Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... पौष व. १३ शहाजहान बादशहाचे निधन !

A
Ashutosh badave
Sun, 02/14/2021 - 07:03
💬 1 प्रतिसाद
shahanjahan शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले. शहाबुद्दीन मुहमद किरान उर्फ शहाजहान हा जहांगीर ऊर्फ सलीमचा जोधपूरच्या राजकन्येपासून झालेला पुत्र होय. सन १६२८ मध्ये हा गादीवर आला. सर्व आप्तांचा नायनाट करून याने सन १६३७ मध्ये शहाजी राजांचा पराभव केला व अहमदनगरच्या निजामशाहीचा सर्व मुलूख आपल्या ताब्यांत आणला. युरोपियन लोकांच्या बायतीत हा मोठा धूत होता. त्यांनी धर्माच्या बाबतीत हात न घालावा म्हणून हा अत्यंत दक्ष असे. पोर्तुगीझ धार्मिक जुलूम करतात, म्हणून याने हुबळी नदीच्या काठी असलेली त्यांची वखार लुटली. असफरखानाची मुलगी मुमताज ही शहाजहानची बायको होती. या मुमताजवर त्याचे फारच प्रेम होते. याची कारकीर्द म्हणजे मोगल अमदानीचे सुवर्णयुग होय. हलींचे दिल्ली शहर यमुनेच्या कांठावर यानेंच बसविले. हा मोठा विलासी व रंगेल असे. जुम्मा मशीद, मोती मशीद, दिवाणी आम, दिवाणी खास, वगैरे प्रेक्षणीय इमारती यानेच बांधिल्या. हा बादशहा वृद्ध झाला तेव्हां याचा वडील मुलगा दारा शुकोह राज्यकारभार पाहूं लागला. पुढे औरंगजेबाने सर्व बंधूंचा नायनाट करून आपला पिता शहाजहानास यालाच कैदेत टाकलें व राज्य बळकावले. पित्याला त्याने कैकवेळा विष घालून मारण्याचा यत्न केला. आठ वर्षांची कैद शहाजहानास भोगावी लागली, आणि त्यांतच त्याचा अंत झाला. शहाजहान इतरांविषयी बेपर्वा, वर्तनांत गर्विष्ठ, स्थिर वृत्तीचा व शांत स्वभावाचा होता. युद्धकलेत त्यांचे प्रावीण्य विशेष होते. राज्यकारभारांत तो बराच कुशल होता. त्याच्या दरबाराचा डौल विशेष थाटाचा असे. कविताश्रवण, संगीत, नृत्य, नाटक इत्यादींची त्याला विशेष आवड होती. सुप्रसिद्ध मयूरसिंहासनाची निर्मिति यानेच केली. -२२ जानेवारी १६६६

प्रतिक्रिया द्या
997 वाचन

💬 प्रतिसाद (1)
श
शशिकांत ओक Sun, 02/14/2021 - 19:19 नवीन
शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले.
हा बादशहा वृद्ध झाला तेव्हा याचा वडील मुलगा दारा शुकोह राज्यकारभार पाहू लागला. पुढे औरंगजेबाने सर्व बंधूंचा नायनाट करून आपला पिता शहाजहानास यालाच कैदेत टाकले व राज्य बळकावले. पित्याला त्याने कैक वेळा विष घालून मारण्याचा यत्न केला. आठ वर्षांची कैद शहाजहानास भोगावी लागली, आणि त्यातच त्याचा अंत झाला .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा