Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑनलाईन कट्टा - शनिवार २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ)

म
मनो
Tue, 05/18/2021 - 06:18
💬 158 प्रतिसाद
मिसळपावकर श्रीरंग_जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे ऑनलाईन कट्टा हा झूम ऍप द्वारे करण्याचा प्रयोग या विकांताला करणार आहोत. आत्तापर्यन्त प्रचेतस, भक्ती, श्रीरंग जोशी, चित्रगुप्त यांनी जमेल असे सांगितले आहे, श्री. अरविंद कोल्हटकर याना उद्या मी स्वतः विचारून पाहतो. एकंदरीत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्वान मंडळींच्या भेटीची ही संधी जरूर साधावी. तांत्रिक बाबी - ०) शनिवार दिनांक २२ मे २०२१ रात्री ९.३० (भारतीय वेळ) अमेरिकेत २२ मे, सकाळी ९.०० (pst) आणि १२.०० (est) १) झूम अँप फोनवर किंवा लॅपटॉपवर असेल तर उत्तम. फक्त ब्राऊसरमधून देखील झूम वापरता येते, पण थोडे गैरसोयीचे आहे. २) मीटिंग लिंक - येथे क्लीक करा https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09 कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति. ५) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ६) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. ज्यांना येणे शक्य आहे, त्यांनी प्रतिक्रियांत जरुर कळवावे. *ज्यांना काही कारणास्तव हजार राहणं जमलं नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग इथे आहे सुरुवातीला परिचय चित्रगुप्त काकांची चित्रे इथे सुरु होतात मनो - पानिपत पुस्तकाबद्दल श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति राहिलेल्यांचा परिचय, श्री. बिपीन सांगळे यांची कविता वाचन इतर गप्पा आणि समारोप

प्रतिक्रिया द्या
50088 वाचन

💬 प्रतिसाद (158)
म
मनो Wed, 05/19/2021 - 03:42 नवीन
हो रेकॉर्डिंग करून ठेवतो. अमेरिकेचे दोन्ही किनारे आणि भारत जमवायचं म्हणजे ही वेळ साधायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
म
मनो Wed, 05/19/2021 - 03:40 नवीन
कार्यक्रमाची साधारण रूपरेषा अशी असेल - १) सुरुवातीला परिचय - सर्व उपस्थितांना बोलण्याची संधी मिळेल. २) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. ३) श्रीरंग_जोशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या मनो यांच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आणि त्याविषयी आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांबद्दल १० मिनिटे थोडक्यात मुलाखत घेतील. ४) इतर कुणाला काही विषय मांडता येईल ५) उरलेला वेळ गप्पा-टप्पा आणि जे ऐन वेळी सुचेल त्या विषयांवर बोलण्यासाठी वापरता येईल. खूप जास्त उपस्थिती असल्यास ३-४ छोटे ग्रूप बनवून त्यात विभागून ही गोष्ट करता येईल. इतर सूचनांचे जरूर स्वागत आहे. जर कुणाकडे मूळ पोस्ट एडिट करण्याचे हक्क असतील, तर हा मजकूर मूळ धाग्यात ऍडवावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/19/2021 - 04:10 नवीन
हेच विचाणार होते. छान आहे रूपरेषा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
च
चौथा कोनाडा Wed, 05/19/2021 - 09:06 नवीन
उत्तम रुपरेषा ! उत्सुकता आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
त
तिता Wed, 05/19/2021 - 04:00 नवीन
सुन्दर कल्पना. मी येणार. दुबईमधून. दुबईचे कोणी मिपाकर भेटले तर आनंद द्विगुणित होईल
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/19/2021 - 10:03 नवीन
झूम व गुगल मीट मध्ये काय फरक आहे? मी गुगल मीट वापरले आहे. झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 12:27 नवीन
झूम आणि गूगल मीट दोन्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी बनवलेले सॉफ्टवेअर आहेत. अमेरिकन नागरिकत्व असलेल्या मूळच्या चिनी व्यक्तीने बनवले आहे. इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/19/2021 - 13:25 नवीन
पण पण व्यक्ती चीनी आहेच ना.... =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शाम भागवत Fri, 05/21/2021 - 06:53 नवीन
इन्स्टॉल न करताही थेट ब्राउझरमध्येही जाऊन बघू शकता.
याची नोंद घेतली आहे. हे फारच छान झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ह
हेमंतकुमार Wed, 05/19/2021 - 10:50 नवीन
झूम हे चीनी अॅप आहे का? ते प्रथम इन्टॉल करायला लागते का? >>> होय
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/19/2021 - 12:12 नवीन
माझा सहभाग नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
B
Bhakti गुरुवार, 05/20/2021 - 03:48 नवीन
Lol =) का?app चिनी आहे म्हणून असं काही नसत हो,बाकी तुमची मर्जी! =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
पाषाणभेद Wed, 05/19/2021 - 11:12 नवीन
मी माझ्या पाभे नावाचा चेहरा कसा काय घेऊन येवू?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/19/2021 - 13:10 नवीन
बांंधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
उ
उपयोजक गुरुवार, 05/20/2021 - 03:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/20/2021 - 09:46 नवीन
भारी ..., आता माझापण डीपी तयार करायला घेतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
१
१.५ शहाणा Wed, 05/19/2021 - 16:36 नवीन
मी नक्की समिल होइन
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/20/2021 - 01:53 नवीन
२) श्री. चित्रगुप्त आपली काही चित्रे दाखवतील, त्याविषयी थोडेफार सांगतील, आणि आपल्याला काहीं प्रश्न त्यांना विचारायची संधी मिळेल. याचा स्लाइडशो ओडिओ सह यूटूबवर टाकावा. म्हणजे तो पाहून आल्यावर झूमवरचा वेळ वाया जाणार नाही. शिवाय चित्राची माहितीवाला चानेल म्हणून इतर लोकही पाहतीलच.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/20/2021 - 04:37 नवीन
मी बरेच वर्षांपासून यूट्यूबवर चित्रांचा स्लाईड शो (काही पार्श्वसंगीत आणि काही माझ्या आवाजातील कथन यांसह) करावा या विचारात आहे परंतु ते कसे करावे याबद्दल कहीच ठाऊक नसल्याने ते राहून गेले. या निमित्ताने ते जमले तर छानच होईल. कृपया हे कळवले तर खूप मदत होईल. बाकी कट्ट्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना फारशी रूचि नसल्यास त्याऐवजी नंतर सावकाशीने एक लेख लिहीन किंवा खास चित्रकलेत रूचि असणारांचा एक स्वतंत्र झूमट्टा पुढे कधीतरी करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस गुरुवार, 05/20/2021 - 06:21 नवीन
आता ठरल्याप्रमाणे तुमचे सादरीकरण होऊ द्याच. ऐन वेळी बदल केल्याने गोंधळ होईल. फक्त हे मी सुचवले की मराठीत असा चानेल असावा. पिकासोबद्दलचे माधुरी पुरंदरे यांचे पुस्तक वाचले होते तेव्हा मराठीत असल्याने फारच आनंद झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/20/2021 - 06:25 नवीन
रेकॉर्डेड माहितीपेक्षा थेट प्रक्षेपण अधिक उस्फूर्त असते. कट्टेकरी प्रश्न विचारु शकतात, दाद देऊ शकतात. कट्ट्यादरम्यान तुमची पेंटिंग्ज पाहणे कट्टेकर्‍यांसाठी पर्वणी ठरेल. कृपया याबाबत पुनर्विचार करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/20/2021 - 09:07 नवीन
कंजूसराव, उत्तम सुचवणी ! हा पहिला ऑनलाईन कट्टा असल्यामुळे अश्या वेळ वाचवण्याच्या क्लुप्त्या महत्वाच्या आहेत. अर्थात कमी उपस्थिती असेल तर चित्रगुप्त यांची प्रात्यक्षिकासहित महिती पहायला,ऐकायला खुपच आवडेल !!! आणि चित्रगुप्त यांचा " यूट्यूबवर स्लाईडशो आणि चित्ररसिकांचा स्वतंत्र कट्टा" : १०१ % अनुमोदन ! खुप मजा येईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मनो गुरुवार, 05/20/2021 - 03:01 नवीन
कार्यक्रम आराखड्यात एक विषय नवीन श्री. अरविंद कोल्हटकर मिपा आणि ऐसी अक्षरे या दोन्ही स्थळांवर अनेकदा माहितीपूर्ण आणि वेगळे असे इतिहास, संस्कृत, गणित इत्यादी विषयांवर लिहित असतात. ते शुल्बसूत्रांतील भूमिति याविषयी बोलतील. पत्रिकेत ४) क्रमांकावर श्री. अरविंद कोल्हटकर - शुल्बसूत्रांतील भूमिति असा बदल संपादकांना करता आला तर करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 06:28 नवीन
नक्की येतो.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 08:17 नवीन
लहान मुलान्चे आणि एकुणच सगळ्यान्चेच सध्या होणारे अति स्क्रिन एक्स्पोझर आणि त्याचे परिणाम ह्यावर चर्चा झाली तर ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 05/20/2021 - 09:29 नवीन
म्या यकदा वडापावची गाडी सिंबायसीस च्या बाहेर लावली होती तिथं अन्कॉन्फरंस सुरु होती.. म्या इचारलं म्हंजे काय ? तो पोट्टे बोलु गेले की तिथ्ठ PHP camp unconference चालु हाय.. मंजे कुनीबी तिथे जमयचं आन पिच्पीतलं काय बी म्हायत असेल तर लगेच बोर्डाव ल्ह्याचं इषय लोकाना आवडला के लगा तुमास्नी मोटी खोली भेटुन जाते अन तुमी प्रेसेंटेशन सुरु क्रायचं ज्याज्या पब्लिकाला तुम्च्या इशयात रस हायि ते आपोपा तुमच्य रुमास्नी गोळा होत्याल बस आपन हेच ऑनलाइन मिपा कट्याले करयाच्च... १) एक धागा काढाचा मिपा कट्टा २०२१ लाइव २) जस जसं पब्लीक येत जाइल आन त्याना काइ इषय असेल लोकांशी बोलाचा तर त्याचे एक सेपरेट रुम बन्वुन त्याचा युआरेल या धाग्याव देचा, जायचं ते जात्याल त्यावं क्लिक करुन... उदा, चित्रगुप्तजी आलं मिटींगात अन म्हत्लं की मला यावर संवाद सादाय्वडेल की एक संवादगट नामक मिटींग्रुम करायची १) इशय चित्रक्ला. प्रमुख उपस्थीती चित्रगुप्त. त्याचा युआरेल २) इशय लेणी. प्रमुख उपस्थीती प्रचेतस. त्याचा युआरेल ३) इशय अम्रुतानुभव. प्रमुख उपस्थीती मार्कस गामा. त्याचा युआरेल ४) इशय कॉफी वीथ सोनेरी पेय. प्रमुख उपस्थीती फक्त बीहारी त्याचा युआरेल ५) इशय छंद माझा डवखुरा, प्रमुख उपस्थीती फलाना फलाना त्याचा युआरेल अमका ढिमका... म्हंजे गर्दी होनार नाय अन ज्यांना निसतं या इशयातुन त्यात जायचय अन कट्याचा आनंद घेयाचा हाय तेंचे बी सोय हुन जाइल
  • Log in or register to post comments
म
मनो गुरुवार, 05/20/2021 - 22:13 नवीन
ही पहिलीच वेळ आहे, या वेळचा अनुभव पाहून पुढे करू सुधारणा. खरं सांगायचं तर किती लोक येतील हाच अंदाज नव्हता. कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली. कट्टा हाउसफुल झाला की पुढे सुधारणा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
क
कंजूस Fri, 05/21/2021 - 02:24 नवीन
पुढे सुधारणा करू. ११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ग
गॉडजिला Fri, 05/21/2021 - 12:14 नवीन
कुणाची काय आवड ते तर लांबची गोष्ट झाली
बराबरै. तसं तर आपण इथंही भेटत आहोत आपल्या आवडी निवडी शेअर करत आहोतच, कट्याच्या अनेक लाभांपैकी एक म्हणजे ज्यांचे लेख आप रोज वाचतो, प्रतिसादतो त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायला मिळते याचा आनंद घेणॅ. आपण एक्टे नसुन आपल्या आचार विचाराचे/ प्रभाव टाकणारे चार लोकांसोबत एक थोडीशी स्पेस शेअर करता येणे (अर्थात हे करणे काहींचे साध्य नसुन साधनही असु शकते पण तो विषय आत्ता नको) हे उद्देश असल्याने त्यानुशंगाने नियोजन झाले तर मजा येइल कट्याला... अर्थात माझ्या प्रमाणे मिपाचाही असा कट्टा हा प्रथम प्रयोग असल्याने फार उत्सुकता आहे या सांस्कृतीक कार्यक्रमाबाबत... पोर्बॅबली इट कूड ब्यी ब्रेक्थ्रु ? हु नोज ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
व
वडाप गुरुवार, 05/20/2021 - 09:37 नवीन
हिकडं लावू काय?
  • Log in or register to post comments
N
nutanm Fri, 05/21/2021 - 05:53 नवीन
.मी येइन, नविन असल्यामुळे ओळख होईल.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/21/2021 - 06:49 नवीन
बरेच दादा लोक येणार असल्याने लैच दंगा होणार असे दिसते, या ऑनलाईन कट्ट्याला मी पण मुकौपस्थिती लावायचा प्रयत्न करेन. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 05/21/2021 - 08:43 नवीन
पैजारबुवा, तुम्ही लिहिलेल्या "मुकौपस्थिती" मुळे माझ्या डोळ्यापुढे आलेलं तुमच्या उपस्थितीचं चित्रं : Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/21/2021 - 11:54 नवीन
हे पाहुन आम्हाला "अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका" हे गाणे आठवले पण वरील प्रतिसादात आम्हाला आम्हाला "मुकं करोती वाचालं" यातला मुक अपेक्षीत होता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 05/21/2021 - 13:39 नवीन
पैजारबुवा

😂

चरण कुटं हायेत ... पैजारबुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गुल्लू दादा Fri, 05/21/2021 - 14:14 नवीन
जबरदस्त चित्र टाकलात चौ.को.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
व
वामन देशमुख Fri, 05/21/2021 - 13:56 नवीन
  • कट्ट्यावर सोशल डिस्टंसिन्ग पाळायचे आहे का?
  • कट्ट्यावर मास्क घालून बसायचे आहे का?
  • कट्ट्यावर किती वेळ बसायचे आहे?
  • बसायचेच आहे तर चखणा काय काय आहे?
  • नंतर खायला काय काय आहे?
ह्या ह्या ह्या !!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 05/21/2021 - 14:30 नवीन
१. हो. उदाहरणार्थ मंडई, दारूचा गुत्ता अश्या गर्दीच्या ठिकाणाहून कट्टाला उपस्थित राहू नये. घरातून उपस्थित राहिल्यास उत्तम. बायका, मुलांना दुसऱ्या खोलीत बसायला सांगितल्यास १०० % सोशल दिस्तां डिस्तसिंग राखले जाईल. २. मास्क चालेल. पण बाकीचेही कपडे घालणं अनिवार्य. फक्त मास्क आणि चड्डी/टॉवेलवर बसलोय असं नको. ३. आपण कितीही वेळ बसला तरीही चालेल. आम्ही १ तासाने निघणार. ४. चाखणा आपल्या आवडीचा आणि आपल्या आपणच आणावा. आम्हाला सँपल कुरिअर करावे. पत्ता व्यानि केलेला आहे. ५. नंतर मिपातर्फे खायला काही नाही. जेवण स्वतच्या जबाबदारी वर करावे. उपाशी पोटी झोपले तरी आम्हाला काही देणेघेणे नाही ! ह्या ... ह्या ... ह्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
स
सुरिया Fri, 05/21/2021 - 13:59 नवीन
कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का? लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 05/21/2021 - 14:23 नवीन
कॉम्प्युटरला वेबकॅम नसल्यास काय करता येईल? मोबाईलचा कॅमेरा जोडता येतो का? लोकांचे व्हिडिओ बघून आणि नुसते ऑडिओ ऐकवणे असे काही करता येईल का? >> कॉम्प्युटर व मोबाईल दोन्हीकडून जॉइन करता येईल. कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहायचं. मोबाईलवर ऐकायचं, बोलायचं, अन मोबाईलच्या क्यामेर्‍याने दिसायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
स
सुरिया Fri, 05/21/2021 - 14:32 नवीन
तसे नाही, मोबाईलमध्ये झूम वापरायचेच नाही. फक्त कॅमेरा वापरायचा. झूम पीसीवरच इन्स्टॉल करायचेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Fri, 05/21/2021 - 14:46 नवीन
डायनोसर नामशेष व्ह्यायच्या आधी, म्हणजे अंदाजे २००५-०६ मध्ये चायनीज फोन जर केबल ने विंडोज एक्सपी कॉम्प्युटरला जोडला, तर तो वेब कॅम म्हणून डिटेक्ट व्ह्यायचा अन वापरता यायचा. आता तसं होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
उ
उगा काहितरीच Fri, 05/21/2021 - 17:03 नवीन
अस केल्याने echo होईल . एका ठिकाणावरून mute करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया
श
शिवाजी नाठे Fri, 05/21/2021 - 16:37 नवीन
हरहुन्नरी मिपाकरांचे लेख तर आवडतातच , बोल ऐकाण्याची संधी वाया घालवू नये असे वाटते
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 05/21/2021 - 16:51 नवीन
फक्त वाचक सहभागी होऊ शकतात का ? हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवाजी नाठे
ब
बांवरे Fri, 05/21/2021 - 21:42 नवीन
सहभागी व्हायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 05/22/2021 - 05:36 नवीन
नमस्कार मंडळी , मीही जॉईन होईन . वाट पाहतो
  • Log in or register to post comments
म
मोहन Sat, 05/22/2021 - 08:58 नवीन
मिटींग क्रमांक व पासवर्ड दिला तर जॉइन करायला सोपे होईल असे वाटते
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/22/2021 - 13:22 नवीन
मीटिंगची लिंक धाग्यात दिलेलीच आहे, ती पुन्हा खाली देतोय. https://twilio.zoom.us/j/97023197139?pwd=QlVJUVpWZlIvUjVLZjFKRHVxUCtPdz09 पासवर्ड द्यायची गरज नसेल (अथवा ऐनवेळी धाग्यावर देणार असतील) असे वाटते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन
म
मनो Sat, 05/22/2021 - 17:17 नवीन
पासवर्ड लिंकमध्ये आपोआप दिला आहे, स्वतंत्र टाकण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा