जे न देखे रवी...
कविता - कृष्णधून
Primary tabs
*कृष्णधून*
पहाटवा-याची
निशब्द धून ,
मावळती चंद्रकोर,
फिकटशी !!
झाडांची सळसळ,
प्राजक्त सडा,
धुक्याची चादर,
पुसटशी !!
आकाशी उधळण,
सप्तरंगांची,
घरट्यात चिवचिव,
नाजुकशी !!
पक्ष्यांचे थवे,
उडती रावे,
मोहक किलबिल,
ऐकावीशी !!
अलगद जाग,
स्वप्नाचा भास
खुदकन हसू,
गालापाशी !!
पडता कानी,
कृष्णधून
मन होई राधा,
लागे समाधीशी !!
-©️वृंदा
19/3/21
पडता कानी,
कृष्णधून
मन होई राधा,
लागे समाधीशी !!
सर्वच ओळी खास... शेवटच्या चार ओळीही खासच आहेत,
आवडल्याही पण शेवटच्या ओळीतला शब्दला, लयीत येत नाही असे वाटले.
बाकी लिहिते राहा.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
छान शब्दबद्ध केली आहे कविता..
आवडली.
पुढील लेखनास शुभेच्छा.
धन्यवाद