण अपरिहार्य असावेत असे वाटते.
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Sun, 02/07/2021 - 14:08
नवीन
>> न बघण्याचा आणि बघण्याचा पर्याय सहजपणे उपलब्ध असतो.
सर्वच बाबतीत सहमत. ही चर्चा क्रिटिकल थिंकिंग का महत्वाचे हे दाखवते. सर्व बाजू जेव्हा बरोबर वाटतात तेव्हा पुढे कसे जावे हे दिसते ... क्रिटिकल थिंकिंगचा हाच खरा उपयोग
- Log in or register to post comments
र
राजा वळसंगकर
Sat, 02/20/2021 - 14:06
नवीन
गप्पा मारताना कुणीतरी प्रश्न विचारला - चिकित्सक आणि अति-चिकित्सक फरक करायला कस शिकवायचे? Any suggestions?
- Log in or register to post comments