जे न देखे रवी...

(बहुतेक रेशमी "होती" !)

Primary tabs

आमची प्रेरणा : राघवांची सुंदर कविता : ..बहुतेक रेशमी होते!

आमची शंका : विडंबन हे हास्य किंव्वा बीभत्सरसात असावे असा काहीसा संकेत आहे, किमान मिपावर तरी तसे पाहण्यात आलेले आहे. "शृंगाररसातील" विडंबन केल्याबद्दल मराठी साहित्यपीठ अस्मादिकांना माफ करेल काय ;)

आकार घडीव होते..
आघातही नाजुक होते!

ओठांना ओठ हे भिडती..
[तेव्हा] "शब्देविण संवादु" होते!

नैतिकतेचे ठाऊक नाही...
[पण सीत्कार सोवळे होते!]

"अंधार कर ना जरासा"..
नवखेपण लाजत होते !

क्षणार्धात घडेल भलते!
ते क्षण सावरायचे होते .

--

सर्र्कन कशी निघाली..
बहुतेक रेशमी "होती" !

-
पोपशास्त्री मार्कस ऑरेलियस

नाहितर कवीवर्यांना ठाम पणे सांगता आले असते की ती रेशमी होती का अजून कोण होती.
कविमहाराजांचे विषयातले सखोल ज्ञान वाक्या वाक्यात जाणवते आहे.
कविहृदयीचा हूंकार मनात अनेक तरंग उमटवून गेला.
पैजारबुवा,

शिवाय,

सर्र्कन कशी निघाली..
बहुतेक रेशमी "होती" !

कवीच्या शब्दांत दृश्यात्मक वर्णनाची अफाट ताकद आहे.

अवांतरः सीत्कार सोवळे होते.. > कवीच्या शब्दांत ध्वनिक वर्णनाची (सुद्धा) अफाट ताकद आहे.

गॉडजिला

सर्र्कन कशी निघाली..
बहुतेक रेशमी "होती" !

इथे रस्त्यावर उभा आहे म्हणुन अन्यथा गडाबडा लोळणेच बाकी होते.

राघव

भारीये मार्कसभौ! च्यामारी असा काही विचारही डोक्यात कसा आला नाही! ;-)

सीत्कार सोवळे होते!

खासच!

खिलजि

कुणास पूजावे

कुणास मानावे

दिशा अंधारली कि

दोन दिवे लावावे

तेल ओतून त्यात

वात मळावी

मग निवांतपणे

तिला बघावे

ती थांबेल तोवर

खुशाल राहावे

ती जाताक्षणी

आपणही निघावे

पण निरोप घेताना

दिवे मालवावे .. दिवे मालवावे

मदनबाण

सर्र्कन कशी निघाली..
बहुतेक रेशमी "होती" !

आरारा... रा. हीच रचना संस्कृत प्रभुंनी संस्कृत मध्येच कशी केली असती असा क्षणभर विचार मनात डोकावुन गेला. :)))
बाकी रेशमी हे वस्त्र विशेष दिले गेल्यामुळे उगाच From Dusk Till Dawn मधली Salma Hayek आठवली !
रसिक मंडळींसाठी त्या चित्रपटातील मादक रेशमी नृत्य इथे देउन जातो. [ केवळ रसिक मंडळींनीच पहावे ही नम्र विनंती ! ;) ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Suno Na Sangemarmar... :- Youngistaan [ Arijit Singh ]

गॉडजिला

खरे तर टॅरॅन्टिनोची (डेथ ) आहे राव