जे न देखे रवी...
जेव्हा अदम्य ऐसी
Primary tabs
जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते
अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून साक्षी उरते
दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते
अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो
निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत
अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो
अप्रतिम..
शब्द अवघड असले तरी त्यामागचा अर्थ जबरदस्त आहे..
खूप दिवसांनी कविता विभाग उघडला..
मस्त वाटले कविता वाचुन...
कवितेचं शीर्षक पाहिलं आणि ओळखलं की तुमचीच कविता असणार.
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत..
क्या बात!
आवडली, खुपच आवडली
पैजारबुवा,
सुदंर
सुदंर
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
आवडले. :-)