जे न देखे रवी...
'असेल घडले' आज काही इतिहासात :(
Primary tabs
असेल घडले आज काही इतिहासात
पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास?
असेल घडले आज काही इतिहासात
लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात?
असेल घडले आज काही इतिहासात
आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच
असेल घडले आज काही इतिहासात
घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात
असेल घडले आज काही इतिहासात
स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात
=))
कविता आवडली.
प्रत्येकाची चॉईस आहे. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी स्क्रोल चा पर्याय आहेच. तुमचा आणि इतिहासाचं वाकडं आहे वाटतं..
पण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हे ही खरं.
हा .... हा .... हा .... !
शेवट भारी !
😀
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत.
खरडी टाकायच्या आणि अंगठे येतात. पण फेसबुक हे इंस्टंट मेसेजिंग आहे. असे लेख टाकण्यासाठी उपयोगाचे नाही.
मिपासारख्या संस्थळावर एक रचनाबद्ध लेख - प्रतिसाद वाचून करमणूक होते. पण काही ठराविक विषय न ठेवता भरकटल्याप्रमाणे बदलल्याने वाचण्याचा उत्साह राहात नाही. पंढरपुरची माहिती संकलीत केली तर उत्तम. पण अचानक कोणत्याही लढाईचा, गावाचा इतिहास पाठवतात. कंटाळवाणे होत जाते. पण कुणाला काय लिहू नको सांगणारा मी कोण हा प्रश्न पडतो. स्क्रोल करूच पण गंमत जाते.
कविता मनोरंजक झाली आहे.
चांगलं लिहित्या माणसाला हतोत्साहित करणे बरे वाटत नाही.पण सदर लेखक फॉरवर्डेड वाटाव्यात अशा पोस्ट अनेक दिवस फेकत होते.त्यावर ना स्वत:चं काही मत ना अजून काही.
प्रा. बिरुटे सर इतरवेळी सुमार लेखांची गर्दी वाढली की 'पो' टाकू नका , 'शेळीच्या लेंड्यांगत' लेख नकोत असा प्रेमळ दम देतात. तो या आशुतोषना देताना काही दिसेनात इतका ढिगारा फेकूनसुद्धा! मला वाटलं सरांच्या नजरेतून हे सुटलं असावं.म्हणून माझ्या ष्टाईलने जरा विडंबन. ;)
हो. त्यांचे लेख फेबुला वाचले होते. व्हॉअॅला पण फॉरर्वर्ड होत असतात.
अशी दिनांक्/तिथी नुसार दिनविशेष वृत्तपत्रात देखील छापून येत असते.
बर, ही ऐतिहासिक माहिती आहे, रोचक असते पण यावर काय प्रतिसाद टंकायचा हे कळत नाही.
यांच्यासाठी वेगळा विभागकरून तिथीनुसार. इ-बुक बनवल्यास उत्तम.
सहमत आहे