भटकंती

वेळासबद्द्ल माहिती हवी आहे.

Primary tabs

मी बर्याच दिवसांपासुन (खर तर वर्षांपासुन ) वेळास कासव महोत्सव बघण्यासाठी जायचा विचार करतोय पण दरवेळेस काही कारणाने नाही जाता आलं. मागच्याच महिन्यात आम्ही कार घेतली तेव्हा ठरवल कि यावर्षी नक्कि जायच. मी मिपावर यासंबंधित लेख शोधले पण मला नाही सापडले. तरी कुणाला काही माहिती असल्यास सांगणे. आम्ही २ कपल जाणार आहोत.

१. तारखा.
२. शनी-रवि जावे कि इतर दिवशी जेणेकरुन महोत्सव निट बघता येइल.
३. राहण्यासाठी घरगुती सोय असल्यास व त्यांचा मोबाईल क्र मिळाल्यास उत्तम.
४. पिंपळे गुरव पुणे येथुन जाणार आहे त्याप्रमाणे रूट. (म्हणजे रस्ता त्यातल्या त्यात बरा असेल असा कारण सध्या मुंबई-गोवा रस्त्यावर बरिच कामं चालू आहेत)
५. २ दिवसांचा प्लान आहे त्यामुळे आसपासची बघता येतील अशी ठिकाणं
६. कासव महोत्सवासाठी काही शुल्क असते का? असल्यास किती आणि ते कुठे भरतात?

धन्यवाद.

आम्ही, त्यांचे बोट पकडून गेलो होतो ....

एकदा अनुभव घेऊ शकता, पण शनिवारी किंवा रविवारी जाऊ नका, इतर सुट्टीचे दिवस पण टाळा ....

खूप गर्दी असते

वेदांत

You may call one of the members at Kasav Mitra Mandal, Velas or Mr. Mohan Upadhye 02350 220304 / 8983767388 / 8975622778.

https://www.snmcpn.org/turtle-festival/velas-turtle-festival

होम स्टे
https://www.snmcpn.org/turtle-festival/velas-turtle-festival/kasav-mitr…

जवळची ठिकाणे :-
बाणकोट किल्ला
हरेहरेश्वर समुद्र किनारा
दापोली

https://www.esakal.com/saptarang/tortoise-village-velas-192587

कंजूस

वेळासच्या सुतिकागृहातच जातात. अल्याडपल्याडचे हरिहरेश्वर / केळशी टाळतात.

तस पण माझ केळशी आणि हरिहरेश्वर आधिच फिरुन झाल्यामुळे यावेळेस फक्त वेळास आणि बाणकोट... आणि आराम...

चौथा कोनाडा

वेळास कासव महोत्सवाचा विषय निघालाच आहे तर " कासव " सिनेमा सुद्धा जरूर पाहून घ्या.
कासव महोत्सवाचा अतिशय हळूवार आणि समर्पक वापर केला आहे या पारितोषिक विजेत्या सिनेमात !

https://www.youtube.com/watch?v=jIKxutHEbRU&list=PLIhkZrXl0xdXXJvGQnZVv…