जे न देखे रवी...

आज जरी

Primary tabs

चंद्रधगीने रातराणी
उत्फुल्लपणे-
परिमळेल तेव्हा

व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे
मावळतीवर-
ढळेल तेव्हा

केतकीत नागीण निळी
टाकून कात-
सळसळेल तेव्हा

नि:शब्दांची धून खोलवर
रुजून ओठी-
रुळेल तेव्हा

वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत
कणाकणाने-
कळेल तेव्हा...

....वीज शिरी
कोसळली तरीही,
सावरेन मी

अद्भुत अवघे विरून, वास्तव
क्षणोक्षणी मग-
छळेल तेव्हा...

....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी

राघव

भावना आवडली. तुमचा शब्दसंग्रह नेहमीच व्यासंगाची साक्ष देतो. :-)

....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी

खासच!

अवांतरः
स्वप्रसिद्धीचा दोष पत्करून -
समान भावना दाखवणारी माझी एक कविता कदाचित आवडेल - ध्येय

Bhakti

बहारदार कविता.
सुंदर रचना!!

सुरसंगम

आवडली.