अतिरेक्यांचे राष्ट्रीयत्व
💬 प्रतिसाद
(6)
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/28/2008 - 17:15
नवीन
मला तर मुंबईची आणि देशाची काळजीच वाटत आहे. आर.आर. पाटील तर अगदी थरथर कापत होते परवाच्या दिवशी. कसे होणार आहे माझ्या देशाचे. अजून मंदीचा फटका इतका बसलाच नाही तर अशा प्रकारचा दहशतवाद सुरू साला आहे. पुढे काय होईल. आता चालू असलेला दहशतवाद जर या कारणाने वाढला तर जगाला त्याच्याशी लढणे फारच अवघड जाईल. अराजक माजेल अशी भिती वाटते आहे.
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/28/2008 - 17:36
नवीन
आपल्यास देशातील अतिरेकी जबाबदार आहेत. हे अतिरेकी बंदूका घेऊन जाणारे नाहीत तर बंदुका घेऊन जाणार्यांकडे दुर्लक्ष केवळ पैशाच्या हावेचा अतिरेक करणारे आहेत असे वाटते.
सहमत आहे. अहो, या विषयावर कितीही बोलले तरी कमीच आहे. क्षणीक मोहापायी अजून किती वीरमरणे आणि निरपराधांची हत्या पाहावी लागणार कोणास ठाऊक ! लोकशाही यंत्रणेची संवेदनशुन्यता तर अंगवळणी झाली आहे.
राजकर्त्यांची स्वार्थी, संकूचित धोरणे, दहशतवाद पोसतात. बाहेरचे अतिरेकी येथील तरुणांना हाताशी धरतात जर बातमी खरी असेल तर( मटाची बातमी ) घरातल्याच माणसांनी घरातल्या लोकांना गोळ्या घालाव्यात ..तिसरा दिवस आहे पण अजून खात्री नाही की संपूर्ण अतिरेक्यांचा खातमा झाला की नाही म्हणून. छ्या स्वतःचीच चीड येते...काहीच लिहावे वाटत नाही ...
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 11/28/2008 - 17:48
नवीन
विकासरावांशी पूर्ण सहमत
+१
-( :( ) ऋषिकेश
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 11/28/2008 - 19:12
नवीन
ज्या थाळीत खातात त्याच थाळीत हगणात हे अतिरेकी... दोन्ही प्रकारचे - जे स्वतः अतिरेकी आहेत ते व जे त्यांना डोळ्याआड करतात ते सुद्धा. या सगळ्यांनाच कडक धोरण राबवून कंठस्नान घालायला हवे.
छ्या स्वतःचीच चीड येते...काहीच लिहावे वाटत नाही ...
आगदी मनातले बोललात डॉक्टर साहेब.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 11/28/2008 - 17:55
नवीन
दहशत वाद आणि त्यांचे हमले अवघ्या जगाला ग्रासलेला आहे..
माझ्या देशाला आणि मुंबईला.. वाचव या सगळ्यातून! हीच प्रार्थना करते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ग
गोरख
Sat, 11/29/2008 - 03:45
नवीन
आनि मायबाप सर्कार अजुन निर्वनिचा इशारा देत आहे...
आता यान्चेच निर्वान बाकि आहे....
- Log in or register to post comments