चाफा-पंचप्राण
चाफ्याच्या पाच पाकळ्यांनी एकत्रितपणे पंचप्राण पेलले आहेत.याचा गंध कोमलपणा ,बहरण्याची मुक्त छटा आपल्या पंचइंद्रीयांना अमूर्त आनंद देते.देवचाफा ,गुलाबी रंगाचा चाफा ,सोनचाफा या प्रकारच्या फुलांच्या सुगंधाच्या राशींनी परिसर घमघमला आहे.वसंतोत्सवामध्ये चाफ्याच्या फुलांची रेलचेल फांद्याफांद्यावर दिसते.दगडाला पाझर फुटणे जसे ओलावा देते,तसेच डहाळीवर चाफ्याची असंख्य फुललेली फुले ओबड धोबड फांद्यांची शोभा वाढवतात.
काहीसा पोपटी देठ मनामध्ये सुखाची नांदी सांगतो.तर अर्धोन्मिलित उमललेल्या अवस्थेतील सोनचाफा समाधिस्त भासतो.
चाफ्याच्या फुलांनी परसबागा ,उद्याने,मंदिरे राऊळे अगदी मनोहर केला आहे.सकाळच्या ,दुपारच्या आणि वेचून घेतलेल्या यां संध्याकाळच्या तिन्ही प्रहारेच्या या बहरलेल्या फुलांनीअनेकांच्या मनात कायमचा वसंत टवटवीत ठेवला आहे.ओंजळीत वेचून घेतलेल्या पंचपाकळ्यांनी पंचप्राण अलगद मिठीत घेण्याचे तत्व शिकवले आहे.
-भक्ती
तो-"ये कोनसी जगाह है?" ती-"ये मेरी जगाह है,कही नहीं मिली तो यही मिलूंगी"...अस म्हणत सिनेमातील गौप्य चाफ्याचा झाडाशी उलगडत.तिच्या अंगणातला चाफा तिच्यासारखाच, निघाला. बहरलाच नाही. माझ्या परसातला चाफा नेहमीच गच्च फुलतो, बहरतो, पूर्वीही आणि आत्ताही.....!बाकी सर हळवे झाले म्हणजे बातच और.. तुमच्या या आठवणींची मिपा २०२० दिवाळी अंकासाठी वाट पाहिली होती..पण तुमचा लेख नाही दिसला त्यात.. धन्यवाद! :)