Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज काय घडले... फाल्गुन शु. ११ इंग्रज-मराठे यांच्यांतील पुरंदरचा तह !

A
Ashutosh badave
Fri, 04/09/2021 - 07:43
marathe -ingraj शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला. सुवर्णमय असणाऱ्या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथे पोर्तुगीझांनी आपले बस्तान स्थिर केले आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला. मराठी राज्य काही काळपर्यंत तरी का होईना खंबीर असल्यामुळे मुंबईकडे इंग्रजांचा शिरकाव होणे दुरापास्त झाले. पुढे पेशव्यांच्या दरबारांत गृहकलह आहे की काय याचा तपास मॉस्टिन नांवाचा इंग्रज वकील करूं लागला. त्याच्या सुदैवाने राघोबादादा त्याला मित्र भेटले. नारायणरावांच्या खुनानंतर राघोबाविरुद्ध बारभाईंचे कारस्थान उभारले गेले व रघुनाथराव उत्तरेकडे पळू लागले. हरिपंततात्या त्यांचा पाठलाग करीत होते. ही संधि इंग्रजांनी साधिली. इंग्रजांनी पूर्वीचा सर्व तह विसरून साष्टी घेतली. राघोबा सुरतेस इंग्रजांच्या आश्रयास आले ; आणि घरभेदेपणा पत्करून त्यांनी इंग्रजांशी तह केला. आणि कर्नल कीटिंग यांच्याबरोबर अडीच हजार इंग्रजी फौज राघोबास मदत करण्यास सिद्ध झाली. शिदे, होळकर व हरिपंत रघुनाथरावांचा पाठलाग करीतच होते, परंतु राघोबास इंग्रजांचा आश्रय मिळाल्याचे पाहून शिदे-होळकर स्वस्थ राहिले. एकट्या हरिपंताने इंग्रजी फौजेशी सामना दिला. दोनहि पक्षांकडील बरेच नुकसान झाले. मध्यंतरी नवीन प्रकरण निर्माण झाले. कलकत्त्याच्या हेस्टिग्जने मुंबईकर इंग्रजांना कळविले, “राघोबाचा पक्ष घेऊन तुम्ही आपल्या अधिकाराबाहेर वर्तन केले. युद्ध ताबडतोब बंद करा." आणि सखाराम बापूसहि लिहिले की, “मुंबईकरांनी चालविलेले युद्ध आम्हांस मान्य नाही. तुम्हांकडे बोलणे करण्यास वकील पाठवतो. तहाची योजना करा." कर्नल अॅप्टन हा इंग्रज वकील कलकत्त्याहून तहाचे बोलणे करण्यास आला. बऱ्याच वाटाघाटी झाल्या, पण साष्टी वगैरे मुलूख मिळाल्यामुळे जो फायदा झाला होता तो सोडण्यास इंग्रज तयार नहते. परंतु मराठ्यांचीहि स्थिति ठीक नव्हती. तेव्हां दोघांच्यांत फाल्गुन शु. ११ रोजी तह ठरला. इंग्रजांच्या फौजा परत जाव्या, राघोबाने कोपरगांवीं रहावे; पेशव्यांच्या विरुद्ध इंग्रजांनी इतर कोणालाहि मदत करूं नये. -२९ फेब्रुवारी १७७६

प्रतिक्रिया द्या
774 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा