जे न देखे रवी...

मुक्त

Primary tabs

आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..

अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..

भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..

राघव

वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-)

गणेशा

कविता आवडली..

@ तुषार (पैलवान )

दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते
त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..

सरीवर सरी

जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली.
गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी?

सरीवर सरी

सुनीत बद्दल योग्य माहिती मला नाही.ही यमक योजनेतील कविता आहे.
राघव , तुषार कविता आवडली ,छान वाटलं.