Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थोतांड..थोतांड..थोतांड..

ग
गवि
गुरुवार, 03/04/2021 - 07:55
💬 61 प्रतिसाद
थोतांड थोतांड थोतांड.. जे जे पहावे ते थोतांड.. नाझींचे थैमान? थोतांड न्यूटन महान? थोतांड धरतीची गोलाई? थोतांड नभाची निळाई? थोतांड चंद्रावर स्वारी? थोतांड मंगळाची वारी? थोतांड कार्बन उत्सर्ग? थोतांड कोरोना संसर्ग? थोतांड बोसांचे मरण? थोतांड नर्मदा धरण? थोतांड ग्लोबल वार्मिंग? थोतांड त्सुनामी वार्निंग? थोतांड वृक्षांची निकड? थोतांड इव्हीएम निवड? थोतांड विमान नाहीसे? थोतांड आरोप बाईचे? थोतांड नऊ अकरा? थोतांड पृथ्वीच्या चकरा? थोतांड लसीला होकार? थोतांड चिन्यांची माघार? थोतांड हे विश्वचि सारे थोतांड प्रस्थापितांचे कुभांड पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध जगापुढे मांड..जगापुढे मांड..!! .... हलके घेतल्यास आजन्म आभारी..!! ;-)

प्रतिक्रिया द्या
26544 वाचन

💬 प्रतिसाद (61)
च
चौथा कोनाडा Fri, 03/26/2021 - 18:18 नवीन
उत्तम निरिक्षण ! शेवटच्या तीनचार ओळी सावध करताहेत. आपलया सारख्या चेंगराचेंगरीच्या देशात किमान अंतर हा संशोधनाचाच विषय ठरावा. दंड कोणाकोणाला करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
म
मराठी_माणूस Sat, 03/27/2021 - 09:09 नवीन
पूर्ण लॉक डाऊन गेल्या वर्षी काही महिने होते तरी covid बाधित लोकांची संख्या प्रचंड वाढत च होती.
बरोबर, ह्या बद्दल कोणीच काहीच बोलत नाहीत. सगळी जबाबदारी लोकांवर ढकलणे चालु आहे. माध्यमे सतत हेच ऐकवत/छापत असतात.
काही तरी नक्की चुकतंय.
ह्याचा खोलवर विचार व्हायला हवा, वैद्दक शास्त्र कमी पडते आहे का हे तपासायला हवे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
क
कंजूस Fri, 03/26/2021 - 14:11 नवीन
कपोलकल्पित कथांनी. हुक वापरू नका. पोतं फाटेल.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 03/26/2021 - 15:30 नवीन
थोतांड कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 03/30/2021 - 16:39 नवीन
कविता आवडली, गवि..
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 03/30/2021 - 17:51 नवीन
थोतांडच थोतांड ? थोतांड..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 04/04/2021 - 10:04 नवीन
अमूक इंच थोतांड तमूक मिनिटे थोतांड
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/04/2021 - 12:01 नवीन
अमूक इंच थोतांड तमूक मिनिटे थोतांड
गुरुजी, कशाबद्दल आहे, खुलासा प्लीज. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 04/04/2021 - 12:47 नवीन
नाक किती इंच?लांब किंवा मोठे राज्यारोहण आणि बरखास्त - वेळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/04/2021 - 13:38 नवीन
तुम्ही जर, खुलासा केला नसता तर माझा गैरसमज झाला असता. आभारी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 04/04/2021 - 14:18 नवीन
आकलनशक्ती मोठीच हो तुमची. असो. पण मी नोंद केलेल्या थोतांडा वरचे उपाय आणखी मोठे थोतांड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा