Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चविष्ट - यू ट्युब चॅनेल

ज
जागु
Fri, 07/09/2021 - 10:57
💬 41 प्रतिसाद
नमस्कार मिपाकर. आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत. तुमच्या कडून मिळणारे प्रोत्साहन मोलाचे असेल. चॅनेल व रेसिपी आवडल्यास सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे. चविष्ट - https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68 आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9० व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4 बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg जवळा - https://youtu.be/5y6wea39eeY

प्रतिक्रिया द्या
18692 वाचन

💬 प्रतिसाद (41)
ग
गुल्लू दादा Fri, 07/09/2021 - 11:08 नवीन
Subscribe केले, जे आवडले ते like सुद्धा करू हळूहळू. चॅनेल चे नाव मराठी मध्ये का नाही ठेवले. नवीन नवीन पदार्थ नियमित टाकत जा आम्ही आहोतच बघायला आणि घरी try करायला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/09/2021 - 13:15 नवीन
Subscribe करण्यात आलेले आहे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/09/2021 - 14:10 नवीन
शुभेच्छा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 07/09/2021 - 14:11 नवीन
तुमच्या रेसिपी भारीच असतात जागुतै
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 07/09/2021 - 14:28 नवीन
झकास आहे हा चॅनेल !

😋

नांव पण आवडलं, चविष्टच आहे ! आता स्टार्ट कांदाभजी करून पाहणार मी !
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/09/2021 - 16:34 नवीन
गुल्लू दादा, मार्कस, मदनबाण, विजूभाऊ, छौथा कोनाडा. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 07/10/2021 - 17:29 नवीन
जागु तै, माझ्या नांवाचा "छौथा" करण्याच्या आपल्या क्रियेटीव्हिटीचे कौतुक आहे !

😂

कृ ह घे हा .... हा .... हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Sat, 07/10/2021 - 17:56 नवीन
साॅरी हा. मी गडबडीत पाहिलच नाही. तुम्हीही हलके घ्या. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ग
गुल्लू दादा Fri, 07/09/2021 - 17:03 नवीन
आम्ही शिकाऊ मुलं सोबत राहतो. आमच्याकडे एक भांडे, एक चमचा मोठा आणि एक प्लेट आहे त्यावर झाकायची. बाकीचे मसाले आणि गरजेचे सामान आहे. तेव्हा कमीत कमी समान टाकून होणाऱ्या रेसिपीज तुमच्या चॅनेलवर स्वतंत्र playlist बनवावी. तुफान गाजेल ती. यावर नक्की विचार करा. आता रविवार येतोय जवळ शक्य असल्यास चिकनची रेसिपी टाका लवकर. या रविवारी माझा नं. आहे बनवायचा.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/09/2021 - 18:33 नवीन
नक्की प्रयत्न करु आम्ही. खुप छान चॅलेंजींग आहे हे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
श
शेखर Fri, 07/09/2021 - 18:48 नवीन
सबस्क्राईब केले आहे... शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/10/2021 - 16:54 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
स
सुक्या Fri, 07/09/2021 - 20:55 नवीन
जागुतै . . . ते तुमचे नाव "अन्नपुर्णा" ठेवता आले तर पहा :-) तुमचे धागे पाहिले की साक्षात अन्नपुर्णा येते समोर .. _/\_
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/10/2021 - 07:19 नवीन
पहिला इतकी मोठी काॅम्ल्पिमेंट दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्या रेसिपी मला येतात त्या मी सादर करत गेलेय बाकी विशेष काही नाही त्यात. आणि यापुढेही सादर करेन. थांबले यासाठी होते की मी आधी पिकासा वरुन फोटो अपलोड करायचे. पिकासा बंद झाला आणि माझे फोटोला अाधारीत सगळे लेखन इथे थांबले. जर इथे फोटो अपलोड करण्याचा दुसरा सोपा मार्ग असेल पिकासा सारखा तर प्लिज मला सांगा. नाव आता नाही बदलता येणार कारण अन्नपूर्णा नावाने दुसरे यू ट्युब चॅनेल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
स
सुक्या Sun, 07/11/2021 - 08:03 नवीन
खाली नावातकायआहे यांनी लिंक दिलीच आहे. मी स्वतः गुगल फोटो वापरुन ते अपलोड करतो. एकदा / दोनदा केले की जमुन जाईल. तुमच्या रेसेपी टाकत जा ... थांबु नका ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Sun, 07/11/2021 - 15:22 नवीन
नक्कीच. प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
न
नावातकायआहे Sat, 07/10/2021 - 09:14 नवीन
https://www.misalpav.com/node/48991
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/10/2021 - 16:55 नवीन
हे मला खुप उपयोगी पडेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
न
नावातकायआहे Sat, 07/10/2021 - 17:02 नवीन
कंजूस साहेबांचे आभार! मी फक्त लिंक डकवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ज
जागु Sat, 07/10/2021 - 17:56 नवीन
हो त्यांनाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/10/2021 - 11:47 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा...! आपल्या मिपावरील रेशीप्या एकापेक्षा एक आणि भन्नाटच आहे, कायम सरस राहील्या आहेत. मिपाच्या आजच्या पिढीला किती माहिती आहे ते माहिती नाही. पणआपल्या रेशीप्यांचा एक अपना खुद का मिजाज है, अपना एक नाम है. आपल्या रेशीप्या पाहिल्या की आम्ही वाचक हळवे होतो. मिपावर आपलं आजही तेच अढळ स्थान आहे, चंद्राचं, शुक्रता-याचं एक स्थान आहे, तसंच आपलं मिपावर कायम एक अढळ स्थान आहे......! मिपाला आपण कायम समृद्ध केलं आहे, तेव्हा दोन तीन वेगवेगळ्या मेल आयडींनी आपलं युट्यूब चायनल सब्स्क्राइब करीन. अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/10/2021 - 16:59 नवीन
डाॅ. दिलिप तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायल शब्द नाहीत. खुप खुप धन्यवाद. मिपाकरांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हे सगळे लेखन घडले. मिसळपावलाही खुप खुपधन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गुल्लू दादा Sat, 07/10/2021 - 20:11 नवीन
जागु यांनी तात्काळ मला काही रेसिपीज व्यनि केल्याने त्यांचे जाहीर आभार. कदाचीत मी त्यांचे काम वाढवले असेल पण चलता है बॉस. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sun, 07/11/2021 - 15:21 नवीन
पण तुमचे सजेशनही छानच आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा
ट
टर्मीनेटर Sun, 07/11/2021 - 09:17 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा... चविष्ट युट्युब चॅनलला नक्कीच भेट देणार आहे. तुमच्या मिपावरील पाककृती बघितल्या आणि आवडलेल्या असल्याने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करणे ओघाने आलेच 👍
  • Log in or register to post comments
ज
जागु Sun, 07/11/2021 - 15:19 नवीन
मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ज
जागु Sun, 07/11/2021 - 15:23 नवीन
नविन रेसिपी टाकली आहे. https://youtu.be/e4t_Z4N0lhw
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/12/2021 - 07:38 नवीन
चॅनलला सब्स्क्राईब केलं आहे; पारंपरिक पाककृतींना प्राधान्य मिळालेलं पाहून बरं वाटलं. मिपावर व अन्यत्र आलेल्या जागुतैंच्या पाककृतींप्रमाणेच चॅनलवरीलही आगामी पाकृही उत्तम असणार यात शंकाच नाही - अशाच नवनवीन पाकृंच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 07/13/2021 - 19:37 नवीन
धन्यवाद नंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ज
जागु Tue, 07/13/2021 - 19:37 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 07/13/2021 - 19:37 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 07/13/2021 - 19:38 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 07/13/2021 - 19:38 नवीन
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 07/14/2021 - 03:14 नवीन
सबस्क्राइब्, लाइक्, शेअर्, कॉमेंट् केले आहे. पाकृ सादरीकरण आवडले. एक जनरल् सल्ला - शक्यतो विडिऔ दोन-तीन मिनिटांचाच करावा, खूप मोठा नको.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/14/2021 - 09:33 नवीन
छोट्या व्हिडीओज ना युट्युब आणि गूगल अ‍ॅड्सेन्स च्या मोनोटायझेशन चा फायदा घेता येत नाही. व्हिडीओ किमान १० मिनिटांचा असेल तरच त्यावर जाहीराती दाखवल्या जातात अन त्या मार्गे क्रियेटर्स ना उत्पन्नाचा सोर्स निर्माण होऊ शकतो. अर्थात हे केवळ माझ्या ऐकीव माहीतीवरुन लिहिले आहे. मिपावर कोणी सक्रिय युट्युबर असल्याने सोशल मिडीया मोनोटायझेशन वर स्वतंत्र पणे लिहावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ग
गॉडजिला Wed, 07/14/2021 - 18:31 नवीन
तरीच बरेच युट्यूबर्स पाल्हाळ लावूंन माहिती देत असतात... प्रत्यक्ष माहिती मोठी आहे म्हणून जास्त लांबीचा व्हिडीओ बनला असे फार क्वचित होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
जागु Wed, 07/14/2021 - 10:46 नवीन
ओह. वर माझ्याच पोस्ट तीनदा पडल्यात हे आत्ता पाहिल. वामन युट्युब पहाणारे काही जणांना छोटे व्हिडिओ आवडतात तर काहिंना अगदी डिटेल माहिती असणारे मोठे. आम्ही दोघांधला
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 07/14/2021 - 10:48 नवीन
दोघांमधला समन्वय साधण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. मार्कस सध्या तरी हौसेखातर चालू केला आहे चॅनेल. बाकी नियम वगरे अजून अभ्यासायचे आहेत. पण कोणी माहीती दिली तर नक्की उपयोग होईल त्याचा.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/16/2021 - 21:32 नवीन
दोन नविन रेसपी टाकल्या आहेत. अळूचे फतफते - https://youtu.be/alw-YwQxFAA आगरी पद्धतीचे मटण - https://youtu.be/4fo1cQz6Woc
  • Log in or register to post comments
स
सुमो Sat, 07/17/2021 - 07:21 नवीन
मिपावर आणि इतरत्र तुमच्या रेसिपीज वाचल्या आहेत. मत्स्याहारी चाळीस एक रेसिपीजची मालिका केवळ अप्रतिम आहे. अलिकडे तुमचे लेखन कमी झालंय.पण नवीन प्रांतात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. चॅनल सबस्क्राईब केलंय हे.वे.सां.न.ल
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 07/17/2021 - 14:57 नवीन
धन्यवाद सुमो. नविन लेखनही येईल लवकरच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा