Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन आणि मांस

अ
अनुस्वार
Sat, 05/15/2021 - 19:16
💬 20 प्रतिसाद
मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात? कारण आपली मनं त्यांच्या शरीरात वास करतात. माणूस मांसाचा गोळा असला तरी कुणी जाड असतो तर कुणी तोळामासा. त्याचप्रमाणे सुदृढ आणि सशक्त मने अनेकांच्या शरीरात वसलेली असतात. याउलट कृश मने केवळ काही जणांवर समाधान मानतात. जेवढ्या जास्त जीवांचे मिळून मन बनते तेवढेच ते हरहुन्नरी आणि ‌प्रसन्न असते. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक व्यक्ती कित्येक मनांचे मांसल रूप असते. प्रत्येक माणूस हाच मनाचा मांसल भाग असतो. माणूस म्हणजे मांस. मन म्हणजे माणूस.

प्रतिक्रिया द्या
7907 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विजुभाऊ Sun, 05/16/2021 - 07:12 नवीन
लेख अत्यंत दवणीय आहे. पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 05/16/2021 - 07:32 नवीन
लेख अत्यंत दवणीय आहे.
होय,मिपाला आपले दवणीय लेखन करणारे लेखक गवसले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रसाद गोडबोले Sun, 05/16/2021 - 10:09 नवीन
पण सर , लेखन दवणीय असलं तरीही आपण व्यवस्थित विवेचन करु शकतो.
मनाला मांस असते का?
आयुर्वेदात सप्त धातु सांगितले आहेत = रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र. सदर लेखक मांस वर अडकलेले दिसतात, पण मन हे मज्जा लेव्हल ला असल्याने त्यात मजा आहे !
आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे?
मन म्हणजे आपल्या मेंदुत असलेल्या अब्जावधी न्युरॉन्स ची कनेक्शन्स.
कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते?
येस. मुळात मन जखमी होणे हे दोन प्रकारे होते - पहिले म्हणजे फिजिकल आणि दुसरे म्हणजे इमोशनल. फिजिकल म्हण्जे मेंदुला अन त्यातील न्युरॉन्स ना धक्का लागला की मन जखमी होते ते . युट्युब वर कंकशन्स concussion असे सर्चह करा , ह्य विषयी तुम्हाला खुप काही शिकायला मिळेल . https://youtu.be/xvjK-4NXRsM आणि दुसर्‍या प्रकारची जखम म्हणजे मन अर्थात न्युरॉन्स ने आधीचही जी कनेक्शन्स बनवली आहेत ती तुटणे , हे कशानेही होऊ शकते, म्हणजे नवीन वाचन , नवीन लोकांशी संपर्क येणे , लोकांचे नवीन अनुभव येणे वगैरे. उदाहरणार्थ : सध्या मी फ्रेडरिक निश्चा वाचत आहे एके ठिकाणी तओ म्हणतो - आय फइलॉसोफाईझ विथ हॅमर . तो लिटरली असे विचार मांडत असतो कई जे आपलया लहानपणापासुनच्या शिकवणीला संस्कारांना हतोडीने तोडत असतात तेव्हा मन जखमी होण्याची शक्यता असते , रादर , ते तसे होतेच. अर्थात ही जखम , हे ब्रेकिंग हे जिम मध्ये व्यायाम केल्यावर मसल्स ब्रेक होतात त्या प्रकारातले असते कारण त्यातुनच पुढे हायपरट्रॉफी होणार असते !!
जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात?
आपले प्रियजन अन त्यांच्या वेदनेने आपल्या मनाला का दु:ख होते - फार सोप्पे उत्तर आहे. फक्त तुम्हाला आधी प्रियजन म्हणजे काय ह्याचे उत्तर शोधावे लागेल. आपण ज्या ज्या माणासांना ओळखतो ते ते एक कनेक्टेड ग्राफ असतात, बहुतांश वेळा डायरेच्टेड आणि वेटेड ग्राफ्स . आपला ब्रेन हे असे काहीसे मॉडेल करत असतो . एखाद्या कनेक्शन्चे वेट जितके जास्त तितके ते कनेक्शन जवळचे अर्थात तुम्ही म्हणता तसे प्रियजन वगैरे. पण अ‍ॅट द बेसिक, हे फक्त आपल्या न्युरॉन्स मधील कनेक्शन आहे बस्स बाकी काही नाही . आणि सर्वच्या सर्व कनेक्टेड असल्याने दु:ख आणि आनंद हे दोन्हीही ट्रान्स्फर होत असते . (अर्थात ही माझी थेअरी आहे, ह्याला सपोर्टिंग काही वैज्ञानिक पुरावा नाही . ) आता आपले जवळचे कोण आणि लांबचे कोण हे आपल्या मेंदुतील कनेक्शन आपल्याला कळणार कसे ? ह्यावर मी एक प्रयत्न केला होता फार पुर्वी : सविस्तर धागा हे पहा : माझी कंपुबाजी https://www.misalpav.com/node/24253 ह्यातील हा कनेक्टेड ग्राफ फार इंटरेस्टिन्ग आहे : आपल्याला उत्सुकता असल्यास सविस्तर उत्तर लिहिन ह्या वर : Image removed.
कारण आपली मनं त्यांच्या शरीरात वास करतात. माणूस मांसाचा गोळा असला तरी कुणी जाड असतो तर कुणी तोळामासा. त्याचप्रमाणे सुदृढ आणि सशक्त मने अनेकांच्या शरीरात वसलेली असतात. याउलट कृश मने केवळ काही जणांवर समाधान मानतात. जेवढ्या जास्त जीवांचे मिळून मन बनते तेवढेच ते हरहुन्नरी आणि ‌प्रसन्न असते. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक व्यक्ती कित्येक मनांचे मांसल रूप असते. प्रत्येक माणूस हाच मनाचा मांसल भाग असतो.
थोडे करेक्शन करुन - मन म्हणजे न्युरॉन्स मधीक कनेक्शन . काही लोकांची कमी असतील , काही लोकांची जास्त. त्यातील काही लोकांशी अपण कनेक्टेड असु काही लोकांशी नसु. माणुस हा मनाचा मांसल भाग नसुन मन हा माणसाच्या डोक्यातील मेंदुतील न्युरॉन्स मधील कनेक्शन्स चा केमीकल भाग आहे !
माणूस म्हणजे मांस. मन म्हणजे माणूस.
माणुस म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र. मन म्हणजे मेंदुतील, मज्जा संस्थेतील न्युरॉन्स ची कनेक्शन्स ! - इत्यलम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 05/16/2021 - 11:09 नवीन
ही न्युरॉन कनेक्शनची/पाथवेजची भानगड आधीपासून माहिती होती पण तुम्ही छान आढावा घेतला आहे, संदर्भांसहीत. आवदलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनुस्वार Sun, 05/16/2021 - 19:05 नवीन
मस्त माहिती मिळाली आपले विवेचन वाचून. धन्यवाद. 'कनेक्टेड ग्राफ'बद्दल लिहा की. वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनुस्वार Sun, 05/16/2021 - 19:09 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
कॉमी Sun, 05/16/2021 - 07:39 नवीन
?
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 05/16/2021 - 09:12 नवीन
प्रवीण दवणे गुगला.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 05/16/2021 - 09:23 नवीन
किरकोळ बाबदेखील हळवे होऊन भावनिक ओलावा दिलेल्या भाषेत लांबड लावून लिहिणे म्हणजे दवणीय :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 05/16/2021 - 12:29 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ग
गॉडजिला Sun, 05/16/2021 - 10:29 नवीन
....
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Sun, 05/16/2021 - 12:14 नवीन
तुम्ही गुरुदेवांचे "इन ट्यून विथ द ट्यून" वाचलंय का? त्यात हेच सर्व लिहलय. म्हणजे सुप्रा कॉंशस लेव्हल वरून आकल्ट अनुभव घेताना बर का.....नाही म्हणजे तुम्ही एकदा "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच!!
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार Sun, 05/16/2021 - 19:08 नवीन
दुवा द्याल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा
श
श्रीगुरुजी Sun, 05/16/2021 - 19:41 नवीन
कपाळावर हात मारून घेणारी स्माईली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुस्वार
न
नावातकायआहे Sun, 05/16/2021 - 19:53 नवीन
काय हो, तुम्ही वाचलय का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 05/16/2021 - 20:11 नवीन
वाचलंय? फिदी फिदी फिदी . . . मी लिहिलंय. गुरूदेव स्वप्नात आले आणि म्हटले लिही. मग लिहिलं. तुम्ही पण वाचा. किंमत ५ रूपये फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
अ
अनुस्वार Sun, 05/16/2021 - 19:56 नवीन
मला वाटलं बोलघेवडा एखाद्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत. आणि गुगलवर In Tune with the Infinite: Or, Fullness of Peace, Power, and Plenty Book by Ralph Waldo Trine हे पुस्तक सापडले. म्हणून दुवा मागितला. आता आपण कपाळावर हात मारला तेव्हा 'ट्युन' टोमणा होता असं वाटतंय. खरं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 05/16/2021 - 20:12 नवीन
भिंतीवर डोकं आपठणारी स्माईली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुस्वार
म
मनो Sun, 05/16/2021 - 21:39 नवीन
अनुस्वार, इथे ऐका :) https://youtu.be/b9ztrfinvZE?t=4939
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुस्वार Mon, 05/17/2021 - 08:33 नवीन
आपले खूप खूप आभार _/\_ तुमच्या मदतीशिवाय 'ट्युन' ची उकल‌ झाली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा