Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

~ गोष्ट अक्षतची ~

प
पिंगू
Sun, 07/04/2021 - 08:59
💬 26 प्रतिसाद
तळकोकणातील सावंतवाडी तालूक्याच्या निसर्गसमृद्ध ओटवणे गावात जन्माला आलेली 'प्रकृती' सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि एका मोठ्या आयटी कंपनीत जॉबला लागली. युरोप दौऱ्यात तिची ओळख झाली राहूल बरोबर. अत्यंत स्मार्ट आणि हुशार राहूल तेव्हा एक बँकींगचा प्रोजेक्ट लीड करत होता. नकळत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पर्यवसान लग्नात. राहूलकडे फ्रांसचे नागरिकत्व असल्याने दोघांनी तिकडेच सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि ओटवण्याची प्रकृती "न्यु ओरेलान्स" ला शिफ्ट झाली.. अनोळखी देश, नविन लोक, वेगळ्याच परंपरा ... आधीतर प्रकृती गोंधळूनच गेली होती. जॉब पुरता परदेश प्रवास जरी केला असला तरी एका नविनच देशात सेटल होणे सोपे नव्हते. हळूहळू स्थानिक भाषा, चालीरितींची ओळख होत होती. दरम्यान तिची ओळख 'इला' बरोबर झाली. मुळच्या साऊथ अफ्रीकन इलाने प्रकृती सारखेच कामानिमीत्त फ्रांसला स्थलांतर केले होते. दोघींची छान गट्टी जमली. बागकाम, शॉपींग पासून ते तिथल्याच योगा आश्रमात देखील दोघी एकत्रच जायच्या. इला रोज डोक्यावर नारळाचे तेल घालायची व अंगाला देखील लावायची हे कळल्यावर प्रकृतीला आश्चर्याचा धक्काच बसला. असेच एकदा आश्रमातील एका "व्हर्जीन कोकोनट ऑईल (VCO)" च्या सेमीनारला इला प्रकृतीला घेऊन गेली. ह्यामधे तिला VCO चे अनेक चमत्कारीक गुणधर्म कळले. VCO मधे म्हणे लॉरील ऍसीड नावाची एक MCT असते जी केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते व अर्भकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामधे अनिवार्य भुमिका बजावते. अल्झायमर सारख्या दूर्धर आजारावर देखील VCO च्या वापरामुळे आश्वासक परीणाम मिळतात! स्वभावत:च अभ्यासू प्रकृतीने VCO वर भरपूर वाचन करायला सुरूवात केली. विवीध मेडीकल रिपोर्टस, व्हिडीओ आणि आश्रमातील काही लोकांबरोबर चर्चा असे सतत चालू होते. अशातच तिला APCC (Asia Pacific Coconut Community) ह्या १८ नारळ उत्पादक आशियायी देशांच्या शिखर संस्थाबाबत कळले जी "नारळ" ह्याच विषयावर संशोधन आणि धोरणात्मक काम करते. आणि अशातच प्रकृतीला दिवसही गेले... आता आमच्या भारतीय मुलीला माहेरचे वेध लागले! विमानाने पॅरीस ते मुंबई .. एसी स्लिपर वॉल्वोने मुंबई ते कुडाळ ने असा प्रवास करत प्रकृती कोकणात पोचली. बाबा आलेच होते घ्यायला. कोकणातले लाल रस्ते, हिरवा गार निसर्ग, नऊवारी नेसलेल्या म्हाताऱ्या बायका, वाटेत लागलेला मासळी बाजार ... सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होत होत्या. ७-८ वर्षांनी परत आली असेल कोकणात, पण काही बदलले नव्हते... घरी आल्याबरोबर आईने दृष्ट काढली आणि ताजे नारळाचे पाणी प्यायला दिले ... नारळाबद्दल इतकी माहिती घेतली होती की नारळाचे पाणी, खोबरे, वड्या, चटणी सारे खाताना तिला सारे आठवत होते. कोकणात प्रत्येक घरी दोनतरी माड असतातच. शहाळी व नारळ घरचेच. "तूला आता रोज सकाळी एका शहाळ्यचे पाणी देणार", आईने आल्याबरोबरच सांगीतले होते .. “बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी उत्तम असते..” ... बाळंतपणामुळे अनेक मर्यादा असूनही ऑनलाईन वाचन, अभ्यास चालूच होता. सहजच तिने ह्या विषयावर स्थानिक वृत्तपत्रांमधे लेख लिहायला आणि लेक्चर्स द्यायला सुरूवात केली... कल्पवृक्ष नारळ : पाच देववृक्षांपैकी एक आणि ज्याच्या फळाला "श्रीफळ" संबोधतात असे हे नारळाचे झाड! नारळाच्या प्रत्येक भागाचे चमत्कारीक फायदे आहेत. नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात किटोन्स आणि मिनरल्स असल्याने मोठ्या प्रमाणात हे पेशंटच्या प्रकृतीमधे लवकर सुधारणा व्हावी ह्यासाठी वापरतात. दाक्षीणात्य भारतात खोबरे हा खाण्याचा मुख्य घटक आहे. खोबऱ्याच्या नियमीत सेवनामुळे दाक्षीणात्य भारतीय हृदयविकार व रक्तदाबजन्य रोगांपासून दूर आहेत. ओल्या खोबऱ्यापासून निघणारे दूध हे गायीच्या दूधाला उत्तम नैसर्गिक पर्याय असून जगभरात आढळणाऱ्या लॅक्टोस आणि ग्लुटेन सारख्या अडचणींवर प्रमुख पर्याय आहे. सोयाबीन दूधाच्या उत्पादनाची Carbon Foot Print नारळापेक्षा खूपच मोठी असल्याने पाश्चात्य देशांमधे नारळाच्या दुधाची मागणी वाढतेच आहे. ह्या दुधात आढळणारे मुबलक प्रमाणात आढळणारे "लॉरीक अॅसीड" हा निसर्गाचा एक चमत्कारच असून हे केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते. अर्भकांची रोग प्रतिकारशक्ती आणि अस्थिमज्जा घडवणे ह्यामधे "लॉरीक ऍसीड" मुख्य भुमिका निभावते. नारळाच्या दुधापासूनच उत्तम दर्जाचे VCO बनते. अत्यंत हलके व त्वचेतून सहजपणे खोलवर झिरपणारे हे निसर्गातील "सर्वोत्तम औषधी तेल" गणले जाते. अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या दूर्धर आजारांवर देखील VCO ने अनेक आश्वासक परीणाम दाखवले आहेत. नारळाची करवंटी हे जगातील सर्वात टणक लाकूड समजले जाते व उत्कृष्ठ प्रतिचा "ऍक्टीव्हेटेड कार्बन" बनवण्यासाठी प्राधान्याने वापरली जाते. नारळाच्या सोडणांपासून बनणारे फायबर हे मजबूत दोरखंड व जमीनीची धूप थांबवणारे जिओ फायबर बनवायला वापरतात. सोडणातील फायबर काढल्यावर उरणाऱ्या कोकोपिटमधे साधारण जमीनीच्या १० पट पाणी धारण करण्याची अनन्यसाधारण क्षमता आहे. ह्यामुळे मुळांना पाणी व पोषण मिळत रहाते. नारळाच्या झाडाला फळधारणा होण्यापूर्वी मोठ्ठी कळी येते जिला "पोय" असे म्हणतात. ह्या पोयीला कापल्यास त्यातून जो रस स्त्रवतो त्याला "निरा" म्हणतात. ज्या नारळाच्या कळीपासून नारळाचे फळ व त्यातील सोडण, करवंटी, खोबरे, पाणी हे सारे बनते ते सारे सत्व निरेमधे असते. प्रचंड प्रमाणात किटोन्स व मिनरल्स असलेली निरा अक्षरश: अमृतासमान आहे. निरेवर प्रक्रीया करून निरेची साखर बनवतात जीचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा दहापट कमी असतो. अशा प्रकारची "मिनरलयुक्त औषधी साखर" डायबेटीक/मधुमेहग्रस्त लोकांसाठी वरदान आहे! प्रकृती नारळाबाबातची मिळेल तितकी माहिती संकलीत करून ब्लॉग्ज आणि सोशल मिडीयावर मांडत होती. पाहता पाहता जगभरातून २८ लाख फॉलोवर्स केवळ ४-५ महिन्यात मिळाले होते... इकीकडे प्रकृतीचे बाळ वाढत होते आणि दुसरीकडे नारळाचे वेड! पण एक मोठी खंत तिला जाणवायची... कोकणातील ४ नारळ उत्पादक जिल्हे असलेल्या महाराष्ट्राचे भारताच्या नारळ व्यवसायात नावही नव्हते. नारळ विकास बोर्डावर महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी नसल्याने आधुनीक तंत्रज्ञान व त्यातून निर्माण होणा-या संधीविषयी कोकणातील बागायतदार पूर्णपणे अनभिज्ञ होता. कोकणात नारळ मुख्यत्वे जेवणात व सोडणे- करवंट्या जाळायला असेच प्रचलीत समिकरण होते. उरलेला नारळ व्यापा-याला. बोटावर मोजण्याइतके काथ्या प्रकल्प व तेलाचे घाणे असे कोकणातील नारळ व्यवसायाचे उदासीन स्वरूप... पण प्रकृतीला खात्री होती की ह्या छोट्याश्या नारळात कोकणाचे भाग्यच उजळून टाकू शकेल अशा अदभूत शक्यता आहेत. अशातच तिची ओळख झाली "आषाढी व्हेंचर्स" ह्या धडपड्या मराठी लोकांच्या सोशल स्टार्टअपशी.. "मराठी माणसामधे व्यावसाईक गुणधर्म नाहीत" ह्या समजाला खोडून काढायचे अशा धडाडीने चालू झालेली "आषाढी व्हेंचर्स" ही मराठी युवकांची सोशल स्टार्टअप. Quora मराठी सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर समविचारी व उद्यमशील लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही कंपनी पाहता पाहता नावारूपाला आली होती. प्रचंड उर्जा, धडाडी, विवीध क्षेत्रातील अनुभवी लोक आणि आवश्यक तितके भांडवल लोकसहभागातून उभे करण्याची क्षमता हे आषाढीचे मुख्य सोशल कॅपिटल. तेही एका उत्तम प्रकल्पाच्या शोधात होते. प्रकृतीमुळे ती दिशा मिळाली आणि आषाढीअन्स भिडले.. "नारळाच्या तेल" हे भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध असल्याने सुरूवात VCO पासून करावी असे ठरले. शहरातील मॉल्समधे आणि ऑनलाईन VCO उपलब्ध होतेच. काही सँपल्स प्रकृतीने मुद्दाम मागवून घेतले. बहुतेक VCO वर “Cold Pressed” असे लिहीलेले असायचे. पण हे पुरेसे नव्हते. नारळ कडकडीत उन्हात न सुकवता काढलेल्या सर्वच तेलांना VCO म्हणायची पद्धत होती. भारतात Desiccated Coconut (सुकवलेले खोबरे) देखील घाण्यातून काढतात व त्या तेलाला VCO म्हणतात. हे खोबरे उन्हात सुकवण्या ऐवजी इंडस्ट्रीअल ड्रायर्समधे सुकवतात. काही उत्पादक बॅक्टेरीया कल्चरच्या वापराने नारळाचे तेल "सडवून" त्यापासून VCO काढतात... पण VCO काढायची खरी तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे नारळाच्या दुधाला घुसळून! 10000RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनीक प्रक्रीया नाही की तापमान वाढवत नाही. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध VCO मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम VCO ठरते. स्थानिक VCO नावाला कोल्डप्रेस असते, पण दर्जा तो नसतोच! हीच पोकळी आषाढी व्हेंचर्स ने हेरली आणि "कोकणातील उत्तम प्रतिच्या नारळांचे निर्यातक्षम दर्जाचे VCO बनवून रास्त भावात उपलब्ध करायचे" ह्या ध्येयाने सुरूवात झाली आषाढीच्या पहिल्या वहिल्या उत्पादनाची... इकडे प्रकृतीलाही पुत्ररत्न झाले... आणि मग आषाढीच्या उत्पादनाचे आणि प्रकृतीच्या बाळाचे नाव ठरले "अक्षत"! मूळ कल्पना आणि लेखकः कमलेश पावसकर आणि विनय सामंत

प्रतिक्रिया द्या
14621 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
पिंगू Sun, 07/04/2021 - 09:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/04/2021 - 10:42 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 07/04/2021 - 11:55 नवीन
https://aashadhi.com/en/akshat-vco-en/
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sun, 07/04/2021 - 12:17 नवीन
अवश्य यशस्वी व्हावा
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 07/04/2021 - 12:31 नवीन
भारीये हे!
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 07/04/2021 - 19:57 नवीन
मस्त आहे प्रोडक्ट. ऑर्डर केलं लगेच.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 07/04/2021 - 20:23 नवीन
मी टू! मी पण लाभार्थी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
प
पिंगू Mon, 07/05/2021 - 08:37 नवीन
धन्यवाद. तुम्हाला अधिक महिती हवी असल्यास मला तुमचा इमेल व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ
ग
गुल्लू दादा Mon, 07/05/2021 - 14:58 नवीन
व्यनि केलाय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Mon, 07/05/2021 - 19:29 नवीन
मेल पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
ग
गुल्लू दादा Mon, 07/05/2021 - 20:20 नवीन
हो आला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/01/2021 - 08:07 नवीन
पाहावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
स
सिरुसेरि Mon, 07/05/2021 - 12:26 नवीन
कथेच्या माध्यमातुन माहितीपुर्ण लेखन . + १ .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/09/2021 - 08:57 नवीन
उत्पादना मागची कथा आवडली ! :) उत्पादन यशस्वी होण्यासाठी अनेक शुभेच्छा. फक्त तुलना करण्यासाठी मी सहज ऑनलाइन असेच इतर कुठले उत्पादन आहे का पाहिले. [ माझा कुठल्याही उत्पादनाशी किंवा उत्पादकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ] तुलना केल्यावर माझ्या लक्षात आलेले २ मुद्दे :- १ ] akshat vco मध्ये असलेल्या घटकाची माहिती आणि ते किती प्रमाणात आहेत हे कळत नाही. २] निर्यातक्षम VCO ठरते असे लेखात म्हंटले आहे, परंतु यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे उत्पादनाने घेतली आहेत का ? कोणती प्रमाणपत्रे यांच्याकडे आहेत याचा उल्लेख दिलेल्या माहितीत किंवा उप्तादनावर दिसत नाही. तुलना करण्यासाठी पाहिलेले उत्पादन :- Agamya certified organic ,USDA approved Cold Pressed 100% Edible Raw virgin coconut oil Speaking Tree - Organic, Extra Virgin (Cold Processed) Coconut Oil

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 07/14/2021 - 20:01 नवीन
बाणा प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद. सर्वप्रथम अक्षत व्हिसिओ हे सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल आहे आणि ते कोल्ड प्रेस नाही. अक्षत व्हिसिओ मध्ये खालील घटक असतातः Nutritional Information (per 100 gm Approx) Energy: 899 Kcal Protein: 0.0 gm Carbohydrates: 0.0 gm Cholesterol: 0.0 gm Vitamin E: 1.42 mg Total Fat: 99.85 gm Lauric Acid: 45.29 g (45%) अक्षत व्हिसिओ हे सध्या आयुष certification च्या प्रोसेसमध्ये आहे. USDA ची प्रोसेस ही बरीच वेळखाऊ असल्याने ती नंतर पुढे निर्यात करताना केली जाणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चौकस२१२ Fri, 07/16/2021 - 03:50 नवीन
सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल आहे आणि ते कोल्ड प्रेस नाही. काय फरक असतो? म्हणजे त्यामुळे गुणधर्मांवर काय परिणाम होतो ?या अर्थाने सेंट्रिफ्युज साठी आधी त्याचा चुरा करावा लागतच असेल ना? येथे भारतातूंत आयात केलेलं प्रसिद्ध ( पॅराशूट ) तेल वापरत होतो पण ते खायला उपयोगी नसावे त्याऐवजी हि दोन तेल बघितली एकदम स्वच्छ आणि तजेलदार वाटली अक्षत हि तसेच असावे? https://shop.coles.com.au/a/national/product/raw-c-organic-coconut-oil-3218850p https://shop.coles.com.au/a/national/product/raw-c-organic-coconut-oil-3218850p आणि हि माहिती पॅराशूट ची (बाकी दोन च्या मानाने सविस्तर माहिती नाही दिसत !) https://shop.coles.com.au/a/national/product/parachute-coconut-oil-jar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Fri, 07/16/2021 - 10:42 नवीन
कोल्ड प्रेस म्हणजे नारळ सुकवून घाण्यावर काढलेले तेल. त्यात उष्णता निर्माण होत असल्याने लॉरिक अ‍ॅसिडसारखे घटक नाश पावतात. तर सेंट्रिफ्युज पद्धतीत नारळाचे दूध काढून ते १०००० आरपीएम वर घुसळतात आणि त्या प्रक्रियेत दुधापासून तेल वेगळे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Fri, 07/16/2021 - 03:53 नवीन
Total Fat: 99.85 gm म्हणजे १०० ग्राम मध्ये ९९ ग्राम बरोबर? आणि Cholesterol: 0.0 gm म्हणजे हि फॅट "गुड फॅट" असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Fri, 07/16/2021 - 10:39 नवीन
बरोबर. नारळ तेलातील फॅटबद्दल बरेच मतभेद आढळतात. कारण नारळातील फॅट हे सॅच्युरेटेड फॅटच्या श्रेणीत येते आणि बरेच अ‍ॅलोपॅथि डॉक्टर नारळ तेल वापरु नका असे सुचवतात. हा संदर्भ एकदा बघा आणि मग ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
म
मदनबाण Wed, 07/28/2021 - 12:20 नवीन
उत्तर दिल्या बद्धल धन्यवाद... मी त्यांच्या पोर्टलवरुन उत्पादन विकत घ्यायचा प्रयत्न केला, एकदा उत्पादनाची किंमत कमी दर्शवली होती, पण पेमेंट इश्यूमुळे ते घेता आले नाही, नंतर परत एकदा प्रयत्न केला होता तेव्हा उत्पादनाची वाढीव किंमत दिसली आणि परत मेंट इश्यूमुळे ते घेता आले नाही. शेवटी व्हीसीओ प्रकार ट्राय करायचे ठरवले असल्याने अ‍ॅमेझॉन वरुन असेच सेंट्रिफ्युज पद्धतीने नारळाच्या दुधाचे काढलेले तेल दिसले ते विकत घेतले. पुढच्या वेळी परत हे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीन.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Fri, 07/30/2021 - 16:41 नवीन
ऑफर संपल्यामुळे हे झाले. मला संपर्क केला असता तर मी पाठवले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Fri, 07/30/2021 - 17:22 नवीन
ऑफर संपल्यामुळे हे झाले. ऑफरच्या दिवशी देखील मी उपादन विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण पेमेंट इश्यूमुळे ते विकत घेता आले नाही. दुसर्‍या दिवशी पाहिले तर ऑफर संपलेली होती. [ खरं तर ऑफर कुठल्या दिवसा पासुन कुठल्या दिवसा पर्यंत आहे याची माहिती निदान माझ्या नजरेस आली नाही. ] मला संपर्क केला असता तर मी पाठवले असते. ओक्के. मी पोर्टलवर दिलेल्या क्रमांकावर देखील कॉल केला होता, पण कोणीही तो उचलला नाही आणि मला कॉल बॅक देखील आला नाही. जितक मला समजलं आणि वाटलं त्यानुसार त्यांच्या पेमेंट गेटवे मध्ये काहीतरी तांत्रिक दोष आहे. मी क्रेडिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन अनेकवेळा पेमेंट करण्याचा प्रयत्न केला [ अगदी ब्राउजर बदलुन देखील प्रयत्न केला. ] पण तो यशस्वी झाला नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
प
पिंगू Fri, 07/30/2021 - 18:35 नवीन
पेमेंट गेटवे थर्ड पार्टी आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना पेमेंट करताना प्रॉब्लेम आले होते. त्यामुळे आता जीपे वर पेमेंट स्वीकारतो. त्यासाठी मला संपर्क केला तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
च
चौथा कोनाडा Sun, 07/25/2021 - 09:36 नवीन
सुरुवात कथेने केल्याने पुढील वाचनात रंगत आली !
पण VCO काढायची खरी तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे नारळाच्या दुधाला घुसळून! 10000RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनीक प्रक्रीया नाही की तापमान वाढवत नाही. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध VCO मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम VCO ठरते.
शुद्ध VCO या प्रकाराशी कधी संबध आलेला नाही, ही माहिती प्रथमच समजली ! स्थानिक VCO नावाला कोल्डप्रेस असते, पण दर्जा तो नसतोच! महत्वाची माहिती ! धन्यवाद, आणि प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 07/31/2021 - 05:19 नवीन
उत्तम अनुभव आहे
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 08/01/2021 - 06:32 नवीन
इथे अनुभव सांगावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा