म्युच्युअल फंड्स .... हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग (भाग - १)
ही लेखमाला लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे गणेशा भाऊंची "शेअर मार्केटची बाराखडी" ही लेखमाला. या लेखमालेत शेअर्स मध्ये गुंतवणूक कशी करावी (विशेषतः Position Trading) हे उत्तम पणे सांगत आहेत ... अर्थात ही प्रक्रिया किचकट आहे. तसेच High Risk High Gain हे तत्व इथेही लागू होते.
पण ज्यांना अशा पद्धतीने ट्रेडिंग शक्य नाही (अभ्यास नाही / वेळ नाही / रिस्क ची तयारी नाही ) त्यांच्या साठी दुसरा पर्याय काय ? माझ्या स्वतः च्या अनुभवावरून बऱ्याच गोष्टी शिकलो. सुरवातीला डे ट्रेडिंग / पोझिशन ट्रेडिंग केले. शेअर्स घेऊन लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट (३+ वर्षे) ही केली. यात बराच फायदा आणि पुरेसा तोटाही पहिला. हे करत असताना गेली बारा तेरा वर्षे म्यॅच्युअल फंड्स मध्ये सिप (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहे. आणि आज मी खात्रीने सांगू शकतो कि याप्रकारे योग्य गुंतवणूक केली तर नक्की कोट्यधीश होता येते
_____________________________________________________________________________________________________________________________
म्युच्युयल फंड्स मुखतः ३ प्रकारात विभागले जातात
१. इक्विटी
२. डेट
३. हायब्रीड
या प्रत्येकाचे अनेक उपप्रकार आहे जसे small cap, mid cap, large cap, focused, sectoral, Gold ETF, US opportunity, FMP इत्यादि इत्यादि .....
या सर्वांचे फायदे - तोटे आहेत. त्याच्या आढावा आपण पुढल्या भागात घेऊच
तत्पूर्वी म्युच्युअल फंड्स इन्व्हटमेंट्स चे मूलभूत नियम बघू या
१. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी
याचे सोपे उत्तर म्हणजे .. सर्वानी गुंतवणूक करावी. सिप (SIP) च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत धन संचय करण्यासाठी आहे.
२. म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक करावी ?
याचेही सोपे उत्तर जास्तीत जास्त ...
दरमहा किती सिप करावी हे ठरवण्याचे दोन मार्ग आहेत ...
अ) आपले टार्गेट व कालावधी ठरवावा व SIP calculator वापरून गुंतवणूक किती ते ठरवावे
SIP calculator : https://www.mutualfundssahihai.com/en/calculators
उदाहरणार्थ मला पुढच्या १५ वर्षात ५० लाख रुपये जमा करायचे आहेत (रिटायरमेंट फंड). तर १२% CAGR धरला तर मला फक्त दहा हजार महिना SIP च्या माध्यमातून गुंतवावे लागतील. ...
ब) दुसरा मार्ग म्हणजे आपले उपन्न आणि खर्च याचा अंदाज घेऊन आपण किती रक्कम गुंतवयाची ते ठरवावे
यात एक महत्वाची गोष्ट... सिप ची रक्कम एका महिन्याच्या सूचनेने बदलता येते. नोकरी करणाऱ्यांसाठी दरवर्षी पगार वाढ झाली कि सिप ची रक्कम वाढवावी
३. शिस्तबद्ध गुंतवणूक :
सिप मुळे दरमहा ठरलेल्या तारखेला ठराविक रक्कम जाते त्यामुळे एक आर्थिक शिस्त रहाते
४. गुंतिवणुकीची तरलता (Liquidity)
साधारणतः ३ दिवसात आपली रक्कम (मार्केट व्हॅल्यू नुसार) काढून घेता येते. पण त्याच वेळी हे पण लक्षात घ्यावे कि मार्केट हे आपल्याला अनुकूल असेलच असे नाही .. त्यामुळे साधारणतः: योग्य बाजारभाव हवा असेल तर साधारणतः ३ महिन्याचा कालावधी गृहीत धरावा
थोडक्यात ही गुंतवणूक medium liquidity देते
५. एकदा सिप चालू केल्यावर रोज पोर्टफोलिओ बघू नये. तसेच वारंवार म्युच्यअल फंड्स च्या योजना बदलू नयेत. तीन महिन्यातून एकदा परीक्षण (review ) करणे योग्य
६. डेट - इक्विटी रेशो
तुमची किती टक्के गुंतवणूक डेट फंडात आणि किती टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करावी हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते .
उदाहरणार्थ ३० ते ४० वयोगटातील नोकरी करणारा माणूस जास्त रिस्क घेऊ शकतो . अशा लोंकासाठी साधारणतः ८०-२० किंवा ७०-३० (८०% इक्विटी - २०% डेट ) योग्य आहे, जसजसे वय वाढेल तसे हा रेशो ६०-४० किंवा ५०-५० करायला हरकत नाही
७. विविधता (diversification )
सिप ची रक्कम वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवावी तसेच सिप च्या तारखाही वेगवेगळ्या असाव्यात. जसे महिन्याच्या १ , ५, १० , १५ इत्यादी
आता पुढच्या भागात म्युच्युअल फंडाच्या योजनांचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे बघू या ...
____________________________________________________________________________________________________________________________
डिस्क्लेमर :
Mutual fund investments are subjected to market risk
Past results are no guarantee to future performance
I am one of the happy investor getting benefit of log term sustained investment. I am sharing my experiences & have no personal gains intended by this
💬 प्रतिसाद
(70)
ब
बिटाकाका
गुरुवार, 04/08/2021 - 20:31
नवीन
प्रतिसाद आवडला! प्रत्येकाचं गुंतवणूक, परतावा, आणि त्यातून करायची ऐश याचं तत्वज्ञान वेगळं असतं, पण वरील प्रतिसादाच्या गाभ्याशी मी सहमत आहे.
याच्याशी हजार बार सहमत! मी माझे टार्गेट ठरवतो आणि तिथे बाहेर पडतो. एकुणात तोट्याचे दुःख हे फायद्यात झालेल्या तोट्याच्या दुःखापेक्षा सुसह्य असते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे :)
- Log in or register to post comments
K
king_of_net
Fri, 04/09/2021 - 07:31
नवीन
चौकटराजा,
मी जी काही गुंतवणुक करत आहे ती retirement फंडसाठी करत आहे.
आज जो परतावा मिळत आहे तो अजुन ८-१० वर्षांनी ७०-८०% होउ शकतो.
SIP करताना Target ठरवणे खुप जरुरीचे आहे.
मजा करायला मला फंड्स विकायची गरज नाही. त्याची सोय पगारातुन केली आहे.
ज्यांना retirement साठी किती पैसे लागतील हे जाणुन घ्यायचे असेल, त्यांनी खालिल व्हिडिओ पहावा
https://www.youtube.com/watch?v=5oaRprVv0Go
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 04/08/2021 - 09:31
नवीन
लोकांची वेगवेगळी मते वाचत आहे. मी स्वतः म्युचुअल फंड निवडण्यासाठी ही किवा अशाच वेब साईट वापरतो(एच डी एफ सी चे उदाहरण घेतले आहे, उजव्या बाजुला वरती फंड फॅमिली ड्रॉप डाउन वापरुन कोणताही फंड बघु शकता)
https://www.moneycontrol.com/mutual-funds/amc-details/HD
१. मी एस आय पी चा पंखा आहे, आज माझा एस बी आय म्युचुअल फंडचा पोर्ट्फोलिओ ४०% तर एच डी एफ सीचा जवळपास ३५ टक्के नफा दाखवतोय तो केवळ थंड डोक्याने केलेल्या एस आय पी मुळेच. हे पैसे मी मुलांच्या शिक्षणासाठी जमवतोय. पण क्वचित गरज लागल्यास १०-२० हजार काढतोही. बँकेला हात घालण्यापेक्षा ते बरे पडते.
२. जर एंट्री/एग्झिट लोड्/कमिशन वगैरे टाळायचे असेल तर एक उपाय आहे. १० टॉप् म्युचुअल फंड घ्या. प्रत्येक म्युचुअल फंडचा एक कॉलम बनवा आणि त्याखाली तो म्युचुअल फंड कोणत्या कंपन्यांमधे पैसे गुंतवतो ती नावे(ही माहिती कुठेही वेबसाईटवर मिळते) लिहा. हे कोष्टक तयार झाले, की कुठल्या कंपन्या समान आहेत ते बघा आणि त्या कंपन्यांचे शेअर्स जमवायला सुरुवात करा--३-५ वर्षांचे टार्गेट ठेवुन. आता हे ओळखायला कुणा तज्ञाची गरज नाही की तुमच्या ह्या कोष्टकात विप्रो,इन्फोसिस्,टी सी एस, रिलायन्स,एच डी एफ सी,एस बी आय्,अॅक्सिस,आय टी सी,सन फार्मा या कंपन्या येणारच. कारण हे मार्केट लीडर्स आहेत. त्यामुळे जमेल तसे शेअर्स घेत रहा आणि मुलांची शिक्षणे,लग्ने,घर किवा कार खरेदी, गृह कर्ज फेडणे, परदेश वारी अशा वेळेला पाहीजे तेव्ह्ढे विकुन पैसे वापरा. या पर्यायात चांगली तरलता, कमी जोखीम, उत्तम परतावा, वाढती महागाई सगळेच साधेल. टॅक्स चा विचार करु नका. तो जायचा तेव्हढा जाणारच.पण कमिशन नक्की वाचेल.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 04/08/2021 - 09:45
नवीन
काहीसा असाच विचार केला होता. सकळ्या टॉप च्या कंपन्यात महिना ५००० तरी गुंतवायचे पण प्रत्यक्ष गुंतवणूक करायला गेलो तेव्हा काही प्रॕक्टिकल अडचणी आल्या. जसेकी ज्या दिवशी पैसे टाकायचे नेमकं त्याच दिवशी मार्केट चढलेलं असायचं. ज्या भावात अॉर्डर टाकली त्या भावात शेअर मिळायचे नाही. इत्यादी इत्यादी . आणि हे करण्यात वेळ बराच खर्ची जात होता. काम कमी असेल तेव्हा तर काही नाही पण काम जास्त असलं कि २-३ दिवस मार्केटकडे पहाणही होत नव्हत अशात काही संधी वाया गेली की दुःख होत होतं. म्हणून मग MF चाच पर्याय योग्य असं वाटतंय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 13:25
नवीन
IOCL, BPCL, HPCL ह्या बद्दल, तुमचे काय मत आहे?
Oil and Gas Sector, ह्यानेच मला चांगले आर्थिक बळ दिले...नौकरी करत होतो, शेयर नाही ...
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/08/2021 - 09:42
नवीन
Lump Sum vs SIP - Which Mode Will Give You Better Returns ?
The answer to this question depends on the stock market conditions.
During upward trends, the lump sum mode of mutual fund investment tends to give relatively higher returns whereas during falling markets, investments made via a SIP generally provides better returns than a lump sum investment.
https://www.paisabazaar.com/mutual-funds/lump-sum-vs-sip-better-mode-mutual-fund-investment/#:~:text=The%20answer%20to%20this%20question,than%20a%20lump%20sum%20investment.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
गुरुवार, 04/08/2021 - 11:51
नवीन
---म्युच्युयल फंड्स मुखतः ३ प्रकारात विभागले जातात
१. इक्विटी
२. डेट
३. हायब्रीड
या प्रत्येकाचे अनेक उपप्रकार आहे जसे small cap, mid cap, large cap, focused, sectoral, Gold ETF, US opportunity, FMP इत्यादि इत्यादि .....
----------------
उपयुक्त माहिती . याबरोबरच म्युच्युयल फंड्स चे उपप्रकार म्हणजे -- growth , dividend , reinvest .
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 04/08/2021 - 20:24
नवीन
म्युच्युअल फंड किंवा सिप मध्ये मी स्वतः कधी हातपाय मारले नाहीयेत, पण या लेखाने बऱ्याच गोष्टी डोक्यात स्पष्ट झालेल्या आहेत. धन्यवाद या सुंदर लेखाबद्दल.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 04/08/2021 - 22:08
नवीन
'हमखास कोट्याधीश होण्याचा मार्ग' हे शीर्षक वाचून एक बाळबोध वा बालिश प्रश्न विचारतो आहे.
स्वतः धागाकर्ता म्युच्युअल फंडामुळे किती काळात कोट्याधीश झालेला आहे, आणि त्यासाठी एकूण भांडवल किती लागले ?
याचे समाधानकारक उत्तर मिळाले तर मी माझ्या मुलाला सुचवेन. मला स्वतःला यात काहीच कळत नाही आणि आवडही नाही.
माझ्या एका मित्राला निवृत्तीच्या वेळी चाळीस -पन्नास लाख मिळाले, ते त्याने बँकेच्या फंड मॅनेजरच्या सल्ल्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवले, परिणामी कित्येक लाखाचे नुकसानच झाले.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Fri, 04/09/2021 - 01:18
नवीन
मलाही या धाग्याचे शीर्षक अतिशयोक्तीचे वाटले जसे "महिना १०% मिळवणारे शेअर ..." असा जसा दुसरा धागा काढलं गेलं होता तसेच
पण या धाग्यातील माहिती रोचक असल्यामुळे शीर्षकाकडे दुर्लक्ष केले
पण एक प्रामाणिक विनंती जे कोणी आर्थिक विषयवार धागा काढणार असतील त्यांना कृपया उगाच असले सनसनाटी शीर्षक देऊ नका .. साधे सरळ जे मांडायचे आहे त्याला साजेशे शीर्षक द्या
" सिप / म्युच्युअल फुंडतील गुंतवणूक, संधी आणि धोके " असे शीर्षक कोठे आणि "हमखास कोट्याधीश बनण्याचा मार्ग .." हे शीर्षक कोठे ...
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Fri, 04/09/2021 - 06:39
नवीन
चौकस जी
पूर्ण जबाबदारीने आणि स्वानुभवानंतर हे शीर्षक दिले आहे. आत्ताच चित्रगुप्ताजींना तपशीलवार प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सनसनाटी वगैरे काही नाही.
गुंतवणूक ही कुठले तरी लक्ष (target ) ठेऊन करायची असते आणि माझे लक्ष १ कोटीचे आहे (होते)
तरीहि तुम्हाला शीर्षक पटले नसेल तर दुर्लक्ष करावे .
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Fri, 04/09/2021 - 06:33
नवीन
चित्रगुप्ताजी ...
तुमच्या कडे तर सगळ्यांच्या पापपुण्याचा हिशोब असतो ... आमच्या पोर्टफोलिओ चे काय घेऊन बसलात ....
विनोदाचा भाग जाऊदे ....
तुमच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आहे : हो .. हा टप्पा (,milestone ) मी केंव्हाच पार केला आहे.सुरवातीला मी कन्सल्टन्ट च्या माध्यमातून गुंतवणूक करत होतो. मी सुरुवात केल्यावर एक दोन वर्षांनंतर उत्तम परतावा बघून माझ्या मित्रांनाही प्रोत्साहित केले. आज त्यातल्या काहींनी हा टप्पा पार केला आहे. काही या मार्गावर आहेत.
मी साधारणतः दहा वर्षांत हा टप्पा ओलांडला. जसे मी आधी प्रतिसादात दिले आहे त्याप्रमाणे माझे गृहकर्ज संपल्यावर हफ्त्याएव्हड्या रकमेचे (३० हजार महिना) सिप चालू केले. आधीचेही होतेच.
बाकी आधी एका प्रतिसादात मी लिहिले आहे त्याप्रमाणे SIP Calculator वापरून तुम्ही स्वतः अन्दाज घेऊ शकता .
तरी परत लिहितो ...

- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 04/09/2021 - 08:06
नवीन
हाच कॅलक्युलेटर वापरला....
तुमच्या आणि गणेशाच्या धाग्यांचा आमच्या कुटुंबाला फायदा नक्कीच होईल....
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 04/09/2021 - 09:19
नवीन
लिंक पेस्ट करता येईल का ? बरेच सापडले पण हे नाही सापडले.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Fri, 04/09/2021 - 10:46
नवीन
आंतरजालावर अनेक SIP calculators आहेत
ही लिंक वापरू शकता
SIP calculator : https://www.mutualfundssahihai.com/en/calculators
- Log in or register to post comments
क
कोहंसोहं१०
Sun, 04/11/2021 - 19:08
नवीन
अमरजी छान धागा.
आपण कोणत्याही प्रकारचे गुंतवणूकदार असलो तरी थोड्या प्रमाणात का होईना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असावीच या मताचा मी आहे. भविष्यासाठी, मग कारण कोणतेही असो जसं की मुलांचे शिक्षण, लग्न, परदेशवारी, रिटायरमेंट इत्यादी; एफडी, पीपीएफ किंवा तत्सम डेट प्रकारातील इन्व्हेस्टमेंट काही महागाईपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकत नाहीत. पैसे उभे करायचे असतील तर equity इन्व्हेस्टमेंट हवीच.
ज्यांना यातले काहीच कळत नाही आणि तरीही पैसे गुंतवायचे असतील त्यांनी सरळ इंडेक्स फंड्स घेऊन मोकळे व्हावे. इतरांनी थोडी जोखीम घेऊन जास्त परताव्यासाठी इतर फंड प्रकारात गुंतवणूक करावी.
शेयर की म्युच्युअल फंड या वादामध्ये न पडता आपल्या ज्ञानाप्रमाणे, आवडीप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यावा. माझ्या मते अगदी थोडासा अभ्यास करून निफ्टी किंवा सेन्सेक्स मधील काही मोठ्या कंपनीचे शेयर घेता येऊ शकते. हे काही रॉकेट सायन्स नाही.
मी स्वतः शेयर मधील सिप कटाक्षाने टाळतो. अगदी मोजक्या शेयरमध्ये मोठी गुंतवणूक कधीकधी धोकादायक ठरू शकते. त्यासाठी नियमितपणे बाजारावर लक्ष ठेवावे लागते. कितीही काळजी घेतली तरी DLF, युनिटेक, सत्यम, Yes Bank, Idea सारखी उदाहरणे काही काही वर्षांनी डोकं वर काढत असतात. शेयर मधील सिप अशावेळी मोठे नुकसान देऊ शकते. त्यामानाने म्युच्युअल फंड मधील सिप गुंतवणूक केंव्हाही बरी.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 04:57
नवीन
हे काही रॉकेट सायन्स नाही.....
आमचे राॅकेट दर शनिवारी उडते.. हे आर्थिक राॅकेट सायन्स, आमच्या बौद्धिक कुवते बाहेर आहे...
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 04/12/2021 - 15:25
नवीन
इथे बरेच जण moneycontrol वापरताना दिसतात. valueresearchonline सुद्धा बघा असे मी सुचवेन.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 15:44
नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 04/12/2021 - 17:20
नवीन
जर फंडांची माहिती (डिटेल्स / डेटा ) बघायचा असेल तर
https://www.valueresearchonline.com/
https://www.moneycontrol.com/
https://www.mutualfundindia.com/
यापैकी कुठलीहि साईट वापरा . सर्व माहिती मिळेल
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2