जे न देखे रवी...

विरूपिका (२) : भविष्य

Primary tabs

विरूपिका - २ : भविष्य

छत्रीप्रमाणे अवकाशाची
उघडझाप
करणार्‍या तुझ्या हातावर

हे परमेश्वरा!

आकाशगंगेची दिगंत धनरेषा,
शुक्राचा उंचवटा,
सर्व ठीक.
पण तुला परदेशगमनाचा योग नाही.

-विंदा करंदीकर

मुक्तसुनीत

तुमचे पुन्हा एकदा आभार !

करंदीकरांची यापेक्षाही एक अगदी छोटी , २ ओळींची विरुपिका अंधुकशी आठवते . कुठल्या एका कवितेमुळे क्षुद्रपणा, कोतेपणा, संकुचितपणा यांच्यापासून दूर रहायला शिकवले असेल तर ती ही विरूपिका :

"त्याने मागे एकदा कधीतरी समुद्रात लघवी केली.
आणि मग राहिलेले आयुष्य
त्यामुळे समुद्राची खोली किती वाढली
याचे गणित करण्यात घालविले."

(शब्द अचूक नाहीत.)