Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुशांत सिंह राजपूत भाग २

म
मदनबाण
Tue, 04/20/2021 - 15:10
💬 67 प्रतिसाद
काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे. सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत. १] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.] २] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे या दोन्हीं संबंधीत व्हिडियो इथे देउन ठेवत आहे आणि सवड मिळेल तसे हा धागा अपडेट करत राहिन. आधीचा भाग :- सुशांत सिंह राजपूत

मदनबाण.....


प्रतिक्रिया द्या
27154 वाचन

💬 प्रतिसाद (67)
म
मुक्त विहारि Tue, 04/20/2021 - 15:31 नवीन
हिंदी चित्रपट, टाॅकीज मध्ये जाऊन बघणे, कधीच सोडून दिले आहे...
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 04/20/2021 - 15:39 नवीन
अनेक महिने एवढा गदारोळ होऊनही आपल्यसारख्या सर्वसामान्य लोकांना याबद्दल निश्च्चित काहीही कळलेले नाही, याचे कारण काय असावे बरे ? हे न कळू देण्यात कुणा- कुणाचा फायदा आहे ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 05:36 नवीन
बियर बार लगेच का उघडले? CBI चौकशी का नाकारली? चित्रीकरणाला परवानगी का दिली? ----------- वरील तीन प्रश्रांची उत्तरे मिळाली की, तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर पण मिळेल... कोंबडे कितीही झाकले तरी, पैसे मिळाले की कोंबडे बाहेर येतेच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
R
Rajesh188 Wed, 04/21/2021 - 05:50 नवीन
केंद्रीय तपास यंत्रणा ह्या केंद्र सरकार च्या गुलाम आहेत.त्यांची स्वयत्ता गेल्या सहा वर्षांपासून नष्ट केली गेली आहे. राज्यांचा केंद्रीय तपास यंत्रणा न वर .केंद्राच्या प्रतिनिधी वर (राज्यपाल) बिलकुल विश्वास नाही.खूप साऱ्या राज्यांनी CBI ल no entry केली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 05:53 नवीन
कुठल्या राज्यांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
क
कंजूस Tue, 04/20/2021 - 15:46 नवीन
असेल काही गोलमाल पण आता काय?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 16:09 नवीन
विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड . जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/20/2021 - 16:09 नवीन
विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड . जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 04/20/2021 - 16:14 नवीन
मिन्व्हाईल, विभोर आनंद,लॉयर, सुप्रिम कोर्ट- मी सुशांत सिंग चा मागच्या जन्मीचा भाऊ आहे. https://twitter.com/VictorAlphaVA/status/1380974535374032897
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 04/20/2021 - 21:39 नवीन
एकाच गोष्ट आमच्या हातांत आहे. उर्दूवूड वर पूर्णपणे बहिष्कार. थेटर मध्ये जाऊन काहीही पाहू नका त्यांच्या चित्रपटांना imdb वर कमी रेटिंग द्या.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:10 नवीन
मिनी पाकिस्तान भारतात बर्‍याच ठिकाणी आहेत.ते सपोर्ट करतात पंजाबी+उर्दू मिश्रित बॉलीवूडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
म
मुक्त विहारि Wed, 04/21/2021 - 08:53 नवीन
खान मंडळींचे सिनेमे बघतातच ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
सुखीमाणूस Wed, 04/21/2021 - 01:31 नवीन
हे राजकिय लोक पुर्ण पोचलेले असतात. स्वताची कुकर्म बरोबर झाकतात आणि दुसर्याची ओरडुन जगापुढे आणतात. कालान्तराने तेरी भी चुप आणि मेरी भी चुप.. एकमेका सहाय करु अवघे धरु कुपन्थ.. जनताही आहेच नाचायला रिकामी..
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 04/21/2021 - 07:11 नवीन
काही नाही! सोसणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
र
रमेश आठवले Wed, 04/21/2021 - 19:08 नवीन
गेले काई महिने निरर्थक उहापोह चालला आहे. खून झाला असे म्हणण्यासाठी दोन गोष्टी लागतात. १.खुनाचा हेतु आणि २. संशयित आरोपी. या दोन्हींचा अभाव आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/15/2021 - 16:29 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/05/2021 - 10:34 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/07/2021 - 14:06 नवीन
सुरुवातीस सुशांतविषयी सहानभुती असल्यामुळे उत्सुकतेने बघत वाचत असे. आता या विषयातील उत्सुकता आता संपून गेलेली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/07/2021 - 18:18 नवीन
अजुन पुरे एक वर्ष देखील झाले नाही ! ७ दिवस बाकी आहेत त्यासाठी. किमान ७ वर्ष तरी हा खटला आरामात चालेल असा माझा अंदाज आहे. मला इतकच माहित आहे की जगभरातील लोक या एका व्यक्तीच्या जाण्याने दु:खित आहेत आणि न्यायासाठी वाट पाहत आहेत... बघुया चेक आणि मेट देण्यासाठी घोडा अडीच घरे चालतो का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Tue, 06/15/2021 - 13:55 नवीन
संबधित संधीसाधू लोक (बॉलीवुडवाले, राजकारणी, गुंडलोक) अपराध्यांसोबत मांडवली करून सगळी सारवासारव सुरु आहे ! प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे ! न्यायाची आशा ठेवायला हरकत नाही, कधी कधी चमत्कार घडून जातात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 06/14/2021 - 17:17 नवीन
आज सुशांत सिंगच्या हत्येस १ वर्ष पूर्ण झाले, अत्यंत क्रूरपणे त्याला ठार करण्यात आले. :( त्याच्या डेड बॉडीचा अगदी डिटेल अ‍ॅनॅलिसीस मागच्या भागात DR M. PADMA यांच्या व्हिडियोत दिलेला आहे. ] एका अष्टपैलु, गुणी आणि सरळ मुलाला बॉलिवुड मधल्या लोकांनी एकटं पाडल, नव्हे त्याची जशी जमेल तशी टिंगल देखील वेळोवेळी केली... पण तो होताच ना वेगळा. जाता जाता :- करण जोहरच्या शोज मध्ये सुशांतचा उल्लेख मुद्दामुन प्रश्न विचारताना किंवा उत्तर देणार्‍यांनी कसा केला ते एकदा पहाच... एकमेव इमरान हाशमी हा अभिनेता होता ज्याने दिलेल्या अभिनेत्यांच्या नावा मध्ये सर्वात पहिले सुशांत चे नाव घेतले की ज्याचे फ्युचर ब्राइट असेल. [ माझ्यासाठी इमरान चे हे प्रामाणिक मत त्याच्या विषयी आदर वाढवणारे ठरले. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffett
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 06/15/2021 - 10:49 नवीन
ह्या डॉ. पदमांचा व्हिडीओ पाहून मला डेक्स्टर मॉर्गन ची आठवण झाली. तो पण असेच नुसते फोटो बघून धडाधड केस सॉल्व्ह करत असतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 07/30/2021 - 04:06 नवीन
SSR CASE UPDATE: Exclusive Audio Clip #2 SSR CASE EYE WITNESS AUDIO CLIP हे ऑडियो आणि चॅनल उडणार नाही अशी अपेक्षा करतो, बघुया पुढे अजुन काय काय उजेडात येतय.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/30/2021 - 16:00 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/01/2021 - 08:01 नवीन
अजून चालू आहे का हा विषय....? व्हीडीयो पाहण्याइतका संयम नाही. लेखन असले तर अधुन-मधुन वाचायचा प्रयत्न करीन. एकदा तुम्ही 'जगभरातले लोक या विषयावर हळहळले' असे काही तरी लिहिले होते ते वाचल्यापासून मलाही या विषयाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे असे वाटायला लागले आहे. एकदा सारांशाचा विषय किंवा काही निष्कर्षावर आले की जरुर कळवा (व्हीडीयो पाहणार नै) ;) शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 08/01/2021 - 09:22 नवीन
मी मदनबाण यांनी दिलेले दोन्ही विडिओ पाहिलेत. तपास समोर सरकला असावा आणि cbi वाले राजकीय पक्षांचा दबाव झुगारून काम करत असावेत अशी आशा करतो. बाकी सविस्तर चर्चा भेटूनच करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/01/2021 - 09:37 नवीन
>>>> बाकी सविस्तर चर्चा भेटूनच करू. ओके डॉक्टर साहेब, तुमच्या शब्दाबाहेर थोड़ी आहे. चांगलं हॉटेल निवडा भो... फक्त...! :) >>>>cbi वाले राजकीय पक्षांचा दबाव झुगारून काम करत असावेत असं होत नसतं, असे वाटते. पण तसे असेल तर चांगली गोष्ट आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
श
शाम भागवत Tue, 08/10/2021 - 07:04 नवीन
सरांचा गुल्लू दादांवर भारी विश्वास बॉ!! 😜
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण Wed, 08/25/2021 - 18:11 नवीन
नारायण राणे पूर्णपणे खवळलेले दिसत आहेत, काल आजतक च्या पत्रकारांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती त्यात राणेंनी [ जे केंद्रीय मंत्री आहेत. ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या बाबतीत गंभीर विधाने केलेली आहेत. मी मुलाखतीतील शब्द खाली जसे च्या तसे देत आहे, शिवाय ती मुलाखत देखील देत आहे. इसके हात मे कानुन है, शो करेंगे... अरे मगर उसका बच्चा, मुख्यमंत्री का, सुशांत के केस मे था, दिशा सालियन के, था, उसको क्यो, उसको बचाया ना ? Uddhav पर सवाल को लेकर बोले Rane- उसका लड़का सुशांत केस में था.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Entammede Jimikki Kammal | Official Video Song HD
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 08/30/2021 - 13:41 नवीन
ते कोण १०० कोटी खंडणीवाले मंत्री त्यांना "स्वच्छचिठ्ठी" द्यायचा विचार सुरु आहे म्हणे ! पण, प्रश्न हाच एकः सुशांतला न्याय कधी मिळणार ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 11/25/2021 - 15:22 नवीन
नारायण राणे परत काय बोलले यावर काही युट्यूबर आणि खास करून भाऊ तोरसेकर काय बोलले याच्या व्हिडिओच्या लिंकांच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/28/2021 - 13:21 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/30/2021 - 08:23 नवीन
एक केंद्रीय मंत्री म्हणतोय कि सी बी आय (केंद्रीय संस्था) आहे त्याच्याकडे तपास असताना कारवाई झाली नाही. मोदी सरकार इतके भ्रष्ट आहे का? या राणे ने २६/११ बद्दल अशीच बेछुट विधाने केलि होती. नंतर शेपूट घातली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कॉमी Tue, 02/22/2022 - 16:13 नवीन
सुशांत आणि दिशा सालीयान वर इतका खोलवर कव्हरेज करणाऱ्या धाग्यात कायकाय गोष्टी आजिबात आल्याच कश्या काय नाहीत असे वाटते ब्वा. दिशा सालीयानचे पालक काय विनंती करतात - मुंबई पोलिसांचा तपास समाधानकारक आहे, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, "राजकारण्यांनी" आमच्या मुलीच्या मृत्यूचे भांडवल करून आम्हाला त्रास देऊ नये, बलात्कार आणि खुनाचे आरोप चूक आहेत. आम्हाला त्रास देऊ नका. वरील गोष्ट 2020 च्या मुलाखतीत सुद्धा स्पष्ट झाली होती. "समाज माध्यमं आमचा जीव घेतील" या शब्दात दिशाचे आईवडील व्यक्त झालेत. इतकं होऊन सुद्धा नारायण राणे कोणत्याही पुराव्यांशिवाय बोलतात, बोलत राहतात हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/03/2022 - 15:35 नवीन
राणेंवर दिशा सालीयानच्या आईने केस दाखल केली आहे. दिशा आणि सुशांत यांच्याबद्दल इतकी काळजी असणारे सो कॉल्ड ssrians यावर एका शब्दानेही प्रतिक्रिया देत नाहीत हे आश्चर्यकारक आहे. जालावरच्या कन्स्पायरसी थिअरीज वर किती विश्वास ठेवायचा हे सुशांत सिंह प्रकरणातून शिकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
म
मदनबाण गुरुवार, 03/03/2022 - 17:38 नवीन
धागा वर आणण्यासाठी मेहनत घेणार्‍यांना धन्यवाद ! :))) राणेंवर दिशा सालीयानच्या आईने केस दाखल केली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- When fake news is repeated, it becomes difficult for the public to discern what's real. :- Jimmy Gomez
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 09:35 नवीन
सुशांत राजपुत प्रकरण नक्की काय आहे? ट्विटरवर लोक आता पहील्यासारखे बोलताना दिसत नाहीत. सोक्ष मोक्ष लागला ह्या प्रकरणाचा काय?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/22/2022 - 14:39 नवीन
राणे आणि कंपनी अधुन मधुन या विषयावर विधाने करताना दिसतात. काही मेसिंजिंग ग्रुप्स असतात ज्या मध्ये हा विषय अजुन चालतो. बॉयकॉट बॉलिवूड मधले अनेक सुशांत समर्थकच आहेत. आता शिंदे सरकार महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी देतं का ते पहायला हवे. ह्या प्रकरणा बरोबरच जिया खान चे प्रकरण देखील असेच कित्येक वर्ष हेलपाटे खातयं... तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यांचा वरचा माझा विश्वास कितपत अढळ राहतो ते मलाच पहावे लागणार आहे. २ जुने व्हिडियो देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
क
कपिलमुनी Mon, 08/22/2022 - 15:17 नवीन
महाराष्ट्रात या प्रकरणाची सीबीआय चौकशी चालू होऊन वर्ष झाले ..न्यायालयाने आदेश देऊन सीबीआय चौकशी लावली... राणे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत .. काय दिवे लावणार? हे राणे, सोमय्या या बोटाची थुंकी त्या बोटावर करणारे आहेत.. शून्य विश्वासार्हता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 08/22/2022 - 16:19 नवीन
महाराष्ट्रात या प्रकरणाची सीबीआय चौकशी चालू होऊन वर्ष झाले ..न्यायालयाने आदेश देऊन सीबीआय चौकशी लावली... ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय :- Maharashtra withdraws 'general consent' to CBI [ Oct 21, 2020 ] शिंदे सरकार घेणार असलेला निर्णय :- Shinde set to give CBI general consent revoked by MVA [ Aug 19, 2022 ] मुनी दोन्ही बातम्या वाचा, मग मी वर प्रतिसादात काय लिहलं आहे ते परत वाचा. समजलं तर उत्तम,नाही समजल तरी हरकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 08/22/2022 - 16:32 नवीन
बाणा, तुमच्या लिंकास्त्राचा आदर आहे पण बहुधा तुमची माहिती अपुरी आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशी साठी परवानगी लागेल असे सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशी साठी परवानगीने आहे दुवा दुवा २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 08/22/2022 - 17:03 नवीन
बाणा, तुमच्या लिंकास्त्राचा आदर आहे पण बहुधा तुमची माहिती अपुरी आहे. असु शकते. परंतु मी जे म्हणालो आहे त्या संदर्भा नुसारच मी दुवे दिले आहेत. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मदनबाण Sat, 09/10/2022 - 09:57 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron James
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/10/2022 - 17:45 नवीन
आता लौकरच दोषींना अटक होणार बरे... राणेकडे दोन वर्षे पुरावे आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/13/2023 - 17:07 नवीन
आता फक्त अटकेची वाट बघायची !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fly Project - Toca Toca | Official Music Video
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/14/2023 - 00:03 नवीन
इतके गुंतलेले आहेत??
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/14/2023 - 08:25 नवीन
इतके गुंतलेले आहेत?? हो,अर्थातच. माझ्या माहिती नुसार दिशा आणि सुशांतच्या "हत्ये" नंतर १५-१७ अन्य लोकांचे मुडदे पाडले गेले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. आता मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जाता जाता :- काउंट डाऊन सुरु झालेला आहे, जेव्हा पहिली अटक होईल तेव्हा पासुन हा गुंता सुटण्यास सुरुवात होईल.

संपादित.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Full Video: Sammohanuda | Rules Ranjann | Kiran Abbavaram,Neha Sshetty | Rathinam Krishna | Shreya G
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
विअर्ड विक्स गुरुवार, 12/14/2023 - 12:35 नवीन
उगाच बाऊ करू नका तोपर्यंत तेपण सरकारमध्ये येतील मागच्या किंवा पुढच्या दाराने.... असाच आर्यन च्या केसचा गवगवा केलेला निष्पन्न शून्य .... विरोधी पक्षात असले कि कमल अतिआक्रमक होते, मुंबई ड्रग कॅपिटल कायच्या काय गप्पा ... आता सरकार बदलल्यावर आवाज बंद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/14/2023 - 13:15 नवीन
उगाच बाऊ करू नका मी तुम्हाला अगदी हेच म्हणतो ! :) असो... माझा वरचा प्रतिसाद संपादित झालेला दिसतोय ! संपादकांना त्यात काय वावगे दिसले ते मला काही कळत नाही.माझ्या प्रतिसादाला दुसर्‍या एका आयडीने प्रतिसाद दिला होता तो सुद्धा उडवला गेलाला दिसतोय ! मी तर कोणाचेच संपूर्ण नाव लिहले नव्हते, मग तो भाग वाचुन कोणाला कसली भिती वाटली ? असो... त्या आयडीने जालावर वर-वर शोधल्यावर विशेष माहिती मिळाली नाही असे म्हंटले होते .तर ती माहिती, जिथे संपूर्ण नावे घेतली आहेत त्याची लिंक देतो. दुवा :- https://www.youtube.com/@QviveTV/videos जाता जाता :- आज १४ तारिख, ३१ तारखेच्या आधीच पहिली अटक होणार ना ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Full Video: Sammohanuda | Rules Ranjann | Kiran Abbavaram,Neha Sshetty | Rathinam Krishna | Shreya G
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 12/14/2023 - 19:13 नवीन
वाट बघा! होणार ना अटक. म्हणजे काय??? :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा