जे न देखे रवी...
मनोगत
Primary tabs
खिशात माझ्या घेऊनि फिरतो
वादळ घोंघावते
इंद्रधनू भवताली माझ्या
सतरंग पसरते
भावनांचा लाव्हा जिभेवर
आस नाही मज कसली
यमकांची मोळी बांधुनी
मी विस्तवात टाकली
जान्हवी जणू डोळे माझे
जिथे तिथे पोहोचते
अनुभवाची लाट उसळुनी
मनसागरात धडकते
लखलखतो तो सूर्य हाती
शब्द जाळत फिरतो
विसरतो मी रीत सारी
आठवेल ते लिहितो
कधी बरसतो मेघ सावळा
थेंबे थेंबे पाणी
काव्य नसे हे अव्वल मित्रा
हि तर अनुभवाची कहाणी ....
हि तर अनुभवांची कहाणी .................
=====================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
हि तर अनुभवांची कहाणी .................वाह.
भावना पोचल्या...
लिहित रहा
पैजारबुवा,
कविता आवडली.
लिहित रहा.
सं - दी - प