पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२
लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.
पिफ्फ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर सावट जाणवू लागले. महोत्सवा भरवण्यासाठी आर्थिक रसद मिळणे अवघड झाले. शासन आणि विविध यंत्रणांचा कोरोनाच्या आर्थिक आव्हानाला पुरे पाडण्यासाठी धडपड सुरु होती. शेवटी एकदाचा जानेवारी २०२१ होता होता मार्च मध्ये कोविडनियमानुसार ५०% प्रेक्षकांसह पुण्याच्या मोजक्या चित्रपटगृहांमध्ये करण्याचे ठरले. पण हाय रे दैवा, कोरोनाचा विळखा पुन्हा वाढत चालला तसा पिफ्फला ऑनलाईन येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. १८ मार्च पासून सुरु झालेल्या पिफ्फचा आज म्हणजे २५ मार्च २०२१ रोजी शेवटचा दिवस आहे.
या वेळच्या ऑनलाईन पिफ्फचं वैशिष्टय म्हणजे न्यझीलँडच्या " शिफ्ट ७२" तंत्रज्ञानाचा वापर. या तंत्रज्ञानामुळे एका प्रेक्षकाला एकावेळी एकच डिव्हाईस वर लॉगिन करता येणार, चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही, स्क्रीन शॉट घेता येणार नाही. आणि एक चित्रपट ८ तासाच्या अवधीत कधीही पाहता येणार !
या ऑनलाईन पिफ्फला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं जातंय.
" शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान माझ्या माहितीनुसार भारताच प्रथमच वापरलं जात आहे.
शिफ्ट ७२ जसं जसं भारतात रुळत जाईल तसं तसं पायरसीच्या क्षेत्राला जबरदस्त धक्का बसणार आहे,
भारतीय मनोरंजन सृष्टीत आगामी काळात प्रचन्ड उलथापालथ चित्र पूर्ण बदलून जाईल असं वाटतंय.
या क्षेत्रातले भुरटे चोर उपाशी मारण्याची शक्यता आहे !
तुमचा आता पर्यंत शिफ्ट ७२ शी संबंध आला आहे का ? कसं काम करतं हे तंत्र ?
पायरसीवाल्या लोकांना या तंत्रज्ञानाला पुढेमागे झुकांडी देता येईल ?
भारतीय आयटी तंत्रज्ञांचा कायम उदोउदो केला जातो, मग अश्या तंत्राचा शोध भारतात का लागू शकत नाही ?
भारत यात का आत्मनिर्भर होऊ शकत नाही ? दरवेळी भारताला इतर प्रगत देशांकडेच का पाहावे लागते ?
तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ?
पिफ्फ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर सावट जाणवू लागले. महोत्सवा भरवण्यासाठी आर्थिक रसद मिळणे अवघड झाले. शासन आणि विविध यंत्रणांचा कोरोनाच्या आर्थिक आव्हानाला पुरे पाडण्यासाठी धडपड सुरु होती. शेवटी एकदाचा जानेवारी २०२१ होता होता मार्च मध्ये कोविडनियमानुसार ५०% प्रेक्षकांसह पुण्याच्या मोजक्या चित्रपटगृहांमध्ये करण्याचे ठरले. पण हाय रे दैवा, कोरोनाचा विळखा पुन्हा वाढत चालला तसा पिफ्फला ऑनलाईन येण्याशिवाय गत्यंतर नव्हते. १८ मार्च पासून सुरु झालेल्या पिफ्फचा आज म्हणजे २५ मार्च २०२१ रोजी शेवटचा दिवस आहे.
या वेळच्या ऑनलाईन पिफ्फचं वैशिष्टय म्हणजे न्यझीलँडच्या " शिफ्ट ७२" तंत्रज्ञानाचा वापर. या तंत्रज्ञानामुळे एका प्रेक्षकाला एकावेळी एकच डिव्हाईस वर लॉगिन करता येणार, चित्रपट प्रेक्षकाच्या नावाचा वॉटरमार्क दिसत असल्याने कॉपी घेता येणार नाही, स्क्रीन शॉट घेता येणार नाही. आणि एक चित्रपट ८ तासाच्या अवधीत कधीही पाहता येणार !
या ऑनलाईन पिफ्फला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं जातंय.
" शिफ्ट ७२" हे तंत्रज्ञान माझ्या माहितीनुसार भारताच प्रथमच वापरलं जात आहे.
हे वाचून पोपट झाला ! अर्थात का ते त्या खालचा परिच्छेद वाचून स्पष्ट झालं ! आमच्या सारख्या नॉन-आयटी लोकांना शिफ्ट७२ सारखं नविन काही दिसलं की भारी वाटतं ! (वाटणारच, कारण जे आपल्याला नाही ठावे, ते आपल्या दृष्टीने भारी) प्रतिसाद तपशिल पुरेसे स्पष्ट करतात ते फिचर आहे, आणि पायरसीवाले त्यांचे बाप आहेत. +१ बाकी, आम्हीतर चोरमंडळीपैकीच आहोत ! 😀 धन्यवाद, टर्मीनेटर 👍