जे न देखे रवी...
खिडकी
Primary tabs
क्षितिजावरचा
निळसर पर्वत
कातळमाथा
ढगात घुसळत
भूशास्त्राला
कोडी घालत
खोल ठेऊनी
लाव्हा धुमसत
पुरातनाचे
सूक्त गुणगुणत
नभरेषेवर
उंच उसळुनी
दिसे अनाहूत माझ्या खिडकीत
निळे पाखरू
पहाटफुटणीत
पंखभिजवत्या
दवास झटकत
चोच मुलायम
पिसात फिरवीत
पंखांतील
अचपळ बळ जोखीत
साद घालुनी
अधीर, अवचित
नभांगणाला
उभे छेदुनी
उतरे अलगद माझ्या खिडकीत
आखीव रेखीव
खिडकी चौकट
निळ्या नभाचा
कापुनी आयत
इंद्रजाल
निळसर पसरवुनी
जड चेतन द्वैताला मिटवीत
इंद्रजाल
निळसर पसरवुनी
जड चेतन द्वैताला मिटवीत
सुरेख..
पहिल कडव जरासं कवितेपासून दूर वाटलं पण..
निळे पाखरू
पहाटफुटणीत
पंखभिजवत्या
दवास झटकत
चोच मुलायम
पिसात फिरवीत
पंखांतील
अचपळ बळ जोखीत
साद घालुनी
अधीर, अवचित
वा क्या बात... अप्रतिम
आवडली
पैजारबुवा,
सरी, गणेशा, पैजारबुवा प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.