जे न देखे रवी...
..बहुतेक रेशमी होते!
Primary tabs
आकार घडीव घडले..
[पण] आघात अनावर होते!
डोळ्यांशी डोळे भिडती..
संवाद कोवळे होते!
स्वत्वाची ओळख नाही..
[प्रतिबिंब सोवळे होते!]
अंधार असु देत जरासा..
तेजाचीच सवय होते!
आयुष्य क्षणांतून घडते..
अन् क्षण, मोजके होते!
--
निसटून जातसे काही..
बहुतेक रेशमी होते!
राघव
अतीव सुंदर.
मस्त आवडली.
पण 2रे कडवे ओळ कंसात का लिहिली ?
स्वगतात्मक लिहितांना मी कधी कधी कंस वापरतो, जर चपखल वाटला तर.
छानच !
हे तर खासच !
हे खासच!
सं - दी - प
विडंबन वाचून मग इथे पोचलो..
कविता झकास जमली आहे.. अतिशय आवडली
पैजारबुवा,
कविता आवडली.
....
खास.आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
👌 सगळ्याच ओळी खुप छान.
जब्राव येक्दम