जे न देखे रवी...

भ्रम

Primary tabs

विस्मरणाच्या जाळीत
गुंतलेल्या जीवनात
भ्रम झुळूक होतात...

कधी निसट्तात
कधी मुळ उपटतात
भ्रम पावले चोरतात....

मनीचे गुंजन गातात
दु:खाला चिमटीत पकडतात
भ्रम रूप दाखवतात....

काळ्या ढगांत
उन्हाचे अस्तित्व
भ्रम सर्वांग जाळतात...

आठवणींना वर्तमानात
गडद रंगवतात
भ्रम खोल दरीत राहतात....
मनाच्या,कल्पनेच्या,अस्तित्वच्या....असंख्य जागी...

कवीच्या मनात भ्रम निर्माण झाला.कल्पकता छान आहे आणि हो तुमची तीन ओळीत कडवे करण्याची शैली निराळीच!