एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?
नमस्कार मिपा मंडळी,
बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल
आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले.
सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो.
या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी -
० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात.
० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा.
ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
💬 प्रतिसाद
(99)
प
प्रचेतस
Sat, 04/03/2021 - 05:31
नवीन
ही तुमची पळवाट आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/03/2021 - 05:00
नवीन
डाॅक्टर सुबोध खरे, यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत....
शिवाय तुम्हाला 70% प्राॅफिट शेयर दिला आहे...
अजून काय हवे?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 05:04
नवीन
मला जे कमवायचे आहे ते मी कमावले आहे आणि कमवत आहे. मी मूर्खासारखी आह्वाने स्वीकारत नाही कारण मी १ कोटी मिळवून दाखवतो असा दावा केलेला नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/03/2021 - 05:45
नवीन
सुबोध खरे यांनी, ठराविक काळा पर्यंत नेले आहे....
मला तरी, सुबोध खरे यांच्या, गणितात काहीच चूक दिसत नाही...
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 05:52
नवीन
खरे यांनी ज्या घटकांचा विचार करायचे टाळले आहे, त्याकडे तुम्ही पण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/03/2021 - 05:57
नवीन
हे मान्य ...
मग कुठले घटक, टाळल्या गेले आहेत?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 05:59
नवीन
https://www.misalpav.com/comment/1101357#comment-1101357
- Log in or register to post comments
भ
भुजंग पाटील
Sat, 04/03/2021 - 05:35
नवीन
ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे? किंवा स्टॉक ची पण कुंडली असते का?
(हा प्रश्न मी खवचट पणे विचारतोय असा कृपा करून समज करू नये. आपण ज्योतिषावर ब्लॉग लिहितात म्हणून विचारतोय.)
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 05:50
नवीन
"ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे?"
कुणीकुणी हा उद्योग करतात. पण मी नाही.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Sat, 04/03/2021 - 06:08
नवीन
पण तुम्हाला ज्योतिषीय गणित आणि मार्केटचे लॉजिक ह्या दोन्ही बाबत उत्तम माहिती असणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/03/2021 - 06:52
नवीन
हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे
बरं बुवा
वितंडवाड सोडून द्या
पण मला एक सांगा तुमचे जे काही इतर टॅक्सेस ( १५ % STCG) ब्रोकरेज( ०. ०७ %) इ खर्च वजा जाता दर महिना साधारण ८ % टक्के इतका परतावा मिळाल्या हरकत नाही. मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे रुपये १०,०००/- चे अडीच वर्षात १ लाख रुपये होतात.
https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestcalculator.php
हे तरी तुम्हाला मान्य आहे का?
माझे केवळ एकच म्हणणे आहे. दर महिना ८ % सातत्याने महिनोन्महिने शेअर बाजारात पैसे मिळवणे शक्य नाही.
कारण ८ % महिना म्हणजे सरळ व्याजाने ९६ % वर्षाला होतात आणि दर महिना चक्रवाढ दराने १५०% टक्के होतात.
सरळ व्याजाने ९६ % दर वर्षाला कायमस्वरूपी व्याज देणे कोणाला तरी शक्य होईल का?
(अगदी ७% व्याज असेल तरी सरळ व्याजाने ८४ % वर्षाला होतात आणि चक्रवाढ दराने १२५ %.)
याचे साधे आणि सुस्पष्ट उत्तर मला हवे आहे.
पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे.
याला कोण काय करणार?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 06:59
नवीन
हे मान्य आहे आणि मी स्वत:च्या अकाउंट मध्ये हेच टार्गेट ठेवले आहे. रक्कम वाढल्यावर इतर अनेक प्रश्न होतात. - उदा० एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते. मग पोर्ट्फोलिओ स्प्लिट करणे आले. स्प्लीट केल्यावर रिस्क वाढते आणि शक्यता कमी होत जाते.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/03/2021 - 07:02
नवीन
एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते.
जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:06
नवीन
"जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?"
एकदम मोठी ओर्डर दिल्यावर स्टॉक गडगडू शक्तो. लोकांना चवकशीच्या नोटीसा गेलेल्या आहेत. मला स्वतःला ब्रोकर ने सेबीचे सर्क्युलर पाठ्वून अॅलर्ट केले होते.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Sat, 04/03/2021 - 07:17
नवीन
मोघम नको. स्पेसिफिक सांगा. मी २५००० स्टेट बँक एका दिवशी सेल आणि बाय केले तर मला सेबी नोटीस पाठवेल का ? किंवा किती युनिट्सला सेबी नोटीस पाठवते ?
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:26
नवीन
"मोघम नको. स्पेसिफिक सांगा."
मला स्वतःला याची निश्चित उत्तरे मिळालेली नसल्याने मी देऊ शकणार नाही. पण एकदम मोठी डिलिव्हरी ओर्डर दिल्यास आयकर विभाग पण तुम्हाला चवकशीसाठी बोलवतो. अशी एक केस वाचली होती. बेसिकली त्यांना जेव्हा वाटते की एखादी व्यक्ती हावरट पणे किंवा दूष्ट हेतूने मोठे व्यवहार करत आहे. तेव्हा ते तुमच्या मागे लागतात.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Sat, 04/03/2021 - 07:34
नवीन
पण माझे अनेक क्लायंट आहेत ज्यांचा दैनिक टर्न ओव्हर काही करोड आहे. पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही. आयकर फक्त तुमच्या आय वर डोळा ठेवून असते त्यामुळे एकदम मोठी ऑर्डरला आयकर विभागाच्या पोटात दुखू नये.
युयुत्सुचा मराठी अर्थ सुबोध असा होतो का ? (उगाचच घुमते आहे डोक्यात.)
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:44
नवीन
पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही.
त्याचा जाब पण तुम्ही मला विचारणार का? सेबी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवत नसेल कशा वरून?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/03/2021 - 07:46
नवीन
Jhunjhunwala sold a little over 1.5 lakh shares at Rs 1,205.19 apiece, valuing the deal at Rs 18.17 crore.
२ मार्च याच दिवशी श्री राकेश झुनझुनवाला यांनी समभाग १२०५ रुपयाला एक असे विकले तेंव्हा हा समभाग १२३७वरून १४५० पर्यंत चढून १४०३ ला बंद झाला.
https://www.financialexpress.com/market/rakesh-jhunjhunwala-and-his-firm-rare-investments-sell-shares-worth-nearly-rs-65-crore-in-ion-exchange/2205099/
समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते
बाकी चालू द्या
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:58
नवीन
"समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते
बाकी चालू द्या"
तुमच्या मार्केट विषयक विद्वत्तेने मी अगोदरच दिपून गेलो आहे. आणखी दिपून जाणे मला झेपणारे नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 04/03/2021 - 08:37
नवीन
आणखी दिपून जाणे मला झेपणारे नाही.
ब्वॉर्र
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Sat, 04/03/2021 - 06:06
नवीन
पण ह्या आव्हानात थोडा बदल हवा. मूळ मुद्दा हा आहे कि युयुत्सु म्हणतात तसे महिना १०% कमावता येतात का ?
जर येत असतील तर नेहमी प्रमाणे एक लिंक खरे ह्यांनी दिली आहे.
त्या नुसार आठ वर्षात १००० चे एक करोड होतील आणि जर १०% कमावता येत नसतील तर आठ वर्षांनी १ करोड होणार नाहीत.
आता राहिला प्रश्न १ करोड रुपयांचा (किंवा आपल्या कुवतीनुसार युयुत्सु जेव्हढे जमा करू शकतील त्या पैशाचा) ते सर्व पैसे युयुत्सुनीच आपल्याकडे ठेवावेत.
कारण ते त्यांचे स्कील असेल आणि जे स्कील आहे कि नाही हे चेक करण्याची खाज शमवण्यासाठी ह्या वेळेस डॉक्टर युयुत्सुना फि देतील जी रुपये १००० असेल आणि आम्ही मिपाकर पंच म्हणून काम करू.
दोघांनी अत्यंत विचारपूर्वक ह्यावर निर्णय घ्यावा अन्यथा, उभयतांना ही साठमारी चालू ठेवून मिपाकरांचे रंजन करण्यातच धन्यता वाटते आहे असा निष्कर्ष काढावा लागेल.
इच्छा नसून देखील मी संख्या १ ने वाढवली आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 04/03/2021 - 06:24
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Sat, 04/03/2021 - 07:10
नवीन
मार्च ऑटो सेल्स आकडे बंम्पर आले आहेत. तर या सेक्टर मधील कोणता शेअर घ्यावा सध्या जो पुढे जास्त फायदा देईल.
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sat, 04/03/2021 - 07:13
नवीन
स्मार्ट मनी फुट प्रिंट स्ट्रटेजी हिरोमोटॉकॉप सुचवत आहे. पण स्वतःचा अभ्यास करून मगच घ्यावा.
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Sat, 04/03/2021 - 07:56
नवीन
७००० खाली मिळाल्यासौत्तम. ऑटो सेक्टरमध्ये सध्या याची चर्चा आहे.
- Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड…
Sat, 04/03/2021 - 08:19
नवीन
boys and their toys.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sat, 04/03/2021 - 22:01
नवीन
४२%
:)
- Log in or register to post comments
प
पी. के.
Mon, 04/05/2021 - 13:12
नवीन
वार्षिक २०% ओव्हररेटेड, मासिक १०% अंडररेटेड :)
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 04/06/2021 - 14:52
नवीन
हे शीर्षक फारच दिलखेचक आहे! :-)
पण यात बरेच गोंधळ निर्माण होतात की, नक्की लेखकाला म्हणायचे काय आहे? जसे -
१. दर महा १०% परतावा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि तो पुढच्या प्रत्येक महिन्यात १०% परतावा देईल अशी अपेक्षा करायची. पुरेसा फायदा दिसला की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे.
२. चालू महीन्यात किंवा साधारण नजिकच्या महिन्यात १०% परतावा देऊ शकणारा देणारा शेअर शोधायचा, घ्यायचा आणि १०% झाले की विकून टाकायचा. असे अनेक शेअर्स शोधायचे आणि विकत घेणे/विकणे करत रहायचे.
यापैकी पहिला प्रकार अशक्य आहे हे कुणीही सांगू शकेल, कारण त्यात ठेवलेली नियमीत १०% परतावा देण्याची अपेक्षा.
दुसरा प्रकार शक्य असू शकेल. पण दहाच का बरे, कमी/जास्त ही असू शकेल की.
शेअर्स शोधण्यासाठी आणि योग्य वेळेला विकत घेण्यासाठी/विकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. अशीच एक पद्धत लेखकानं शोधली असं दिसतंय. चांगलंय की. वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!
बाकी:
एखाद्याला फायदा मिळाला म्हणून अमुक शेअर घेणे आणि एखादी कंपनी अन् तिचा शेअर चांगला म्हणून अमुक शेअर घेणे, यात जो फरक आहे तोच तुम्ही जुगार खेळताय की व्यापार करताय हे ठरवतो.
कोणत्याही व्यापारात जसे चढ-उतार अपेक्षीत असतात ते इथेही असणारच. कदाचित थोडे जास्त प्रमाणात असतील. त्या चढ-उताराप्रमाणे आपल्या स्ट्रॅटेजीत बदल केला नाही तर आपण फसण्याचीच शक्यता जास्त. हे कोणत्याही प्रकारच्या व्यापारास लागू आहे. त्यामुळे तिकडे सतत लक्ष ठेवणे आणि निर्णय घेणे आपसुकच आले. पण सरसकट एकूण सगळ्या प्रकाराला सरळ जुगार म्हणणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण कसं त्याकडे बघतो आणि वागतो त्यावर ते ठरतं.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 03:55
नवीन
या धाग्याचे शीर्षक "एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?" असे आहे आणि असे दिसतंय कि युयुत्सु यांचं अभ्यासाप्रमाणे असा परतावा कसा मिलव्ययाचा हे त्यांना माहित आहे...
युयुत्सु आपण म्हणता तसे तंत्र विकसित केले असेल आणि आपला हेतू हि कदाचित चांगला असेल... पण लोक का प्रश्न विचारतात अ(सले दावे केले तर हे) जरा समजूत घ्याल अशी अपेक्षा
प्रथम मला वाटते कि हे युयुसत्सु यांनी नमूद करावे कि - यात डिलिव्हरी (म्हणजे सापम्पूर्ण पैसे भरून ) शेअर घेणे विकणे असे आहे कि कुठले लिव्हरेज त्यांनीवापरून असा परतावा (बॅक टेस्ट " केलं आहे कारण साधे आहे महिन्याला १०% काय दिवसाला पण १०% सहज कमवता किंवा गमावता येतात जर लिव्हरेज वापरले तर ! म्हणजे दिवसाचे ट्रेडिंग किंवा अंतर्गत लिव्हरेज असलेले शेअरफूचर किंवा शेअर वरील ऑप्शन
मी असे धरून चालतो सध्या कि हे लिएव्हरेज बद्दल बोलत नाहीयेत
तर मग असे डिलिव्हरी वापरून ( म्हणजे भांडवल वाढले ) सातत्याने ८-१०% महिना परतवा मिळू शकतो हा फार मोठा दावा आहे ,
येथे "सातत्याने" हा शब्द महत्वाचा
असा दावा जर उघडपणे कोणी करीत असेल तर त्याला साहजिक आहे कोणीही म्हणले कि "अरे हा तर खूप मोठ्ठा दावा आहे काही प्रत्यक्ष स्वतःच्या पैशाचा धोका घेऊन असे मिळवलाय का आणि किती काळ?"
म्हणूच येथे डॉक्टर खरे यांनी आणि इतरांनी असं विचारला तर यात काहीच गैर नाही
यावर ना चिडता किंवा "मला गरज " नाही असली उत्तर ना देता आपण केलेला दावा सिद्ध करता आला तर धागाकर्तायचा मान वाढेल ... नाहीतर मग साहजिकच " कशाला हे लिहलंय , हेतू काय असे प्रश्न येतातातच
अंतर्जालावर , कोविद च्या आधी प्रत्यक्ष "सेमिनार" मधून वैगरे अनेक ट्रेडिंग गुरु असली व्यक्तवे करीत असतात पण एक पण गुरु ऑडिट केलेलं ब्रोकर स्टेटमेंट दाखवू शकत नाही ..वरती अरेरावी अशी कि "मी हे समाजासाठी करतोय!
तेव्हा असल्या "लाखोपती कसे बनाल" न्यान विकणाऱ्यांना माझ्य शब्दकोशात तरी एकच उत्तर आहे " बाप दाखव नाही तर श्राध्द कर"
ज्याला कोणाला अशी १०% जादूची कांडी मिळाली असेल ती वापरून त्याने खालील पैकी एक तरी गोष्ट करून दाखवावी
१) स्वतः कमवून हे गुपित कोणाला सांगू नये ( समाजसेवा करायची तर ती मग त्या पैशातून करावी )
२) सेबी प्रमाणित लायसन घेऊन लोकांना अशी सेवा पैसे घेऊन पुरवावी आणि येणाऱ्या टीकेला किंवा कौतुकच मानकरी व्हावे !
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 04:27
नवीन
आधीचा धागा पण वाचला त्यात एक प्रश्न उभा केलं गेला होता कि खालील पैकी नक्की काय म्हणणे आहे धागाकर्त्याचे ?
१) महिन्याला १०% चढ उतार होणारे शेअर शोधता येतात .. आणि असतात
कि
२) महिन्याला १०% परतावा सातत्त्याने मिळवत येतो
- जर धागाकर्ता विधान क्रमांक 1 करीत असेल तर ...जगभरच्या शेअर बाजारात अशी चढ उतार करणारे शेअर निश्चितच असतात ,, खास करून मेडिकल डिवाइस किंवा खाण क्षेत्रातील ... त्यामुळे त्या दाव्यात काही चुकीचे नाही .. प्रश्न फक्त राहतो मग सापडले तर धोका धागाकर्तायने खरंच घेतलाय कि नुसता अभ्यास !
- जर धागाकर्ता विधान क्रमांक २ करीत असले तर मात्र भरपूर प्रश्न उभे राहतात कि ज्यांवर चर्चा आधी झाली आहे
मला तरी धागाकर्त्यालाच नक्की दावा कळला नाहीये
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 04:45
नवीन
चौकस२१२, राघव
यात कॉमनसेन्स अपेक्षित आहे. वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे कोणत्याही स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट परिस्थितीनुसार बदलतो. ताजे उदा० द्यायचे झाले तर मार्केट पडणार असे माझे न्युरल नेट तंत्र फेब्रुवारीपासून सांगत होते. अशा काळात स्ट्रॅटेजीने सुचवलेले सर्वच शेअर्स १०% देऊ शकले नाहीत (कारण स्ट्रॅटेजी फक्त शेअर्स सुचवते, भविष्याचा वेध घेत नाही (आता या चर्चेच्या निमित्ताने आणखी एक खाद्य डोक्याला मिळाले :) ) . पण जमेची बाजू अशी की ते फार पडले पण नाहीत. ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ...
पण "रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. पोझिशनल ट्रेडींग साठी एक महिन्याच्या कालवधित १०% देऊ शकणारे शेअर्स शोधणे हे रास्त उद्दीष्ट असू शकते, इतकाच माझा दावा आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 05:07
नवीन
ठीक आहे "स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट" आपला चांगला असले तर चांगली गोष्ट आहे .. आपल्या धाग्याचे शीर्षक मात्र असे आहे कि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले , आशा करूयात आपल्याला हे तरी मान्य होईल ...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 05:12
नवीन
"रास्त उद्दीष्ट" ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही
हो मान्य
प्रश्न असा होता कि हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे का आणि जे कोणी म्हणते कि शक्य आहे त्याने ते
१)मांडण्यामागे काय हेतू आहे ...
२) प्रत्यक्ष बाजारात धोका पत्करून सध्या केल्याचा काही पुरावा आहे का? कि नुसताच अभ्यास ! आधीचया घडामोडीवर बेतलेला BACK TESTING
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 05:20
नवीन
माझ्या फेबु ग्रुपमध्ये मी हे जाहिर करतो. वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही.
"मांडण्यामागे काय हेतू आहे "
मिपावरील एका जुन्या चर्चेच्या अनुरोधाने घेतलेला शोध.
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 04/07/2021 - 10:44
नवीन
हाच कॉमनसेन्स मी आपणांस सांगतोय. आपल्या जुन्या धाग्याच्या शीर्षकात दर महा म्हटले आहे आणि इथे आपण एक महिन्याच्या कालावधीचा विचार मांडता आहात. त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय.
बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. त्यासाठीच मी माझ्या प्रतिसादात आपणांस शुभेच्छा दिल्या आहेत. असो.
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 13:27
नवीन
"त्यामुळे आपले लेखन/प्रतिसाद आणि धाग्याचे शीर्षक यात स्वतःच अंतर्विरोध दिसतोय."
आपल्याला अंतर्विरोध दिसला याबद्दल क्षमस्व! "दर महा" या शब्दप्रयोगावरून मागील धाग्यात गोंधळ उडाल्याने यावेळी काळजी घेऊन जास्त योग्य शब्द योजना केली इतकंच.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 14:19
नवीन
अगदी बरोबर राघव ...मुळात धाग्याला आकर्षक शीर्षक द्यायचे आणि मग जरा कोणी खोलात जाऊन विचारले कि पुरावा देण्याचे टाळायचे ... महिना १०% कमाई हा दावा वाचला आणि मनात विचार आला कि मग हे जर शक्य असेल तर कोण कशाला प्रसिद्धी देईल ! गुपचूप १०% कमवत बसेल कि...आणि त्याचे चक्रवाढ पद्धतीने किती होतील
बाकी रास्त उद्दीष्टाची कल्पना कुणालाही अमान्य होण्याचे काहीच कारण नाही. हे मान्यच आहे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 06:15
नवीन
युयुत्सु आपण एक/ दोन गोष्टी लक्षात घ्या
जो कोणी उघडपणे "मी अमुक अमुक टक्के परतवा मिळवतो" हे जाहीर करतो आणि जेव्हा विचारले जाते कि मग खरं दाखवा व तर "वैयक्तिक व्यवहार मी उघड करू इच्छित नाही."
हि पळवाट वाटते..
सर्व "ट्रेडिंग मला येते शिकवणारे " गुरु हीच पळवाट काढतात...
व्यासायिक रित्या सेबी च्या अधिपत्यसुखाली असलेल्या हि पळवाट शक्य नसते .. फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो .. तरच मग लोकं त्या फुंडकडे आकर्षित होतात (अर्थात तुम्ही म्हणाल मी काही फंड मॅनेजर नाही )
बरं फेसबुक वर सगळे जण नसतात आपण फेसबुक वर काय हे जाहिर करता ते माहित नाही... वेळ असेल तर तो इथे चिकटवा
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 07:26
नवीन
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही ते त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 07:26
नवीन
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही. माझ्यावर विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा नाही. मार्केटमध्ये रास्त अपेक्षा ठेवऊन काम करणे फार महत्त्वाचे असते. माझ्यासाठी हे रास्त अपेक्षेचे आह्वान मी स्वीकारले. माझ्या तंत्रामधला जो भाग शेअर करता येण्यासारखा आहे, तो शेअर केला आहेच. त्याचे महत्त्व जाणकरांना समजले आहेच. जे उघड केले नाही त्यातील अडचणी मो़कळे पणाने सांगितल्या आहेत. असो...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 14:23
नवीन
आपले तंत्र एक तंत्र म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही हो .. प्रश्न आहे १०% महा असले दावे करणे .. त्यापेक्ष आपण फक्त "शेर शोधनाची २ तत्वे / तंत्रे " असे काही लिहिले असते तर आधीच्या वर्षीच्या धाग्यात आणि यात पण एवढा धुरळा उडालं नसता !
तुम्ही माझ्याकडे यावे अशी माझी अपेक्षा नाही.
जेथे -६०% ते +१०% महिना असा दावा केला जातो त्याकडे कोण जाणार !
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 13:28
नवीन
"फंड म्यानेजर ला त्याचा आधीच्या "परफॉर्मन्स " चा लेखा जोखा द्यावा लागतो "
तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो. मी स्वत:च्या पैशाने खेळतो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 14:12
नवीन
तो लोकांचा पैसा घेऊन खेळतो
हो माहिती आहे आणि तुम्ही फंड मॅनेजर नाही हे हि माहित आहे .. मुद्दा होता "एखाद्याने दावे करणे आणि त्याचे प्रत्यक्ष जोखीम पत्करून दाखवल्याचे पुरावे ना देणे हा..."
पण तुम्हाला असे प्रश्न विचारलेलं आवडले दिसत नाहीये ( आपला आधीचा खरे यांचं बरोबर चा संवाद !) पण एकीकडे "मला कसे जादूची कांडी सापडली आहे " हे विधान मात्र आपण केलेत
असो ज्याची गुंतवणूक ६० खाली जाते आणि नंतर असा दावा करण्यात येतो कि "महिना १०% कमाई होऊ शकते" हे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं दिसतंय ..
अंटार्र्जलवरील अनेक "ट्रेडिंग गुरु" पैकी नमुना ..
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Wed, 04/07/2021 - 14:25
नवीन
तुम्हाला सुताने स्वर्ग गाठायला फार आवडते असे दिसते. मी स्वत:ला ट्रेडींग गुरु मानत नाही आणि मला कोणी म्हणावे असे ही मला वाटत नाही.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 04/07/2021 - 14:44
नवीन
तुम्ही स्वतःला ट्रेडिंग गुरु माना अथवा नाही ..ते सर्व जाऊद्या.. जो दावा केलाय त्याचा पुरावा देता का ? तुम्हीं ती तंत्र वापरून असा परतावा आणि तो सुद्धा लांब पर्यंत मिळवलाय का ... आणि सुतावरून स्वर्ग हे काय .. दावा तुम्ही करणार आणि कोणी विचारलं तर उत्तर टाळणार ! मग लोक शंका घेणारच ...
तंत्र असेल हो तुमचे चांगले नाही घेतली शंका.. प्रश्न मोठाल्ले दावे करण्याचा आहे ...मी एकटा नाही इतरांनीही यावर प्रश्न विचारले आहेत
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sun, 05/02/2021 - 06:23
नवीन
माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization)
High probability stocks जास्तीत जास्त अचूकतेने ओळखण्यासाठी या कल्पनाचित्राची मदत होते. या आकृतीमधले रंगीत मणी समभागांचे निदर्शक आहेत.
हिरवे आणि तांबडे हे पडलेले समभाग आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु झाली (तिमाही निकाल, व्यवसाय बातम्या) की ते त्यांचा रंग बदलतो ते निळ्या गटात येतात. निळ्या आणि काळ्या गटातल्या समभागांमध्ये भरमसाठ खरेदी चालू आहे. सर्वात धोकादायक समभाग काळ्या गटातले आहेत. कारण त्यातली बेसुमार खरेदी अतिलोभापोटी आहे म्हणून निळ्या गटातले समभाग हवा तसा परतावा देण्याची शक्यता जास्त. याशिवाय यांची खरेदी मोठ्या धेंडानी (smart money) केलेली असते. त्यामुळे यातील काही समभाग तात्पुरते खाली आले तरी नंतर ते लगेचच वर जातात. उदा० Dredging Corp मधली मोठी खरेदी तांबड्या वर्तुळाने दाखवली आहे. या नंतर हा समभाग करेक्ट झाला आहे. पण विक्रीचा व्हॉल्युम तूलनेने कमी आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.
टीप - १% वाल्याना हे कळावे अशी अपेक्षा नाही
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
Sun, 05/02/2021 - 06:26
नवीन
माझ्या ट्रेडींग मॉडेलचे कल्पनाचित्र (visualization)
High probability stocks जास्तीत जास्त अचूकतेने ओळखण्यासाठी या कल्पनाचित्राची मदत होते. या आकृतीमधले रंगीत मणी समभागांचे निदर्शक आहेत.
हिरवे आणि तांबडे हे पडलेले समभाग आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु झाली (तिमाही निकाल, व्यवसाय बातम्या) की ते त्यांचा रंग बदलतो ते निळ्या गटात येतात. निळ्या आणि काळ्या गटातल्या समभागांमध्ये भरमसाठ खरेदी चालू आहे. सर्वात धोकादायक समभाग काळ्या गटातले आहेत. कारण त्यातली बेसुमार खरेदी अतिलोभापोटी आहे म्हणून निळ्या गटातले समभाग हवा तसा परतावा देण्याची शक्यता जास्त. याशिवाय यांची खरेदी मोठ्या धेंडानी (smart money) केलेली असते. त्यामुळे यातील काही समभाग तात्पुरते खाली आले तरी नंतर ते लगेचच वर जातात. उदा० Dredging Corp मधली मोठी खरेदी तांबड्या वर्तुळाने दाखवली आहे. या नंतर हा समभाग करेक्ट झाला आहे. पण विक्रीचा व्हॉल्युम तूलनेने कमी आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही.
टीप - १% वाल्याना हे कळावे अशी अपेक्षा नाही
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2