जे न देखे रवी...

ते तुझ्याचपाशी होते

Primary tabs

सळसळत्या झाडावरती
किलबिलणार्‍या पंखांनी
आणले नभातून जे जे
ते तुझ्याचपाशी होते

अर्थाचे अनवट कशिदे
विणणार्‍या चित्रखुणांना
जे जटिल असूनही कळले
ते तुझ्याचपाशी होते

तार्‍यांच्या मिथककथांचा
आकाशपाळणा अडता
जे पुरातनाला सुचले
ते तुझ्याचपाशी होते

कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीसी काशी
हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी

पैजारबुवा,