Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

म
मदनबाण
Tue, 05/18/2021 - 19:18
💬 103 प्रतिसाद
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो. हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली. या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्‍यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

प्रतिक्रिया द्या
48853 वाचन

💬 प्रतिसाद (103)
ग
गॉडजिला Tue, 05/18/2021 - 19:47 नवीन
मन एकदम प्रसन्न होते.
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Tue, 05/18/2021 - 19:58 नवीन
Chupke Chupke Raat Din
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Tue, 05/18/2021 - 20:01 नवीन
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/19/2021 - 17:48 नवीन
सुरेल ! हरिनिवासनम आणि या दोन्ही मुळे मन आनंदित झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ujjwal
ध
धर्मराजमुटके Wed, 05/19/2021 - 17:51 नवीन
हरिनिवासनम हे हरिवरासनम असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
स्वलिखित Sat, 05/22/2021 - 17:02 नवीन
गुलाम अली , अजून हेच ऐकतोय आम्ही ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ujjwal
B
Bhakti Wed, 05/19/2021 - 04:29 नवीन
श्रीलथा यांनी सुंदर गाणं गायलय.धाग्याची थीम आवडली. नमो नमोजी शंकरा (केदारनाथ _/\_) क्या समय.. क्या प्रलय दोनों में तेरी महानता महानता.. महानता Read more: https://www.hinditracks.in/namo-namo-lyrics-kedarnathiframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/dx4Teh-nv3A" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen>
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/19/2021 - 04:30 नवीन
https://youtu.be/dx4Teh-nv3A
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 04:35 नवीन
सुपरनॅचरलचा सातवा सीजन सुरू आहे. मजा येते पाहायला.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/19/2021 - 05:01 नवीन
पहिला सिझन डाउनलोड ला टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 05:05 नवीन
१५ सीजन आहेत एकूण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Wed, 05/19/2021 - 07:03 नवीन
चार दिवस सासूचे सारखे डेलीसोप म्हणून बघायला पाहिजे! भरपूर दिवस पुरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 05/19/2021 - 07:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
म
मदनबाण Wed, 05/19/2021 - 04:53 नवीन
[ प्रतिसाद देण्यार्‍यांना अजुन एक विनंती... प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे पुढे धागा उघडण्यास जड होणार नाही. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 05:18 नवीन
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 05/19/2021 - 07:12 नवीन
सालचा हिंदी सिनेमा आहे. कॉलेजात शिकणारी तीन मुले सायकलवरुन दक्षिण भारताच्या प्रवास करतात.यात मल्याळी अभिनेते मामुट्टी यांच्यासहित अजून काही दक्षिण भारतीय अभिनेते आहेत. काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर आला आहे. जरुर पहा. https://youtu.be/QiWInLDA298
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 05/20/2021 - 11:55 नवीन
सुरेख चित्रपट . +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 09:07 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/19/2021 - 12:01 नवीन
२ दिवसांपूर्वीच श्री आद्य शंकराचार्य यांची जयंती हिंदूस्थानात साजरी झाली... हजारो वर्षांपुर्वी त्यांनी केलेली रचना आजही ऐकावी अशीच आहे. @ वरती सगळ्यांनी जी गाणी दिली आहेत, ती सर्व ऐकली. गॉडझिला तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/19/2021 - 17:51 नवीन
हिंदूस्थानात इतके दिव्य लोक होउन गेलेत की त्याची गणना करणे ही कठीण आहे, अशाच दिव्य लोकांच्या रचनाही तितक्याच दिव्य,प्रभावी आणि अद्भुत देखील आहेत. माझा शोध कधी तरी अश्या रचनां पर्यंत मला घेउन पोहचतो आणि जे पहायला आणि ऐकायला मिळतं ते मी आधी कधीच ऐकलेले आणि पाहिलेले नसते. अशीच एक रचना... [ *** रचनेच्या शेवटी ती कशी केली आहे हे देखील कळते. ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 18:59 नवीन
संस्कृत सुस्पष्ट बोलणे यासाठी जिभेवर असावे लागणारे नियंत्रण व त्यानुशनगे मेंदूकडून जिव्हेकडे संदेशवाहनात होणाऱ्या क्रिया या मेंदूच्या विकासाचा उत्कृष्ट व्यायाम आहे असे माझे फार पूर्वी पासून निरीक्षणात्मक मत आहे... केंव्हाही आपण ताण तणावात असाल तर कोणतेही संस्कृत स्तोत्र निवडावे व खणखणीत पण धीरगंभीर आवाजात म्हणून घ्यावे... त्यातील शब्दाचा अर्थ शष्पही समजत नसला तरीही मनाला हलकेच वाटते हा अनुभव आहे Times Music ची sacred chants of Shiva ही माझी अत्यन्त आवडती सीडी होती... Art of Living च्या लोकांनी अत्यन्त धीरगंभीर आवाजात म्हटलेले शिवोहम शिवोहम तर कहर... त्यातील आत्माष्ट्कम, भावन्याष्ट्कम, लिंगाष्ट्कम तत्काळ चित्त वृत्तीला लगाम लावतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sun, 05/30/2021 - 13:49 नवीन
Art of Living च्या लोकांनी अत्यन्त धीरगंभीर आवाजात म्हटलेले शिवोहम शिवोहम तर कहर... काही वर्षांपुर्वी मी मनिष व्यास यांनी गायलेले शिवोहम ऐकले होते ते आता आठवले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Mon, 05/31/2021 - 16:04 नवीन
भारि आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ध
धर्मराजमुटके Wed, 05/19/2021 - 17:57 नवीन
माझे माहेर पंढरी
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Wed, 05/19/2021 - 19:46 नवीन
सोजुगादा - sojugada विट्ठल पांडुरंग - Vithala रंगम्मा - Rangamma तुंग तिरदी tunga tiradi पं भीमसेन जोशी - भाग्यदा लक्ष्मी bhagyada laxmi थोडे वेगळे - ऐकण्यास्तव - मधुराश्टकम
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... गुरुवार, 05/20/2021 - 02:59 नवीन
टाकायलाच आलेलो. गेलं वर्षभर वेड लागलंय मला त्या गीतामुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 06:54 नवीन
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा उत्तरा उन्नीकृष्णन ह्या गोड मुलीच्या गोड आवाजातही ऐकून बघा. https://www.youtube.com/watch?v=t5RFWwtb2Ms Bhagyada lakshmi baramma nammamma ni sau| Bhagyada lakshmi baramma|| Hejjaya mele hhejjeyanikkuta gejje kalgala dhvaniya madutha sajjana sadhu pujeya velege majjigeyolagina benneyante||1|| Kanaka vrstiya kareyuta bare mana kamanaya siddhiya tore dinakara koti tejadi holeva janakarayana kumari bega||2|| Attittalagalade bhaktara maneyali nitya mahotsava nitya sumangala satyava toruva sadhu sajjanara cittadi holeva puttali bombe||3|| Sankhye illada bhagyava kottu kankana kaiya tiruvuta bare kunkumankite pankaja locane venkataramanana binkada rani||4|| Sakkare tuppada kaluve harisi shukravaradha pujaya velage akkareyulla alagiri rangana cokka purandara vithalana rani||5||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
B
Bhakti गुरुवार, 05/20/2021 - 03:43 नवीन
हे स्त्रोत्र ऐकण्यासाठीची योग्य वेळ सांगा.मला वाटेल तेव्हा मी ऐकतेच,पण घरात मोठ्या आवाजात कधी लावावे ?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 05/20/2021 - 04:33 नवीन
सकाळी शुचिर्भूत आवस्थेत लाल वस्त्रावर दुर्गा देवीचा फोटो/मूर्ती ठेऊन महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा पाठ केला जातो (विषेशतः नवरात्रात)... दुर्गादेवीचे स्वरूप तसे उग्र आहे पण हृदय तितकेच कोमल परिणामी हे स्तोत्र सप्तशतीचा भाग जर नसेल (मला नेमकी कल्पना नाही) तर कधीही केंव्हाही कसेही गुणगुणायला हरकत नसावी... जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 07:01 नवीन
भक्तीताई, अशी काही वेळ काळ नसावी. अर्थात देवाची भक्ती करण्यासाठी कुठलीही वेळ चांगलीच. https://sanskritdocuments.org/doc_devii/mahisha_mean.html इथे हे स्तोत्र आहेच. जिभेला वळण लागण्यासाठी अतिशय उत्तम आहे. जर समजा तुम्हाला बघून कठीण वाटले तरी एवढे कठीण नाही. ५-६ अक्षरे झाली की संधीवविग्रह करावा आणि म्हणावे. अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते । निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४॥ इंग्रजी अर्थ : O One who split the heads (of demons) into hundreds of pieces and One who cut the trunks of great battle elephants . whose great lion is skilled in terrifying valor in tearing apart the temples of enemy elephants . One who has cut down into pieces the heads of enemy chieftains with the strength of her own arms.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
B
Bhakti गुरुवार, 05/20/2021 - 07:49 नवीन
अशी काही वेळ काळ नसावी. अर्थात देवाची भक्ती करण्यासाठी कुठलीही वेळ चांगलीच.
माझंही हेच मत आहे.पण आपल्यामुळे दुसऱ्यांना​ त्रास नको म्हणून विचारले.मी यूट्यूब वर लिरीकल व्हिडिओ लावून मुलीबरोबर म्हणते कधीकधी, त्यामुळे तिला उच्चार नाही पण त्या स्तोत्राचा ताल समजला आहे आणि आवड निर्माण​ होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले गुरुवार, 05/20/2021 - 07:08 नवीन
https://sanskritdocuments.org/doc_devii/gangAlaharI.html जगन्नाथ पंडितांच्या सर्वच रचना अतिशय अप्रतिम आहेत. माझ्या विशेष आवडीची रचना म्हणजे गंगालाहिरी स्तोत्र. म्हणायला अतिशय सुमधुर आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे भाषेचे अप्रतिम सौंदर्य त्यात उलगडले आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/20/2021 - 12:35 नवीन
जगन्नाथ पंडितांच्या या रचनांची ऑडिओ कुठे उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
U
Ujjwal गुरुवार, 05/20/2021 - 08:40 नवीन
नमो नमो जी शंकरा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/20/2021 - 16:09 नवीन
मला जितक आठवतं त्या नुसार माझ्या बालपणी अनेक वेळा विष्णु सहस्त्रनाम माझ्या कानावर पडलेले आहे, कोणाच्या घरी पहाटे ते लावले जात असे [ बहुधा ते दाक्षिणात्य असावेत. ] कोठेतरी ते सहस्त्रनाम अंतरमनात कायमचे भिनले असावे... काळ जसा पुढे गेला तसे तो आवाज एम एस सुब्बलक्ष्मी यांचा आहे हे मला कळले. बहुधा हिंदूस्थानात सगळ्यात जास्त म्हंटले गेलेले / जाणारे आणि सगळ्यात जास्त ऐकले गेलेले हे एकमेव सहस्त्रनाम असावे. या सहस्त्रनामाचे अन्यन साधारण महत्व आहे. या मागे असलेली एक कथा / गोष्ट जी मला ठावूक आहे ती इथे सांगतो. :- महाभारतात भीष्म शरपंजरी अवस्थेत जेव्हा पडुन होते, तेव्हा भगवान श्री कृष्णाने त्यांना पांडवांना उपदेश करण्यास सांगितले. भिष्मांनी जो उपदेश केला त्यात त्यांनी पांडवांना विष्णु सहस्त्रनाम देखील सांगितले ज्यास तिथेच उपस्थित असलेल्या भगवान श्री कृष्णाचे अनुमोदन देखील होते. त्यामुळे हे एकमेव सहस्त्रनाम आहे ज्यास साक्षात भगवंताचे अनुमोदन लाभले आहे. याच्या खालोखाल ललिता / ललिथा सहस्त्रनाम आहे, जे मुख्यत्वे दक्षिण भारतातच ऐकले जाते. इथे वेळे संदर्भात विचारणा झाली त्यावर :- मी काही या विषयातील तज्ञ नाही / ना जाणकर आहे, भगवंताचे नाम केव्हाही घ्यावे... पण काही रचना अश्या असाव्यात / आहेत ज्यात काळ / वेळ महत्वाचा असतो. उदा. काकड आरती ही पहाटेच केली जाते आणि शेजारती ही रात्री केली जाते. अजुन उदा. ध्यावयाचे झाल्यास रात्री सूक्तम हे रात्रीच म्हणावयास हवे. *********************************************************************************** तंत्रोक्त रात्री सूक्तम :- जाता जाता :- @ गॉडजिला मागच्या प्रतिसादात हे सांगायचे राहुनच गेले होते की तुझ्यामुळे अनेक वर्षांनी मी आता कोठे धावे मन हे ऐकले, त्या बद्धल विशेष आभार. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “I realized then that even though I was a tiny speck in an infinite cosmos, a blip on the timeline of eternity, I was not without purpose.“ :- R.J. Anderson
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 05/20/2021 - 18:50 नवीन
भिष्मांनी जो उपदेश केला त्यात त्यांनी पांडवांना विष्णु सहस्त्रनाम देखील सांगितले ज्यास तिथेच उपस्थित असलेल्या भगवान श्री कृष्णाचे अनुमोदन देखील होते. त्यामुळे हे एकमेव सहस्त्रनाम आहे ज्यास साक्षात भगवंताचे अनुमोदन लाभले आहे. एम एस सुब्बलक्ष्मी म्हणजेच चैतन्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
B
Bhakti गुरुवार, 05/20/2021 - 18:45 नवीन
आरती देणे-मशाल जळणे २.अत्तर शिंपडणे-कबूतर पंखांची फडफड ३.फुलं वाहणे-झाडांहून अलगद फुलं पडणे हे योगायोग आणि गाणं 'दोन' कान्हा साठी, कृष्णभक्ती
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 05/20/2021 - 19:23 नवीन
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 05/21/2021 - 17:27 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/22/2021 - 16:43 नवीन
विष्णु सहस्त्रनामा नंतर सगळ्यात जास्त माझ्या कानावर अनेकदा पडलेले स्वर्गीय शब्द ! श्री व्येंकटेश सुप्रभातम कनकधारा अष्टवम्

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richards
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 05/22/2021 - 17:21 नवीन
https://youtu.be/vDTDBgX360M
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 05/23/2021 - 14:46 नवीन
नेत्र मिटुन याचा घेउ तितका अस्वाद कमीच.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 05/23/2021 - 16:36 नवीन
राम राम श्री राम कल्याण करी रामराया https://youtu.be/hUEjo2rBNMg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Sun, 05/23/2021 - 14:47 नवीन
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 05/23/2021 - 16:17 नवीन
माझा अगदी आवडता ऍनिमेशनपट आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
क
कॉमी Sun, 05/23/2021 - 15:02 नवीन
टिमोथी कॅल्मेट बद्दल लिहिल्याने कॉल मी बाय युअर नेम पुन्हा बघितला. इटली मधील सुरेख ठिकाणं, सुंदर 'कमिंग ऑफ एज' प्रेमकथा, अतिशय सुंदर संवाद. मस्त सिनेमा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/24/2021 - 16:22 नवीन
उद्या नृसिंह जयंती आहे, त्या निमित्त्याने नृसिंह कवच इथे देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramago
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/24/2021 - 16:34 नवीन
भो शम्भो शिव शम्भो स्वयंभो हे बर्‍याच वेळा ऐकले आहे, अनेक गायकांनी ते गायले आहे. मला आवडलेले असे दोन व्हिडियो आज सोमवारच्या निमित्त्याने देत आहे. **********************************************************************************

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramago
  • Log in or register to post comments
ब
बांवरे Mon, 05/24/2021 - 21:32 नवीन
आणि श्रवणीय आहे. - धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बांवरे Mon, 05/24/2021 - 21:25 नवीन
इथे ऐका पहिल्या - 'आजं' ... (ज पुर्णोच्चार ) पासुन अतिशय सुरेल गाणे तितक्याच सुरेख चालीत बान्धलेले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा