Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या मी काय पाहतोय ? भाग ७

म
मदनबाण
Sat, 06/19/2021 - 19:46
💬 88 प्रतिसाद
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्‍यांदा आणि बर्‍याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा... मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिन जेव्हा हे घडुन येवुन या चित्रपटाचा सिक्वल तयार करुन पूर्ण होइल... विशेष :- Lynn Collins [ कथेतील नाव :- Dejah Thoris ] तिच्या अनोख्या वेषभुषेत अत्यंत सुंदर दिसली आहे. :) मी इतकचं सागतो... या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास हा Ock, Ohem, Ocktie, Wies Barsoom आणि Ock, Ohem, Ocktie, Wies Jasoom या दोन जादुई शब्दांच्या मधला आहे,बाकी तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्यावा असाच तो आहे. :) खरंतर मी मागच्या भागात गॉडजिलाला म्हणालो होतो...तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. पण मला त्या चित्रपटा पेक्षा हा आधी द्यावा वाटल्याने, याने या भागाची सुरुवात केलेली आहे. - -- --- या धाग्यात प्रतिसाद देणार्‍यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही. आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

मदनबाण.....


प्रतिक्रिया द्या
42633 वाचन

💬 प्रतिसाद (88)
म
मदनबाण Sun, 06/20/2021 - 04:43 नवीन
गीतकार, लेखक आणि उत्तम वक्ता मनोज शुक्ला हे मनोज मुंतशिर या टोपण नावाने सगळ्या रचना करतात... त्यांचे श्याम नारायण पाण्डेय कृत हल्दीघाटी चे ६ भाग मी पाहिले / ऐकल्यावर मनोज मुंतशिर यांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व अजुन अधिक जाणुन घेण्यासाठी त्यांची दोन भागात असलेली मुलाखत पाहिली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/21/2021 - 13:54 नवीन
खिळवून ठेवणारेई अप्रतिम मुलाखत आहे ही !

💯

पाहिली नसेल तर नक्की पहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sun, 06/20/2021 - 09:29 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.”:- Arnab Goswami
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 06/20/2021 - 10:08 नवीन
आपल्या मनातिल विचार सतत प्रतिमांचे रुप धारण करुन आपल्या शरीराच्या आस्पास ते द्रुक्श्राव्य स्वरुपात प्रकट होउ लागले तर काय होइल ? अर्थातच एक मनोरंजक मसालापट कारण कोणीच स्वताचे विचार लपवु शकणार नाही.. एखाद्या सुरेख संकल्पनेची पुरेपुर माती करुन कथानकाची वाट लावणे म्हणजे काय हे समजुन घ्यायचे असेल तर केऑस वॉचिंग अवश्य बघा...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/20/2021 - 15:07 नवीन
शेरनी हा प्राईम वरचा हिंदी चित्रपट छान आहे. विद्या बालन, नीरज काबी, विजयराज इत्यादी. जंगल खाते, वाघ पकडणे, वाघाची शिकार, सरकारी खाक्या, बाबू व खाबूगिरी आणि नेत्यांची अरेरावी हे सर्व चांगल्या पद्धतीने दाखवले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 06/21/2021 - 12:19 नवीन
हा चित्रपट चांगला म्हणणे अवघड जागचे दुखणे आहे कारण चांगला म्हणावा तर करप्ट सिस्टीम मूकपणे स्वीकारली आहे असे म्हणणे भाग पडतं वाईट म्हणावा तर त्यात चूक काहीच दाखवलेले नसल्याने वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
म
मुक्त विहारि Sun, 06/20/2021 - 16:28 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/20/2021 - 16:38 नवीन
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् अर्थात :- ‘‘जो पुरूष धर्म का नाश करता है, उसी का नाश धर्म कर देता है, और जो धर्म की रक्षा करता है, उसकी धर्म भी रक्षा करता है । इसलिए मारा हुआ धर्म कभी हमको न मार डाले, इस भय से धर्म का हनन अर्थात् त्याग कभी न करना चाहिए ।’’

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “To the Lutyens media: You have been defeated by the people. You don’t matter.” :- Arnab Goswami
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 06/20/2021 - 17:47 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कॉमी Sun, 06/20/2021 - 18:10 नवीन
ह्या ओळी जिथून आहेत तिथे धर्माचा त्याग म्हणजे नक्की कधी होतो काही दिलयं का ? स्वतःबद्दल तपासायला म्हणून विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॉडजिला Sun, 06/20/2021 - 18:29 नवीन
व सध्या कलियुग असल्याने कुमार विश्वास यांनी असे काही विधान करण्यापुर्वी किमान इतिहास तरी वाचायला हवा होता असं म्हणावेसे वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
म
मुक्त विहारि Tue, 06/22/2021 - 19:41 नवीन
https://youtu.be/YOjQVjTRVNg ------- https://youtu.be/ge7Ah7UTRLM
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 06/26/2021 - 07:19 नवीन
आज मदनमोहनजी यांचा जन्म दिन !तेरे लिये हे गाणं न आवडणारा निराळाच असेल.या गाण्यामुळे मदन मोहन आणि लता मंगेशकर या द्वयीचे अफलातून सूत्र मला समजले.त्या आधी चित्रहार, रविवारीचे ब्लॅक अँड व्हाइट गाणी नंतर रेडिओ यावर त्यांची गाणी ऐकायचे पण जादू वीर झारा नंतर चढत गेली. लग जा गले https://youtu.be/TFr6G5zveS8 आपकी नजरो ने समझा https://youtu.be/8txT8UGTCto ज्यूक बाक्स https://youtu.be/I8tVaKhVuBo
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/26/2021 - 16:16 नवीन
हल्लीच सहकुटुंब मेरा साया आणि आनंद पाहिला. दोन्ही चित्रपट फार सुंदर आहेत हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. आनंद चित्रपटच्या शेवटच्या ३०-४० मिनीटात माझ्या डोळ्यात पाणी आले... - -- --- जरासे वेगळ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Believer... :- Imagine Dragons
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/27/2021 - 07:26 नवीन
निळूभाऊ फुले या प्रतिभावंत कलाकाराला मला आणि माझ्या वडिलांना भेटता आले याचा विशेष आनंद आहे. माझे तिर्थरुप कॉलेज मध्ये असताना त्यांच्या सगळ्या मित्रां बरोबर ते रविंद्र नाट्य मंदिर मध्ये सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहलेले नाटक पहावयास गेले होते, नाटक संपल्यावर मागच्या बाजुने जाउन त्यांनी निळूभाऊं बरोबर हास्तांदोलन केले होते, तर मी लहान असताना मामाच्या घरी गेल्यावर कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोन मध्ये अनेकवेळा जात असे. त्यावेळी मी निळूभाऊंची स्वाक्षरी घेतल्याचे स्मरते. बाकी वरती तेंडुलकरांचे नाव घेतले आहे त्यावरुन मला वडिलांनी गप्पा मारताना सांगितले की रमेश तेंडुलकर [ सचिन तेंडुकर यांचे वडील ] त्यांना किर्ती कॉलेज मध्ये मराठी भाषा विभाग प्रमुख असताना [ रमेश तेंडुलकर ] त्यांच्या [ वडिलांच्या ] वर्गात प्राध्यापक म्हणुन होते...मर्ढेकर यांच्या एका कवितेतील दहा दहाची लोकल गाडी सोडित आली पोकळ श्वास ही त्यांची आवडती ओळ ते बर्‍याच वेळा म्हणायचे असे त्यांनी मला सांगितले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -तैरना है तो समंदर में तैरो नालों में क्या रखा हैं,प्यार करना है तो देश से करो औरों में क्या रखा हैं !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 06/29/2021 - 13:53 नवीन
बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो अनेकदा टीव्हीवर लागला असता काही ना काही कारणाने हा चित्रपट मिसत होता... पाहुन झाल्यावर आता वाटते की चित्रपट छान आहे वरवर परंतु अंडर द सरफेस सबस्टंस मिसींग आहे... ही कथा मंगळाऐवजी पृथ्वीची दाखवली असती तर जास्त रॉ फिल येउन कथानकात गुंतवणुक अजुन वाढली असती कारण मंगळाचा मुळ कथेशी कसलाच सिग्निफिकंस नाही... बरे परग्रहावरुन पृथ्वीवर आलेला सुपरमॅन इथे शक्तिशाली व सुपरहिरो ठरतो पण इथुन तिकडे गेलेला कार्टर पोटेन्शीअल असुनही सुपरहीरो व्यक्तीरेखा ठरत नाही अजुन बरेच डिटेलिंग मिसींग असल्याने चित्रपट एक पुर्णानुभव न ठरता चांदोबातील बालकथा ठरतो जी प्रौढांसाठी अपरिपक्व कथानक ठरते... आश्चर्य आहे की एखाद्या चित्रपट कथेचा टार्गेट ऑडियन्स लहान मुले असुनही याच्या निर्मीतीसाठी अवाढव्य खर्च केला गेला... इतका खर्च न करता हेच कथानक घेउन कमी बजेटमधे हा चित्रपट बनवला असता तर अपयशी असा शिक्का माथी आला नसता
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/29/2021 - 18:46 नवीन
बरेच वर्षे याबद्दल ऐकुन होतो अनेकदा टीव्हीवर लागला असता काही ना काही कारणाने हा चित्रपट मिसत होता... मी पहिल्यांदा टिव्हीवर पाहिला होता बहुतेक... त्यावेळी तो डिज़्नी चा चित्रपट आहे हे देखील माहित नव्हते... ही कथा मंगळाऐवजी पृथ्वीची दाखवली असती तर जास्त रॉ फिल येउन कथानकात गुंतवणुक अजुन वाढली असती कारण मंगळाचा मुळ कथेशी कसलाच सिग्निफिकंस नाही. आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. कार्टर तर सोनाच्या शोधात असतो आणि नंतर गुहेत छताला सोने लागलेले पाहत असताना अचानक झालेल्या घडामोडींमुळे तो मंगळावर अचानक पोहचतो. परग्रहावरुन पृथ्वीवर आलेला सुपरमॅन इथे शक्तिशाली व सुपरहिरो ठरतो पण इथुन तिकडे गेलेला कार्टर पोटेन्शीअल असुनही सुपरहीरो व्यक्तीरेखा ठरत नाही अजुन बरेच डिटेलिंग मिसींग असल्याने चित्रपट एक पुर्णानुभव न ठरता चांदोबातील बालकथा ठरतो जी प्रौढांसाठी अपरिपक्व कथानक ठरते... याचा अर्थ तुम्हाला चित्रपट नीट समजुन घेता आलेला नाही असे दिसते. ही कुठल्याही सुपरहिरोची कथा नाही. जॉन कार्टर हा तुमच्या / माझ्या सारखा पृथ्वीतलावरील सर्वसाधारण मनुष्यप्राणी आहे, फक्त अचानक मंगळावर पोहचल्याने तिथल्या गुरुत्वाकर्षणाच्या त्याचा शरिरावर जो प्रभाव होतो तो उंच उडी मारण्याची क्षमता दर्शवतो, यापलीकडे सुपरपावर अशी कोणतीच गोष्ट त्याच्यात नाही,कारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही. आश्चर्य आहे की एखाद्या चित्रपट कथेचा टार्गेट ऑडियन्स लहान मुले असुनही याच्या निर्मीतीसाठी अवाढव्य खर्च केला गेला... इतका खर्च न करता हेच कथानक घेउन कमी बजेटमधे हा चित्रपट बनवला असता तर अपयशी असा शिक्का माथी आला नसता इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा... बाकी लहानमुले कुठलेही चित्रपट बिनधास्त बघतात... इन्सेप्शन सारखा चित्रपट देखील. :) आणि माझ्या सारखा प्रौढ देखील बिनदिक्त आजही टॉम अँड जेरी आणि अगदी छोटा भीम देखील आवडीने पाहतो... :) नको तिथे उगाच चिकित्सा करत बसण्याचा माझा स्वभाव नसुन, जे आहे त्यातुन आनंद कसा मिळवता येइल अश्या दृष्टीकोनातुन मी पाहण्याचा नेहमी प्रयत्न करतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 06/29/2021 - 19:13 नवीन
आपल्या ग्रहावर आपणच इतका धुडगूस घालतोय त्यात अधिकची भर कशाला ? :))) [ मला हल्कचा पहिला भाग प्रचंड आवडला होता. ] ही कथा मुख्यत्वे मंगळावरच्या राजकुमारीची आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यक कारण ते पात्र मुळातच सुपरपावर असलेले नाही. अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही. इतका खर्च केला म्हणजे काहीतरी विचार करुनच केला असावा... च नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही. गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते. मी स्वतः अ‍ॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 06/29/2021 - 19:59 नवीन
मंगळ नाव घेतल्याने सायफायचा फिल तयार होतो जो या चित्रपटाचा अजिबात भाग नाही, प्रुथ्वी ऐवजी लॉर्ड ओफ द रिंग प्रमाणे फँटसी जगही तयार करता आले असते... मंगळ प्रकरणच अनावश्यक कुठलाही चित्रपट बघण्याच्या आधीच त्यावर अनुमान तयार करणे योग्य नाही. वरती सांगितल्या प्रमाणे ही कथा मंगळावरच्या राजकुमारीची आहे आणि तिचे राज्य वाचवण्यासाठी ती जॉनची मदत घेउ इच्छिते. इथे तिची तजजोड,तीची बुद्धिमत्ता आणि शेवटी जॉन वरती तिचा जीव जडणे हा गाभा आहे. अचांटा उंचिच्या अफाट लांबीच्या उड्या आख्या ग्रहावर फक्त एक माणुस मारु शकतो ही त्या ग्रहावरची सुपर पॉवरच आहे. एखादे पात्र बाहेरुन पृथ्वीवर येउन हे करु शकले असते जे कथानायक आहे तर सुपरहिरोच बनुन जाइल जेंव्हा विलनकडेही एक सुपर पॉवर आलेली आहे. इथेच डिस्नेचा गोंधळ उडाला त्याना कॅरक्टर काय आहे हेच समजले नाही आणि समजले हे गृहित धरले तर ते प्रेक्षकांना ठसवता आले नाही. त्या ग्रहावरची असली तरी त्या व्यक्तीची नाही. डिस्नेचा अजिबात गोंधळ उडालेला नाही... तर हा चित्रपट मुळातच A Princess of Mars (1912) वर आणि Barsoom series of novels वर आधारीत आहे. नक्किच, जगातील अत्यंत खर्चीक अपयशी चित्रपटमधे स्थान मिळवणे हे ध्येय नक्किच नसणार... पण ते झाले कारण कथानकासोबत पात्रांचा पुरेसा व्यवस्थित विचार केला नाही. गेम ऑफ थ्रोन्स मधील रेड वेडिंग कुठे अन मंगळाच्या राजकुमारीचे लग्न कुठे... बालचित्रपट प्रौढांसाठी म्हणुन बनवायचा यत्न केला की अशी फसगत तयार होते. मी स्वतः अ‍ॅनिमेशन पटांचा चाहता आहे पण जॉन कार्टरच्या कथानकातील बालिशपणा तरीही उठुन दिसतो या चित्रपटाने अमेरिकेत पैसा कमावला नसला तरी रशियात हिट ठरल्याने त्यांचा बर्‍यापैकी पैसा वसुल झाला पण अपेक्षित नफा झाला नाही. तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्‍या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता. मग ते बालिश / अ‍ॅनिमेशनची तुलना करणे आलेच. कुठलाही पुर्वदृष्टीकोन न ठेवता चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करा येव्हढेच म्हणीन. असो.. ते तुमचे व्यक्तीगत मत असल्याने चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतो. माझ्या मते जो चित्रपट तुम्हाला २:३० -३:०० तास बाहेरचे जग विसरायला लावु शकतो तो तुमच्यासाठी उत्तम चित्रपट असतो, मग तो कुठल्याही भाषेतील असो किंवा अगदी लो बजेटचा अन् अ‍ॅनिमेशन नसलेला देखील.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Tue, 06/29/2021 - 21:33 नवीन
तुम्ही मुळातच चित्रपटा विषयी पुर्वग्रह निर्माण करुन किवा कल्पना करुन तो पाहिला किंवा त्याची दुसर्‍या चित्रपटाशी तुलना केलीत तर आहे त्या चित्रपटाला अनुभवण्याचा आणि समजुन घेण्याचा आनंद आधीच गमावुन बसलेला असता. हा चित्रपट बघण्यापुर्वी याच्या स्टोरीबद्दल मला काहीच कल्पना न्हवती व टीवीवर याआधी एक दोन मिनीटे काही प्रसंग बघणे सोडले तर अन्य काहीच पाहिले न्हवते तेंव्हा हा चित्रपट मि संपुर्णपणे पुर्वग्रह न बघता बघितला पण सतत काहीतरी मिसींग आहे भट्टी व्यवस्थीत जमली नाही असेच वाटत राहील्याने त्यावर जरा विचार केल्यावर मला काही बाबी समोर आल्यासारख्या वाटल्या त्या मी इथे लिहल्या आहेत. आणि माझे मत फक्त चित्रपटाबाबत आहे पुस्तकांबाबत काही माहीत नाही... चित्रपट काही दर्जाहीन ठरत नाही इतके मात्र ठळकपणे सांगु शकतो अजिबात सांगु नका कारण चित्रपट दर्जाहिन आहे ही बाब मलाच मान्य नाही... चित्रपट काहीसा सबस्टंसहीन आहे हे नक्कि... एक ना धड व काहीसे भाराभर प्रकरण आहे. आपण चित्रपट एंजॉय केलात आनंद आहे. चित्रपट रशीयात पसंत केला गेला ? हरकत नाही पण तुर्त मी रशीयाला जाउन हा चित्रपट पाहु शकणार नसल्याने माझ्या चित्रपटावरील विधांनावर मी अजुनही ठाम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 06/30/2021 - 05:26 नवीन
पास... अवांतर :- तुमचे एकंदर [ विविध धाग्यांवरचे ] इतके प्रतिसाद वाचल्यावर मला मिपा वरच्या जुन्या आयडीची आठवण आली, त्या आयडीचे पहिले अक्षर टा आणि शेवटचे अक्षर न होते. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
B
Bhakti Wed, 06/30/2021 - 12:51 नवीन
किती गोड आहे.अल्लू अर्हा! जुन्या अंजली गाण्याचा नवीन कायाकल्प मस्त कल्पना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 13:18 नवीन
जेंव्हा मी अंजली चित्रपट बघितला होता. थिएटर बाहेर पडल्या पडल्या मी केसेट ऑर्डर केली जी मला मिळायला 3 महिने गेले आणि ते तीन माझ्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा होती मी रोज दुकानात चौकशी करत असे आली का अंजली ची हिंदी केसेट आली का आणि रोज दुकानदार मागवून देतो असे आश्वासन देत असे माझी चिकाटी बघून त्याला खरेच दया आली अन त्याने ती केसेट मला भेट म्हणून चक्क मोफत मिळवून दिली होती :) आजही या चित्रपटातील समथिंग समथिंग, आयेगा आयेगा 1991, अंबर हमारा रस्ता , स्टारवोर्स, अंजली अंजली अंजली हि गाणी माझी म्युझिक सकट अक्षरश: तोंडपाठ आहेत... त्यावेळी जेंव्हा प्रथम मी अंजली गाणे तमिळमध्ये ऐकले होते तेंव्हा मला कनाली कनाली कनाली असे उच्चार ऐकू येत असत :) या चित्रपटातील गाणी माझ्या बालपणातील आनंदाचा अनमोल ठेवा आहेत वरील व्हिडीओ निमित्ताने त्या आठवणींना उजाळा मिळाला शतश: धन्यवाद मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
म
मदनबाण Wed, 06/30/2021 - 15:15 नवीन
@ भक्ती / गॉडजिला मला कधी लहर आली की मी हे गाणं ऐकतो... बालपणात ऐकलेली काही गाणी कायम स्मरणात राहतात त्यातलचं हे एक आहे. आज सहज सकाळी अंजलीच्या २ गाण्यांची आठवण आली तेव्हा हे व्हर्जन नजरेस पडलं. २ वेगळं गाणं पण अंजली शब्द असलेलं गाणं पुढच्या स्वाक्षारीत असेल. :) हिंदी व्हर्जन इथे आहे :- https://www.youtube.com/watch?v=kEBpHsVisT0

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 15:47 नवीन
त्याने अंजलीच्या वडीलांची अत्यंत संवेदनशील भुमिका केली होती, काही वर्शांनी प्रभुदेवाचा हमसे है मुकबला बघितला त्यातही त्याने खुनशी भुमिका केली होती त्यावेळी मला धक्का बसला होता अख्या चित्रपटात त्याचे कधीतरी मनपरिवर्तन होउन तो नायकाचा मदतनिस ठरेल अशा अपेक्षेत मी होतो... :) नंतर स्मजले तो फार पॉप्युलर व्हिलन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 06/30/2021 - 17:13 नवीन
आठवणी आठवणी आणि आठवणी... अरे गॉडजिला रघुवरन चे नाव घेउन तु मला टोटल रिकॉल करायला लावलास... मी चक्क रघुवरनला विसरुन गेलो होतो ! शिवा चित्रपटामुळे तो माझ्या डिप मेमरी लक्षात राहिला होता... डिप मेमरी रिकॉल केल्यावर शिवा आठवला... त्याचे शिवा मधले संवाद आणि त्याची ते संवाद बोलण्याची लकब आणि चेहर्‍यावरचा निर्घृण अभिनय ! बाब्बो... ओव्हर कॉन्फिडन्स नही रेहना चाहिये ! हा पोटात चाकु भोसकल्यावर म्हंटला गेलेला डायलॉग विसरण्यासारखा नाहीच. आत्ताच त्याचा दुसरा डायलॉग ऐकला... वो मौत इतनी भयानक होनी चाहिए की, आइंदा इस शहर में कोई भी आदमी भवानी के खिलाफ सोचते हुए भी डरना चाहिए. तसेच या चित्रपटातील संपूर्ण संगीत लक्षात ठेवण्या सारखेच आहे. आता शिवा हिंदीत शोधायला हवा [ तेलगु मधे उपलब्ध आहे.] आणि टोटल रिकॉल देखील पहायला हवा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 17:29 नवीन
शिवा तुनळीवर हिंदीत आहे, टोटल रिकॉल अरनॉल्डचा-शेरोन स्टोनचा मस्त आहे हा हि चांगला आहे, यात केट बिकिन्सल च्या हालचाली बघणे(अगदी एक्षनसुद्धा) हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. कोलीन फेरल छानच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 06/30/2021 - 17:58 नवीन
शिवा तुनळीवर हिंदीत आहे, लिंक प्लीज, कारण मला सापडला नाही ! टोटल रिकॉल अरनॉल्डचा-शेरोन स्टोनचा मस्त आहे हा हि चांगला आहे अरनॉल्डचा पाहिला आहे पण ज्याचा ट्रेलर दिला आहे तो नाही पाहिला अजुन. यात केट बिकिन्सल च्या हालचाली बघणे(अगदी एक्षनसुद्धा) हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. कोलीन फेरल छानच ओह्ह, मग तर पहायलाच हवा ! असेच शेरोन स्टोन म्हंटले की केवळ Basic Instinct आठवतो. याच बरोबर लक्षात येते ते बाथरुम क्लब सीन पुढील अमेझिंग साउंड ट्रॅक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 06/30/2021 - 19:23 नवीन
काही वर्षांपुर्वी बघितला होता खरे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
U
Ujjwal Tue, 06/29/2021 - 19:37 नवीन
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/30/2021 - 04:31 नवीन
जे.के. सिमन्स (जे जोनाह जेम्सन, व्हीपलॅश मधला कठोर शिक्षक) ने एका प्रमुख पात्राला आवाज दिला आहे. ओम्नी-मॅन सुपरमॅन सारखाच परग्रहवासी असणारा सुपरहिरो असतो. त्याचा हाफ-एलिय मुलगा, मार्क, १८ वर्षांचा होता होता त्याच्यातसुद्धा त्या शक्ती आहेत दिसू लागते. मार्कचा वडिलांसारखा सुपरहिरो बनण्याचा प्रवास दाखवला आहे. खूप मनोरंजक आणि एका मागून एक सगळे भाग पाहावे वाटणारी मालिका आहे. दुसऱ्या सिजनच्या प्रतीक्षेत. आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे प्रौढांसाठी असणारे कार्टून हा प्रकार जबरदस्त कथा घेऊन असतो. कार्टून असल्यामुळे भन्नाट,अकल्पित दाखवणे शक्य असते. आवडते प्रौढ कार्टून्स- रिक अँड मॉर्टी इन्व्हिन्सीबल बोजॅक होर्समन अधूनमधून फॅमिली गाय
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/30/2021 - 19:00 नवीन
या ड्रगनवाल्यांनी वेड लावलं आहे.शब्द तर मस्तच पण ही जी काही नाचली आहे , अप्रतिम:) https://youtu.be/I-QfPUz1es8
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/01/2021 - 06:05 नवीन
मजेशीर हेन्री ८ हा ब्रिटिश राजा आहे वाटत आणि त्यांचा इतिहासाच्या अभ्यासात समावेश आहे वाटत. तर कशा पद्धतीने इतिहास मजेशीर शिकावा हे दाखविले आहे. https://www.facebook.com/1143803202301544/posts/4944268288921664/?app=fbl
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/01/2021 - 16:35 नवीन
आत्ताच तंत्र विद्येची ओळख या वरती आलेल्या धाग्यात माझाच प्रतिसाद मी परत वाचला. तो वाचुन जे विचार आणि आठवणी मनात आल्या त्या इथे लिहत आहे. यात गांजा आणि भांगेचा उल्लेख मी केलेला आहे, या दोन पदार्थां पैकी भांगेचे सेवन मी केलेले आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की भांग प्यायल्यावर माणुस जे करतो ते करतच राहतो... म्हणजे जर हसु लागला तर भांगेच्या प्रभावामुळे तो हसत राहतो, रडत असेल तर रडतच राहतो.असेच जर ध्यान लावले तर तो ध्यानाच्या अवस्थेत जातो. या पद्धतीने शॉर्टकट न घेता हे साध्य करणं याला अर्थातच अधिक महत्व आहे. एकंदर ध्यान / मन एकाग्र करणे याला अनन्य साधारण महत्व आहे. आपण आपल्या जगात अशी उदाहरणे ऐकली आहेत, वाचली आहेत आणि पाहिलेली देखील आहेत. उदा. द्यायचे झाले तर द्रोणांचा अर्जुनाला प्रश्न आणि अर्जुनाने पक्षाचा डोळा हे त्या प्रश्नाला दिलेले उत्तर, विवेकानंदांच्या वाचनाच्या वेगा बद्धल आणि ते स्मराणात ठेवण्या बद्धल कथा आहेच. आता अश्या व्यक्तीबद्धल मी सांगतो ज्याच्यामुळे मला एकाग्रता किती उच्च दर्जाची असु शकते ते प्रत्यक्ष पहावयास मिळाले. तो काळ होता जेव्हा व्हिसीआर बाजारात आला होता आणि त्यावर चालणार्‍या व्हिडियो कॅसेटचा... लोकांना चित्रपटगृहात न जाता घरीच चित्रपट पाहण्याचा पर्याय मिळाला होता. तेव्हा व्हिसीआर तासाच्या दराने भाड्याने वापरायला मिळायचा तर व्हिडियो कॅसेटच्या लॅब्ररीत जाउन आपल्याला हवा तो चित्रपट पहायचे आणि त्याची कॅसेट घ्यायची. अश्या पद्धतीने मला आणि माझ्या मित्रांना चित्रपट पहायला आवडु लागले होते, कोणाचे घर जरा रिकामे असेल त्यांच्या घरी टिव्हीला व्हिसीआर जोडुन चित्रपट पाहिला जात असे. हे सगळे एकमेकांनी साठवलेले पैसे एकत्र करुन केले जात असे. त्यावेळी ब्रुस ली आणि जॅकी चॅन या दोघांची क्रेझ होती... आर्मर ऑफ गॉड [ जॅकी चॅन ] एंटर द ड्रॅगन [ ब्रुस ली ] असे आणि अनेक चित्रपट आम्ही मित्रांनी त्याकाळी पाहिले. माझ्यावर ब्रुस ली चा प्रभाव जॅकी चॅन पेक्षा अधिक पडला ! जॅकी अ‍ॅक्शन कॉमेडी या प्रकारात जास्त होता, मात्र ब्रुस ली मात्र मला फाइट आणि बॉडी कंट्रोल याच्यामुळे अधिक आवडला. जॅकी चॅन चे तत्वज्ञान आहे की नाही ते मला ठावूक नाही, परंतु ब्रुस ली चे मात्र आहे. तसेच तो फाईट मारातान जो चित्कार भरायचा त्याचा मी फुलस्पीड पंखा आहे. :) ब्रुस ली ची एकाग्रता आणि मास्टरी खाली दिलेल्या काही व्हिडियोतुन तुम्हाला अनुभवता येइल :- "Be Water, My Friend. Empty your mind. Be formless, shapeless, like water. You put water into a cup, it becomes the cup. You put water into a bottle, it becomes the bottle. You put it into a teapot, it becomes the teapot. Now water can flow or it can crash. Be water, my friend." :- Bruce Lee

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला गुरुवार, 07/01/2021 - 18:24 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 07/02/2021 - 15:09 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/02/2021 - 16:14 नवीन
@मुक्त विहारि काही दिवसांपूर्वी मी मिपावर बंगाल हिंसा आणि त्यातील अशांती दुतांच्या बलात्कारी कृत्या बद्धल प्रतिसाद दिला होता. अगदी देण्याची इच्छा नसताना देखील ५० वर्ष वय असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्यावर ती जो विलाप करत असल्याचा व्हिडियो दिला होता... आता तर हे ही उघड झाले आहे की ज्या हिंदूंना परत यायचे आहे त्यांना सागितले जात आहे की १५ दिवसाठी तुमच्या बायकोला आमच्याकडे पाठवा,मग या किंवा पैशाची मागणी होत आहे. हिंदू स्त्रियांचे / लहान मुलींचे कपडे फाडुन बलात्कार करण्यात आले तसेच त्यांची नग्न करुनच धिंड / मिरवणुक काढण्यात आली आणि त्यांना तसेच नग्नपणे नाचण्यास देखील सांगण्यात आले. आधी काश्मिर आता बंगाल. केंद्रशासन आणि संपूर्ण हिंदूस्थानातील हिंदू समाज तसाच अफुच्या नशेत धुत्त पडलाय... महाराष्ट्रात असे घडुन जेव्हा मराठी हिंदू लोकांच्या बायकांना उचलुन नेतील तेव्हा बहुतेक हिंदूंना हिंदूत्वाच्या व्याख्येची गरज पडणार नाही असे दिसते ! आझाद मैदानात त्याचा डेमो दिला गेला आहे, खाकी वस्त्रातील महिला पोलिसांच्या आंगावर हात घालुन दाखवुन झाले आहे... आपण फक्त व्याख्या शोधत बसायचे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 07/03/2021 - 04:34 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/03/2021 - 09:41 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/03/2021 - 19:43 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Mon, 07/05/2021 - 19:41 नवीन
  • Log in or register to post comments
U
Ujjwal Tue, 07/06/2021 - 04:43 नवीन
या लघुपटामागची कथित पार्श्वभूमी अशी आहे की सत्यजित रे यांनी व्हिएतनाम युद्धाचा प्रतीकात्मक निषेध म्हणून हा लघुपट तयार केला. बंगल्यातील मुलगा म्हणजे अमेरिका आणि झोपडीतील मुलगा म्हणजे व्हिएतनाम असं काहीसं चित्र रंगवण्यात आलं. अमेरिकेच्या लोकांमध्ये असणारे श्रीमंतीचा माज, दादागिरी करण्याची खोड इ. गुण (?) अत्यंत प्रभावीपणे बंगल्यातील मुलाच्या रूपात मांडण्यात आले आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आणि अत्याधुनिक शस्त्रे असूनही व्हिएतनामच्या पारंपरिक गनिमी काव्यापुढे अमेरिका हे युद्ध जिंकू शकली नाही (अर्थात हि नंतरची घटना). १२ मिनिटात एकही संवाद नसूनही आपले म्हणणे अत्यंत प्रभावीपणे मांडण्याच्या हातोटीचं कौतुक करावं तेवढं कमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ujjwal
म
मदनबाण Mon, 07/05/2021 - 19:57 नवीन
@ Ujjwal तुम्ही हा लघुपट इथे दिल्या बद्धल धन्यवाद. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/06/2021 - 15:05 नवीन
@ Ujjwal लघुपटामागची ही कथित पार्श्वभूमी माहित नव्हती. - -- --- आज Teri Mitti Female Version पाहताना बाजुलाच जो व्हिडियो दिसला आणि तो पाहिल्यावर इथे द्यावासा वाटला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Teri Mitti Female Version - Kesari | Arko feat. Parineeti Chopra | Akshay Kumar | Manoj Muntashir
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/10/2021 - 04:59 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einstein
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 07/10/2021 - 11:43 नवीन
मग ते आपले असो कि दुसर्‍याचे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 07/10/2021 - 14:26 नवीन
जे उत्तम आहे ते स्विकारावेच लागेल मग ते आपले असो कि दुसर्‍याचे ... जे आपलेच आहे, ते आपल्यालाच ठावूक नाही. ते ज्ञान जे आपण जगाला दिले आणि आज आपल्यालाच त्याचा गंध नाही. ते परत आपल्याला समजावे हे या व्हिडियो बनवण्या मागे किंवा ते इथे देण्या मागचा हेतू आहे. आपला गौरवशाली इतिहास पुसला गेला असल्याने तो परत शोधुन त्याचे ज्ञान आपल्याला परत मिळवावे लागेल हे देखील वरील व्हिडियोतुन सुचित होते. आपल्याकडे उत्तमच होते आणि जगाला ते आपण मुक्त हस्ताने दिलेले आहे याचा देखील बोध आपणाला होतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einstein
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Sat, 07/10/2021 - 15:20 नवीन
हा गैरसमज निर्माण होऊ न देणे जास्त संतुलितपणा असेल... आपलाच का कोणाचाच इतिहास अथवा भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही... तसेही भान वर्तमानाचे जास्त आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॉडजिला Sat, 07/10/2021 - 15:34 नवीन
आपले ज्ञान आता आधुनिक पाश्चात्यांच्या पध्द्तीवापरून (युट्युब) समोर येत असेल तर ती चांगली बाब आहे कारण हे करताना आपले परके उणे दुणे करण्यापेक्षा ज्यांचे जे चांगले आहे त्याचा वापर दिसून येतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
म
मदनबाण Sat, 07/10/2021 - 16:30 नवीन
हा गैरसमज निर्माण होऊ न देणे जास्त संतुलितपणा असेल... तो असंतुलित आहे म्हणुन गैरसमज आहे आणि आपला मूळ इतिहास शोधणे आणि त्या शोधात तो गौरवशाली आहे यात कोणता वाद अत्ता तरी दिसत नाही. आपल्याला तुर्की आक्रमकांचा मुघल म्हणुन गैरवशाली इतिहास शिकवण्यात आला आणि हे प्रयत्न इंग्रजांनी आणि नंतर सत्तेत आलेल्या काळ्या इंग्रजांनी [ काळे इंग्रज यासाठी कारण हिंदूंच्या राजांचा वैभशाली इतिहास हा गाळला गेला आणि आक्रमकांचे गुणगान सुरु ठेवले. ] हिंदूंना त्यांच्याच देशात दुयम्म वाटावे अशी मानसिकता निर्माण होण्यासाठीच तो बदलला गेला हे सत्य आपण नाकारु शकत नाही. ते चित्रपटा पासुन जाहिराती पर्यंत सर्वत्र केले गेले. कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥ हे सत्य आहे म्हणजे गैरसमज नव्हे,नक्कीच हिंदू राजांनी सद्गुण विक्रुती बाळगली आणि त्याची फळे देखील त्यांना आणि त्यांच्या प्रजेला [हिदूंना ] भोगावी लागली. आपलाच का कोणाचाच इतिहास अथवा भविष्य फक्त गौरवशाली असू शकत नाही... तसेही भान वर्तमानाचे जास्त आवश्यक आहे रामाचा इतिहास गैरवशालीच नसता तर आजही पुरुष हा मर्यदापुरुषत्तम असावा हा गुण ओळखला किंवा गणला गेला नसता. जे सत्य आहे ते अमान्य करणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण ठरत नाही, वर्तमानाचे भान असायलाच हवे पण ते भान असताना आपला "खरा" इतिहास माहित असणे हे अत्यावश्यक ठरते.त्या शिवाय तुमचे वर्तमान आणि भविष्य प्रकाशमान होउ शकत नाही. फ्रेंच लोकांसाठी नेपोलियनचा इतिहास गैरवशाली आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदूंसाठी गैरवशाली आहे. तेव्हा कोणाचाच इतिहास गैरवशाली असु शकत नाही आणि भविष्य गैरवशाली असू शकत नाही हे विधान पूर्णपणे चूकीचे आहे. कधीही कोणतेही युद्ध न हरलेला बाजीराव पेशवा पराक्रमयी गैरवशाली जागतिक इतिहास निर्माण करत असतो. [ मी कुठेतरी ऐकले होते / वाचले होते की पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरिकन मिलेटरी मध्ये शिकवले जाते. ] आपले ज्ञान आता आधुनिक पाश्चात्यांच्या पध्द्तीवापरून (युट्युब) समोर येत असेल तर ती चांगली बाब आहे कारण हे करताना आपले परके उणे दुणे करण्यापेक्षा ज्यांचे जे चांगले आहे त्याचा वापर दिसून येतो हे विधान मान्य आहे.याच बरोबरा आपला खरा इतिहास गौरवशाली देखील होता हे याच माध्यमातुन मांडले गेले आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made. – Albert Einstein
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा