जे न देखे रवी...

ठिपके

Primary tabs

शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,

पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,

चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.

राजगडावरच्या मुक्कामी असा अनुभव बर्‍याच वेळा घेतला आहे.
पण तो शब्दात व्यक्त करण्याची हातोटी केवळ तुमच्या कडेच आहे.
पैजारबुवा,

गणेशा

चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.

वाह..

गवि

उत्कृष्ट. वर उल्लेख आल्याप्रमाणे बोरकर आठवले.