Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकरांच्या वाचनखुणा.

ट
टर्मीनेटर
Wed, 03/31/2021 - 16:40
💬 158 प्रतिसाद
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे. १) इब्न बतूत - भाग १ जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका. २) मोसाद - भाग १ कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका. ३) मक्केतील उठाव १ हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका. वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो! आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂 आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.

प्रतिक्रिया द्या
58818 वाचन

💬 प्रतिसाद (158)
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Wed, 03/31/2021 - 17:04 नवीन
छान कल्पना आहे. माझ्यासारख्या नव मिपाकरांना उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 03/31/2021 - 17:09 नवीन
छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/31/2021 - 19:00 नवीन
माझ्याकडे खुप म्हणजे खुप वाचनखुणा आहेत, कोणाकोणाच्या कथा येथे देऊ? एकाचे दिले तर दुसरी पण भारी. त्यामुळे मी पुन्हा वाचून, वेळ मिळेल तशी लिंक्स एक एक जुन्या पासून नविनकडे असे येथे सांगत जाईल. आत्ताच एक होती वैदही हि वाचनखुण पाहतोय
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 04/01/2021 - 07:00 नवीन
ॲबसेंट माइंडेड, कुमार१, गणेशा प्रतिसादासाठी आपले आभार. कुमार साहेब तुमच्या वाचनखुणा आमच्या बरोबर शेअर कराव्यात हि नम्र विनंती. गणेशा भाऊ तुमच्या सारख्या जुन्या मिपाकराकडे भरपूर वाचनखुणा असणे स्वाभाविक आहे. तुमच्या सवडीने त्या शेअर करा काही घाई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
व
विश्वनिर्माता Wed, 03/31/2021 - 19:30 नवीन
माझे मिपावचन असावे तितके नाहीये. हा एक लेख साठवलेला- तस्मै श्री गुरवे नमः- सतीश गावडे हि कविता छान वाटलेली- दुर्वास
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 04/01/2021 - 07:02 नवीन
विश्वनिर्माता साहेब तुम्ही शेअर केलेल्या वाचनखुणांसाठी आपले मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनिर्माता
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 04/01/2021 - 18:23 नवीन
तस्मै श्री गुरवे नमः हा लेख अतिशय आवडला. दुर्वास कविताही छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनिर्माता
स
सतिश गावडे Fri, 04/02/2021 - 17:45 नवीन
धन्यवाद विश्वनिर्माता साहेब __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनिर्माता
प
पाषाणभेद Wed, 03/31/2021 - 19:42 नवीन
असल्या सार्वजनिक वाचनखुणा, बुकमार्क, प्रसिद्ध धाग्यांची यादी, आवडलेले धागे यावर माझा कायमच आक्षेप असणार आहे. एक धागालेखक म्हणून मला हे अयोग्य वाटते आहे. आता तुम्ही सकस लेखन कायमच वरती राहणार, अमूक असे मुद्दे उपस्थित करणार. पण लक्षात घ्या की हा एक फोरम आहे. मला माझे बोलणे निट शब्दबद्ध करता येत नाही पण ही अनुचीत प्रथा आहे. ज्यांना माझे बोलणे योग्य वाटत आहे त्यांनी हा मुद्दा अधीक विस्तारपूर्वक मांडावा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 04/01/2021 - 07:04 नवीन
प्रतिसादासाठी आपले आभार. माझे विचार/मते सर्वांना पटलेच पाहिजेत असा माझा दुराग्रह अजिबात नाही. वॆचारिक मतभेद असू शकतात हे मला मान्य असल्याने तुमच्या मताचाही आदर आहे. जमिनीवर लिहिलेला आकडा एकच असला तरी तुमच्या बाजूने तो 6 दिसेल तर माझ्या बाजूने तो 9 दिसेल. दोघांची उत्तरे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असली तरी ती वेगवेगळी असण्याचे कारण हे आपले 'दृष्टिकोन' असल्याने माझ्या मताच्या समर्थनार्थ आणि तुमच्या मताचे खंडन करण्यासाठी पुढे कुठलेही मुद्दे उपस्थित करून निरर्थक वादविवाद/चर्चा करत बसण्यात वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची चैन मला परवडणारी नाही. कळावे, लोभ असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/01/2021 - 07:34 नवीन
किंचीत सहामत. वाचनखुणा वाचून असे सुप्रसिद्ध धागे वरती राहतील आणि काही नवीन पण चांगले धागे खाली जातील. पण हे नेहमीच होईल असं नाही. उदा रामदास, फारएण्ड, जे पी मॉर्गन, बोका ए आझम, यांचं दर्जेदार लेखन कमी आहे का? ते कुठं वरती येतं? चार-पाच-सहा वर्षे जुन्या सदस्यांना कदाचित ते लेखन माहिती असेल. एखादा नवीन सदस्य आला तर मिपावरचे सुरुवातीपासून उत्तम, दर्जेदार, लोकप्रिय लेख जर त्या नवसदस्याला सापडले, तर तो आल्या पावली मिपाचा फ्यान होईल! मला नऊ वर्षे झालीत. मी बर्‍यापैकी सक्रीय आहे. तरी अजून काही मोती अवचित सापडतात. मग अशा वाचनखूणा एकत्र असल्याचा फायदा हा तोट्यांपेक्षा जास्त असावा. उदा रामदास यांची एक शृंगारिक कविता. भडकमकर मास्तरांचा एक संपादकीय विशेष लेख - और कितना गिरना बाकी है? ही मोत्ये नव्या सदस्यांना देणं हे जुन्या-जाणत्यांचं कर्तव्य नाही का?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/01/2021 - 08:18 नवीन
बरोबर.. आता ह्या दोन्हीचा मध्य साधायचा असेल, तर या धाग्यावर ज्या लिंक्स दिल्या जातील त्याला प्रतिसाद न देता ज्यांना वाचायचे आहे त्यांनी वाचले तर जुने धागे वरती न येऊन पाषाणभेद म्हणतात तसे हि होईल.. आणि तुम्ही आणि धागाकर्ता यांचा हेतू हि साध्य होईल.. फक्त याच एका धाग्याला प्रतिसाद लिंक देऊन वरती आणायचे बस.. एखादे खुप्पच आवडले तर येथेच सांगायचे.. ( स्वगत : आजकाल मला सगळेच बरोबर का वाटायला लागलेत? काय माहित :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 07:01 नवीन
और कितना गिरना बाकी है? ळेख कालातीत आहे. आज देखील लोकांची मानसीकता बदलल्याचे आकडेवारी बघुन वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/01/2021 - 08:32 नवीन
फडताळातली पैठणी काढल्यावर जो आनंद एखाद्या गृहिणीला होत असेल तसेच काहीसे धागा वाचताना होणार आहे. एखादे पुस्तक जर आपल्याला आवडले तर आपण ते आपल्या मित्रांना सुचवतो तसाच हा धागा आहे. अशा प्रकारचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. राष्ट्रकाकू गिरिजा यांनी सुध्दा अशा प्रकारचा प्रयत्न केला होता काही जुन्या लेखनांचे धागे मोदकसरांनी काढलेला आम्हा घरी धन.. ह्या मलिकेचे सगळे धागे माझ्या वाखु मधे आहेत आणि त्यातला प्रत्येक प्रतिसाद वाचनिय आहे. आम्हां घरी धन... (२) आम्हां घरी धन.....(३) हा इसम हल्ली मिपावर का येत नाही ते माहित नाही. माझ्या वाखुमधला असाच एक धागा नांदेडियन यांनी काढलेला खाद्यभ्रमंती - पुणे मारवा यांचा साज़ पण माझ्या वाखु मधे आहे. या शिवाय टर्मिनेटर काकांचा स्मायली / Emoji आणि त्यांचीच फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी वाखु मधे साठवलेली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 04/01/2021 - 20:14 नवीन
राम्राम पैजारबुवा.. मला सर कधीपासून म्हणायला लागलात..? **************** वाचनखुणांचा विषय सुरू आहे म्हणून... पैजारबुवांचा एक प्रतिसाद वाचनखुण म्हणून जपून ठेवला आहे. खदाखदा हसण्यासाठी नक्की वाचा.. ;) लोणीऽऽ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
B
Bhakti Fri, 04/02/2021 - 05:53 नवीन
धागा लयी भारी असा!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 07:43 नवीन
लोणीऽऽ.. धम्माल प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/02/2021 - 09:09 नवीन
लोणी विसरला नाहीस अजून? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/02/2021 - 09:13 नवीन
शाहीर ते शाहीर ! आपल्या प्रा डॉ.नी लिहिलेला. अशी दणक्यात सुरुवात झाल्यानंतर मिपा जे सुसाट सुटले ते सुटलेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 19:29 नवीन
शाहीर ते शाहीर ! माहीतीपुर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 14:05 नवीन
साज़ लेख आवडला आणी त्यावरचे जाणकारांचे प्रतिसाद सुद्धा आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
र
राघव गुरुवार, 04/01/2021 - 09:23 नवीन
माझ्या काही वाचनखुणा: जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग तिरंगा शोध शिव: मूर्तीशास्त्र पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील हिममानव यती - सत्य की मिथक? शल्या ! शाळेतील गमती जमती पाऊस.. बाकी मिपा हॉल ऑफ फेम ची कल्पना उत्तमच. त्यासाठी खरंच एखादं वेगळं दालन असावं. त्यात कोणते धागे डकवले जातील ते कसे ठरवायचे हा जास्त मोठा प्रश्न आहे. :-) उदा: - एक हॉल ऑफ फेम निवड समिती असावी ज्यात कमीतकमी २० तरी जाणते सभासद असावेत. - हॉल ऑफ फेम मधे निवड होण्यासाठी सदस्य धाग्यावर रेकमेंडेशन देऊ शकतील. - या रेकमेंडेशन्स ना बघून त्यावर निवड समिती त्यांच्या कार्यपद्धतीनं निर्णय घेऊ शकेल. - ही कार्यपद्धती निवडसमितीनं स्वतः ठरवावी आणि प्रसिद्ध करावी. त्यांचा निर्णय अंतीम असेल. हे केवळ एक उदा आहे. असेच व्हावे असे म्हणत नाही. काही वेगळेही धोरण असू शकेल. राहिले जुने धागे वर येण्याचा प्रकार. त्यात मला खरेतर काही चूक वाटत नाही. पण अगदीच नको वाटत असेल तर हॉल ऑफ फेम मधल्या धाग्यांवरील प्रतिसादांनी, केवळ त्या दालनातच ते धागे खालीवर व्हावेत. अशाने मुख्य नवीन लेखनाच्या दालनात ते येणार नाहीत. यासाठी काही खास सुविधा तयार कराव्या लागतील, पण त्या तशा केल्यास जास्त चांगले. उदा: डेटाबेसमधे हॉल ऑफ फेम चा वेगळा टेबलच ठेवला आणि त्याचे प्रतिसाद तेथेच वेगळे ट्रॅक केले तर हे होऊ शकेल. अर्थात् हा केवळ एक अंदाज आहे म्हणा. पण हे सर्व काम एक खूप मोठं आणि वेगळं प्रोजेक्ट आहे. भरपूर वेळ लागेल असं. आपले व्याप सांभाळून हे करणं बरंच जिकिरीचं असणार. साधा आराखडाच बनवायला २-३ महिने सहज लागतील. :-)
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 04/03/2021 - 08:36 नवीन
जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग राघव साहेब तुमची हि वाचनखुण अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 04/03/2021 - 09:07 नवीन
तिरंगा अफाट निरीक्षणशक्ती व सेन्स ॲाफ ह्युमर लाभले आहे फारएंड साहेबांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 04/03/2021 - 11:05 नवीन
शिव: मूर्तीशास्त्र काय अफाट व्यासंग म्हणायचा प्रचेतस साहेबांचा. हॅट्स ॲाफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 04/03/2021 - 13:30 नवीन
हिममानव यती - सत्य की मिथक? वाचनीय लेख. माहीती संकलनावर घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 04/03/2021 - 18:47 नवीन
शल्या ! सुरेख व्यक्तीचित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
B
Bhakti Sun, 04/04/2021 - 07:44 नवीन
शल्या मलापण आवडला..मारा सिनेमा आठवला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 04/04/2021 - 07:54 नवीन
मारा हा सिनेमा माहीत नाही. युट्युबवर आहे का? असे कथानक असेल तर बघायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
B
Bhakti Sun, 04/04/2021 - 09:53 नवीन
प्राइमवर आहे. मारा या दक्षिण भाषीय सिनेमा आहे,चार्ली या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. त्याचाच देवा हा मराठी रिमेक सिनेमा आहे. (मी देवा नाही पाहिला.) शल्या म्हणजे वेल्लया वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 04/04/2021 - 10:12 नवीन
प्राईमवर हिंदीत असेल तर बघतो आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
त
तिता गुरुवार, 04/01/2021 - 09:40 नवीन
मक्केतील उठाव फारच सुन्दर आहे.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 18:14 नवीन
मक्केतील उठाव हो खरंच फार सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिता
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/01/2021 - 09:43 नवीन
प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे सर्वच धागे आवडतात. पण वल्लीच्या प्रतिभेचा विलक्षण अविष्कार असलेली कार्ल्यांच्या लेण्यांवरील ही अप्रतिम कथा खुपच आवडली मामाडे लेनेस वलुरकेस
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 09:20 नवीन
मामाडे लेनेस वलुरकेस सुरेख लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
प
प्रचेतस Fri, 04/02/2021 - 11:13 नवीन
धन्यवाद मालक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
B
Bhakti Sun, 04/04/2021 - 07:50 नवीन
वाह!! खुपचं सुंदर लेखनशैली! एकविरा आईमुळे मलापण कार्ला खुप मनातलं ठिकाण आहे. लेखात सांगितल्याप्रमाणे खरच चैत्यगृह खूपच शांत आणि अनोखं आहे,मलापण प्रचिती आली. मला वाटलं होतं अजिंठा ह्या सर्वात जून्या लेण्या आहेत,कार्ला त्याहून जून्या आहेत हे समजलं.. फोटो अत्यंत सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
सिरुसेरि गुरुवार, 04/01/2021 - 10:12 नवीन
लक्षात राहिलेले लेख / कथा / कविता - काटे कोरांटीची फुले , मोकलाया दाही दिशा .
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 11:46 नवीन
यांच्या लिंक्स मिळतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ग
गणेशा Fri, 04/02/2021 - 11:55 नवीन
http://misalpav.com/node/4488 काटे कोरांटीची फुले - रामदास. माझी पहिल्या ३ मधली हि वाचनखुण होती..:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 12:34 नवीन
काटे कोरांटीची फुले अतिशय मनस्पर्षी कथा. खुप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा गुरुवार, 04/01/2021 - 10:13 नवीन
एक होती वैदही - नीधप..२००९ --- रोज वहीचे नविन पान.. नविन आयुष्य.. आणि रोज नंतर कायम बरोबर एकच बुरसटलेले अस्तित्व
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/02/2021 - 10:08 नवीन
एक होती वैदेही अनवट कथा मनाला भिडली. असे आयुष्य जगणे कथेत ठीक पण वास्तवात कुणाच्या नशीबी येउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
प्रचेतस गुरुवार, 04/01/2021 - 13:05 नवीन
उत्तम धागा. माझ्या काही वाचनखुणा अशा छायाचित्रण भाग १२. प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्त्वे एस यांची छायाचित्रणकलेविषयक ही उत्तम लेखमाला. (जी त्यांनी अजूनही अर्धवट ठेवली आहे :) ) शिव तांडव स्तोत्र - मराठी अनुवाद नरेन्द्र गोळे यांनी केलेला शिवताण्डव स्तोत्राचा हा सुरेख मराठी अनुवाद. विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ६ लेखक जयंत कुलकर्णी-फक्त नावच पुरेसे आहे, त्यांचे कुठलेही वाचा, उत्तमच आहे. इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४) मनोबाची ही अर्धवट राहिलेली एक उत्तम लेखमाला असा हा पूर्वांचल विश्वास कल्याणकरांचा पूर्वांचलावरील एक उत्तम लेख. तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२ ५० फक्त यांची एक कथामालिका
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Fri, 04/09/2021 - 06:06 नवीन
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४) या माहीतीपुर्ण लेख मालिकेचे चारही भाग आवडले. लेखकाने पुढचे भाग लिहुन ती पुर्ण करावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नीलस्वप्निल गुरुवार, 04/01/2021 - 19:27 नवीन
छान कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/01/2021 - 19:34 नवीन
http://misalpav.com/node/14394 नॉर्वेच्या दरीखोऱ्यातून - मितान
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/02/2021 - 05:19 नवीन
http://www.misalpav.com/node/18907 करण आणि फ्रेंड्स - विनित संखे
  • Log in or register to post comments
स
सरीवर सरी Fri, 04/02/2021 - 08:58 नवीन
हा धागा सागर मंथनासारखाच आहे. दुर्वास (करूण रस) आणि एक शृंगारिक कविता (शृंगार रस) अतिशय भावविभोर कविता आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/02/2021 - 11:08 नवीन
http://misalpav.com/node/15344 दास्तान.. ए.. आवरगी - गगन विहारी अर्थात गवि. ( ह्या धाग्याचा सर्वात जास्त फायदा मला झालाय, कारण मागच्या माझ्याच वाचनखुणा.. त्या कथा मी पार विसरून गेलो होतो.. पुन्हा वाचुनच लिंक देतोय.. फक्त वरची ३२-३४ भागाची नाही वाचली पुन्हा ) गवि यांनी लिहिलेली विमान दुर्घटना झालेली आणि मानसिक आजारी असलेल्या माणसाची कथा माझ्या विशेष आवडीची होती.. वाचनखूण असेल.. नसेल तर कोणी दिली तरी चालेल..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा