जे न देखे रवी...
भगवंत....
Primary tabs
भगवंत..!!
भुकेल्यास देई अन्न,
दुर्बलास धीर,
आंधळ्याची काठी होई,
तोच खरा थोर...
दीनजन सेवेसाठी,
झिजवी "तो" शरीर,
याचकासि कर्ण होई,
तोच खरा थोर...
तान्हुल्यास क्षीर देई,
तृषार्तास नीर,
कुणा द्रौपदीस चीर देई,
तोच खरा थोर...
अनाथांची होई माय,
शत्रुपुढे वीर,
पतितांना उद्धरुन नेई,
तोच खरा थोर...
कुणी म्हणती गुरु त्याला,
कुणी म्हणे संत,
सर्वांतरी तोच आहे,
माझा भगवंत.....!!!
जयगंधा..
२४-२-२०२१.
तान्हुल्यास क्षीर देई,
तृषार्तास नीर,
कुणा द्रौपदीस चीर देई,
तोच खरा थोर...
भारी..
धन्यवाद
चांगली आहे रचना. आवडली.
धन्यवाद
सर्वांतरी तोच आहे,
माझा भगवंत.....!
धन्यवाद