जे न देखे रवी...
चैत्री पाडवा....
Primary tabs
चैत्री पाडवा....
नवी पालवी चैत्राची ती,
रंग तिचा हिरवा..
पारंब्यांवर झोके घेई,
एक वेडा पारवा...
पानोपानी फुलली जाई,
दरवळे अंगणी मरवा..
मुदित सृष्टी बहरून जाई,
वसंत ऋतु हा बरवा..
मंदिरातला मृदुंग बोले,
सुमधुर तो केरवा..
संध्यासमयी कानी येई,
दूर कुठे मारवा..
सजतील सदने, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा..
नववर्षाची नवीन स्वप्ने,
संकल्प मनी ठरवा.....!
जयगंधा..
११-४-२०२१.
छान. आवडली रचना. ते मरवा म्हणजे काय असतं ते नेमकं समजलं नाही.
सजतील सदने, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा..
नववर्षाची नवीन स्वप्ने,
संकल्प मनी ठरवा.....!
वा हे लै भारी. बाकी, असा किंचित बदल करुन पाठवावा वाटला.
सजतील सजणे, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा,
नववर्षाची नवीन भेट- स्वप्ने,
काही संकल्प, मनी ठरवा.....!
असे पाठवून देतो. लागली लॉटरी तर लागली. :)
-दिलीप बिरुटे
(स्वप्नाळु)
मरवा हा पुदिन्यासारख्या रोपाचा तुरा असतो. केवड्यासारखा मंद सुगंध असतो. स्त्रिया तो केसात माळतात वा हारात वापरला जातो.
विशेष ज्ञानः गांज्याची चोरटी वाहतूक मरव्याच्या पोत्यातून होते.
>>>> केवड्यासारखा मंद सुगंध असतो.
वाह ! शोधणे आले. माहितीबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
कुणाला पाठवताय म्हणे?
-(चौकस) प्रचेतस
>>>> कुणाला पाठवताय म्हणे ?
किती ही पाळत ? स्वातंत्र्य म्हणून काही राहिलं नाही, हल्ली इथे.आपलेच मेसेजेस, आपणच आपल्या नंबरवर पाठवायचे. बाकी काय नै.खुलासा संपला.
-दिलीप बिरुटे
आपलेच मेसेजेस, आपणच आपल्या नंबरवर पाठवायचे :)
मीपण असेच करते......माझा तर एकटीचाच मोठा ग्रुप आहे :-) :-)
=))
स्वतःचे मेसेज स्वतःला का पाठवायचे कळले नाही.एकटीचा मोठा गृप कसा काय असतो बाबा? सहज गमतीने घ्यावे वादाचा कुठलाच हेतू नाही.खुलासा केल्यास छान आवडल्यास मीही तसेच करेन. एकटीचीच कंपनी मलाही आवडते.
माझा संकल्प की मी मिपावर वाचन मात्र रहायचा प्रयत्न करणार.
सुरेख
सर्व रसिकांना, मनापासून धन्यवाद..!!