Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुशांत सिंह राजपूत भाग २

म
मदनबाण
Tue, 04/20/2021 - 15:10
💬 67 प्रतिसाद
काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे. सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत. १] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.] २] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे या दोन्हीं संबंधीत व्हिडियो इथे देउन ठेवत आहे आणि सवड मिळेल तसे हा धागा अपडेट करत राहिन. आधीचा भाग :- सुशांत सिंह राजपूत

मदनबाण.....


प्रतिक्रिया द्या
27154 वाचन

💬 प्रतिसाद (67)
म
मदनबाण Sat, 02/03/2024 - 15:24 नवीन
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात जालावर एक ऑडियो फाईल काही काळा पूर्वी लिक झालेली आहे, त्या ऑडियो फाईल नुसार सुशांतचा गुढगा बॅट / रॉड मारुन तोडला गेला, त्याचा हात ढोपरा पासुन उलटा दिशेला तोडण्यात आला आणि हे करणारा त्रिमुखे नावाचा पोलिस अधिकारी आहे.सुशांत ला पूर्णपणे अधू करण्यासाठी घोड्यांना वापरली जाणारी स्टन गन वापरण्यात आली. त्याला अत्यंत क्रूरपणे अनेक वेदना देऊन मारण्यात आलेले आहे. त्याच्या शरीरातील मणक्या सकट सगळी हाडे मोडली गेल्याची शक्यता दिसुन येते, बहुतेक याच कारणामुळे त्याचा मृतदेह स्मशान भूमीत चितेवर देखील सुतळीने घट्ट बांधुन ठेवलेला होता. या प्रकरणात सध्याच्या सरकार विरोधात आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जनमत प्रवाह निर्माण झालेला असुन त्यात वाढ होताना दिसते. भाजपा ने बिहार निवडणूकीच्या वेळी ना हम भूले है और ना भूलने देंगे या टॅग लाईनचा वापर केला होता. सलमान खान आणि क्वान शी या प्रकरणाचे धागे जुळलेले दिसुन येत आहेत. वकिल निलेश ओझा यांच्या ताज्या वक्तव्या नुसार सलमान खान हा पंतप्रधान मोदींना शरण गेल्याने हे प्रकरण आता थांबवले गेलेले दिसते. येत्या जुन महिन्यात या क्रूर हत्याका़डाला ४ वर्ष पूर्ण होतील्,परंतु न्याय होण्याची चिन्हे काही सुस्पष्ट होताना दिसत नाहीत. भाजपाने एका सुपर स्टार च्या मृत्यूचे भांडवल करुन त्याच्या टाळू वरील लोणी चाटण्यात रस दाखवत असल्याची भावना जनतेत वेगाने पसरली आहे, हा जनमत प्रवाह विरोधात जाणे भाजपाला परवडणारे नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 02/04/2024 - 07:21 नवीन
ती ऑडियो फाईल तुम्ही सत्यापित कशी केली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 02/04/2024 - 08:18 नवीन
आयटी सेल्सचे वाट्सअप फोरवर्ड्स नी तूनळी वरचे विडीओस ह्यांना सत्यापित करायच्या नसतात. त्यावर डोळे बंदं करून “अंधं” पणे विश्वास ठेवायचा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Sun, 02/04/2024 - 14:18 नवीन
लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच आहे. विभोर आनंद नामक माणूस तर सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे, मी त्याला भेटलो आहे असे म्हणत होता. सदर लेखक त्याच्या विडियोचा रतीब मिपावर घालत होते. हा विभोर आनंद कसा सुप्रीम कोर्टात वकील आहे वैगरे credential सांगत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
म
मदनबाण Sun, 02/04/2024 - 17:02 नवीन
लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच आहे. वा... :))) विभोर आनंद नामक माणूस तर सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे, मी त्याला भेटलो आहे असे म्हणत होता. सदर लेखक त्याच्या विडियोचा रतीब मिपावर घालत होते. हा विभोर आनंद कसा सुप्रीम कोर्टात वकील आहे वैगरे credential सांगत होते. सिलेक्टिव्ह रिडिंग करुन व्यक्तिगत आरोप करणे ही तुमची प्रवृतीआहे का ? मी माझे म्हणणे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आधीच सांगितलेले आहे :- सुशांत सिंग च्या प्रकरणात टाळू वरचे लोणी खाण्याचे प्रकार अनेकांनी केले. सुशांत सिंग राखी सावंत पासुन रेहा पर्यंत अनेकांच्या स्वप्नात आला होता म्हणे ! [ च्यामारी या विषयावर इतका काथ्थ्याकुट करुन तो अजुन काही माझ्या स्वप्नात आलेला नाही ! ] अनेकांनी गाणी बनवली,सत्य असत्य माहिती सांगणारे व्हिडियो बनवले काय काय नाही केले... मी डोळे बंद करुन या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवत नाही, मग ते विभोर आनंद असले तरी ! परंतु अश्या व्हिडियो मध्ये कधी कधी दडलेली माहिती असते ती शोधण्याचे आणि समजुन घेण्याचे प्रयत्न मात्र मी नक्कीच करतो. असो... इतर वाचकांसाठीची माहिती / नवे अपडेट्स:- दिशा प्रकरणात काही घडतेय का ? | Sushil Kulkarni | Analyser | Aaditya Thackeray | Nilesh Ojha | Disha जाता जाता :- रेहा चक्रवर्ती ने याच अभिषेक त्रिमुखेला ४ कॉल आणि १ एसएमएस केलेला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rap
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Sun, 02/04/2024 - 18:28 नवीन
सत्यापित कसे करता हे पण सांगा. वीभोर आनंद वाट्टेल त्या थापा मारत होता. आता ही ऑडियो क्लिप म्हणता. खरी का खोटी कसे तपासले ? रिया चक्रवर्ती ने कुणाला फोन केले कुणाला नाही तुम्हाला कुठून समजले ? काय स्त्रोत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sun, 02/04/2024 - 19:31 नवीन
सत्यापित कसे करता हे पण सांगा. मी माझ्या परीने सत्य काय आहे ते सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करतो, काही वेळी सत्य काय ते कळते काही वेळा ते कळत नाही ! रिया चक्रवर्ती ने कुणाला फोन केले कुणाला नाही तुम्हाला कुठून समजले ? काय स्त्रोत आहे ? स्वतः काडीचाही शोध न घेता,वाचन न करता फक्त काड्या सारण्या करीता तुम्ही प्रश्न विचारता हे आता उघड झाले आहे,कारण हा प्रश्न मला विचारण्या आधी तुम्ही गुगल करण्याचे साधे कष्ट देखील तुम्ही घेतलेले नाहीत. तुमची एकंदर प्रवृत्ती आता पूर्णपंणे कळल्याने यापुढे तुम्हाला उत्तर देण्याचे कष्ट घेणार नाही. जाता जाता :- इतर वाचकांसाठी :- दुवा :- TIMES NOW accesses the call data record of Rhea Chakraborty. According to the CDR, Rhea spoke to Bandra DCP Abhishek Trimukhe. 4 calls & 1 SMS have been exchanged between Rhea & the Mumbai cop. DCP Bandra Abhishek Trimukhe declared the death of SSR as 'suicide' within 15 mins of investigation.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rap
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
व
वामन देशमुख Mon, 02/05/2024 - 00:22 नवीन
फक्त काड्या सारण्या करीता तुम्ही प्रश्न विचारता
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मुक्त विहारि Mon, 02/05/2024 - 15:20 नवीन
वरील प्रतिसाद, मदनबाण यांनाच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 02/05/2024 - 05:21 नवीन
मिपावर हे असे धागे कसे चालवले जाताहेत कळत नाहीये. सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय, सुशांत हा गंजेडी होता. शेंडा बूडखा नसलेले काहाही तूनळी विडीओ शेअर करून ह्या धाग्यावर काहीही मूद्दे रेटले जाताहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/05/2024 - 06:55 नवीन
मिपावर हे असे धागे कसे चालवले जाताहेत कळत नाहीये. मिपावर असे आयडी कार्यरत कसे राहतात तेच कळत नाहीये. सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय ,सुशांत हा गंजेडी होता. हे धदांत खोटे आहे. सीबीआय ने केस बंद केलेली नाही. सुशांत हा अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला सुपरस्टार होता, सुशांत हा हिंदुस्थानातील एकमेव अभिनेता होता ज्याने नासात जाऊन अ‍ॅस्टोनॉट चे ट्रेनिंग घेतले होते. नशा करणार्‍या लोकांमध्ये नासा च्या गप्पा मारणारा तो असामान्य व्यक्ती होता. त्याला गंजेडी म्हणणारे स्वत: व्यसनी आणि ड्रग्स विकणारे निघालेले आहेत. @संपादक मंडळ आणि मिपा व्यवस्थापन :- मिपावर व्यक्तिगत शेरेबाजी,खोटे आरोप करुन चारित्र्य हनन करणार्‍या आयडींना मोकळे रान का दिले जाते ? इतर वेळी तत्परतेने लॉगिन करुन प्रतिसाद संपादित करणारे संपादक मंडळ अश्या वेळी कोणतीच कारवाई करताना का दिसत नाही ? असल्या विकृत मनोवृत्तींना मिपावर स्थान देऊन या उत्तम संकेस्थळाचे वाटोळे होऊ देऊ नये इतकीच अपेक्षा करतो. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
ट
टर्मीनेटर Mon, 02/05/2024 - 09:49 नवीन
इतर वेळी तत्परतेने लॉगिन करुन प्रतिसाद संपादित करणारे संपादक मंडळ अश्या वेळी कोणतीच कारवाई करताना का दिसत नाही ?
कदाचीत ‘अपरिपक्वता’ हा मुद्दा विचारात घेउन आणखीन संधी दिली जात असावी, पण अतिरेक झाल्यास कायम स्वरूपी बॅन करण्यात येईल असा माझा अंदाज! वरील मत हे मी केवळ ‘मिपा वाचकाच्या’ भुमिकेतून व्यक्त करत आहे, असे मिपाचे धोरण असेल असा दावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 02/05/2024 - 10:05 नवीन
अरे वा. धाग्यातील अचाट दाव्यांबद्द्ल आपलं काय मत आहे टर्नानेटर सर?? कुणी मिपावर केलेल्या दाव्यांच्या सत्यतेबद्दल विचारलं तर तो अपरिपक्वपणा होतो? व्वा. चांगली कंपूबाजी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ट
टर्मीनेटर Mon, 02/05/2024 - 10:37 नवीन
तुमचं चालू देत, माझी मतं मी वेळोवेळी मांडतंच असतो, मग ती कोणाला पटोत की नं पटोत…. ‘हु केअर्स’ 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 02/05/2024 - 07:57 नवीन
सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट होता असे पुरावे एनसीबी ला सापडलेत, साधं गूगललं तरी पुष्कळ लिंक सापडताहेत, शेंडा बूडखा नसलेल्या विडीओस ना पुरावा माननारे अश्या अधिकृत बातम्यांना खोटे म्हणताहेत. अश्या गंजेडी, नशेडी, फालतू, आत्महत्या करून पळून गेलेल्यासाठी का गळे काढले जाताहेत कळत नाहीये. मुंबईतील एका रस्त्याला ह्या गंजेडीचं नाव देणीर होते म्हणे पण सूद्न्य नागरीकांनी ह्या गंजेडीच्या नावास विरोध केला. जिथे पैदा झाला त्या बिहारच्या रस्त्यांना नावे द्यायला सांगीतली नी नंतर हे फालतूपण थाॅबवण्यात आलं, बिहार सरकारलाही हा गॅजेडी होता हे माहीत असावे म्हणून त्यांनी कुठल्याही रस्त्याला नावे दिली नाहीत, एका राजकीय पक्षानेही ह्याचा नावाचा वापर केली नी निवडणूक झाल्यावर ह्याला फेकून दिले. हजारो नशेडी रस्त्यावर मरतात त्यांच्यासाठी गळे काढले जात नाहीत पण ह्या गंजेडी सुशांतसाठी काढलेले गळे पाहून वीट आलाय.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 02/05/2024 - 10:16 नवीन
सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट होता असे पुरावे एनसीबी ला सापडलेत, साधं गूगललं तरी पुष्कळ लिंक सापडताहेत, शेंडा बूडखा नसलेल्या विडीओस ना पुरावा माननारे अश्या अधिकृत बातम्यांना खोटे म्हणताहेत. एनसीबी ने सुशांत ला ड्रग पुरवल्याचे आरोप रेहा चक्रवर्ती आणि तिच्या भावा वरती केलेले आहेत, तिचे म्हणणे असेल की सुशांत ने ड्रग्र घेतले तर ते सत्य ठरवता येत नाहीत. एक मृत व्यक्ती जो आपल्या वरील अरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्याच्यावर कोणताही "वायझेड" कुठलेही आरोप करु शकतो. रेहा चक्रवर्ती च्या लिक झालेल्या चॅट डिटेल्स जालावर उपलब्ध असुन ती सुशांतच्या नकळत त्याला कॉफीतुन ड्रग्स देत होती आणि तिला हा सल्ला जया सहा ने दिलेला होता. तुम्ही वरती सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय असं धदांत खोट वक्तव्य केलयं त्यावर आता सोयिस्करपणे बोलणं टाळलं आहे हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल ! संदर्भ :- NCB files charges against Rhea Chakraborty, brother Showik in drugs case linked to Sushant Singh Rajput's death ‘Procuring’ and ‘paying’ for drugs: NCB’s draft charges against Rhea Chakraborty https://pbs.twimg.com/media/EgSfObuXYAElAMR?format=jpg&name=large हजारो नशेडी रस्त्यावर मरतात त्यांच्यासाठी गळे काढले जात नाहीत पण ह्या गंजेडी सुशांतसाठी काढलेले गळे पाहून वीट आलाय. सुशांत सारखे प्रामाणिक आणि बुद्धीमान लोक लाखात एक असतात आणि म्हणुनच तो निती आयोगासाठी काम करु शकला आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन व्होटर्स अवेअरनेस वाढवण्यासाठी त्याला विनंती केली होती, रस्त्यावरील गंजेड्यासाठी कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाने असे केल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही ! संदर्भ :- सुशांत सिंह राजपूत नहीं रहे: नीति आयोग ने बॉलीवुड अभिनेता के रूप में महिला उद्यमियों का सहयोगी खो दिया https://x.com/narendramodi/status/1109828502398750720?s=20 या धाग्यावर डोकवण्याची आणि प्रतिसाद देण्याची सक्ती तुम्हाला कोणीही केलेली नाही,तेव्हा तुम्ही पुन्हा इथे येऊन गळे काढू नका कारण ते पाहुन आता मलाही वीट आला आहे ! या पुढे मी तुमच्याही प्रतिसादाला प्रतिक्रिया देणार नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 02/05/2024 - 10:49 नवीन
असो. तुमचा कंट्रोल सूटलाय. “वाय झेड“ सारखे शब्द वापरताहात. जिथे सरकारने ह्या केस वर लक्ष घालणं सोडलंय. तिथे इतरांनी कितीही “वाय झेड” पणा करून पुरावे आणले तरा काहीही फरक पडत नाही. चालूद्या…. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा