Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिची वारी

B
Bhakti
Tue, 07/20/2021 - 10:03
💬 7 प्रतिसाद
मानसीची बदली होऊन ती नवीन गावी आली होती.ऑफिसचा पहिला दिवस होता.शाखाधिकारी कडून काम समजून घेऊन मानसी लगबगीने तिच्या केबिनमध्ये शिरली.प्रसन्न दरवळ खोलीभर पसरला होता.समोर मोगऱ्याची फुले एका फुलदाणीत सजवली होती.हळू हळू मानसी कामात व्यस्त होऊ लागली. तोच आवाज आला “चहा की कॉफी?काय आणू madam?” मानसीने समोर पाहिले .तीस वयोगटातील एक सामान्य अंगकाठीची, गुलाबी गणवेशाची साडी नेसलेली,कपाळावर मोठी टिकली ,गळ्यात तुळशीची माळ घातलेली सावळी मुलगी उभी होती. ”चहाच चालेल,पण तुमच नाव?”मानसीने प्रश्न केला. “नंदा ,मला सगळे नंदा मावशीच म्हणतात इथे.आता आणते चहा” असे म्हणून नंदा बाहेर गेली. नंदा तिथली मदतनीस होती.चुणचुणीत हसरी.मानसीच्या टेबलवर रोज वेगवेगळी सुंदर फुले नंदाच मांडायची.मानसी आणि नंदाची ओळख वाढली.तेव्हा या हसर्या नंदा मागच मोठ दुख: ऐकून मानसीला धक्काच बसला. नंदा सांगत होती, “माझ्या घरी पाच बहिणी ,मी सगळ्यात लहान होती.माझी आई गेली आणि त्याणे आम्हांला सावत्र आई आणली.तोपर्यत माझ्या बहिणींची लागणे झाली होती.माझ्या सावत्र आईने पैशासाठी माझ लग्न सोळाव्या वर्षीच एका विधुर आणि पन्नाशीतल्या माणसाशी लावल.खूप दारू प्यायचा ,मारायचा.माझ्या पदरी पाच वर्षाचा पोर सोडून दारूने त्याचा घात केला आणि तो अपघातात गेला.इथे पाच वर्षापासून इथे कंत्राटी पद्धतीणे काम करतेय.मुलगा शाळा शिकतोय ..असच पांडूरंगाच्या कृपेने होईल सगळ चांगल ,पण एकदा त्याच्या पायावर डोक ठेऊन गार्हाण मांडायचं आहे बघा ....पायी वारी करून त्याच्या भेट घ्यायची आहे.” नंदाला वारकरी सांप्रदायाची आवड होती.एवढाशा कमी वयात अनेक सोसलेल्या जीवाला विठूनाम एक आधार होता.कीर्तन तिचा ध्यास होता. मानसीने ठरवलं की नंदाला वारीसाठी यंदा आपण मदत करायची. नंदा चहा घेऊन आली .मानसी म्हणाली. ”नंदा २४ तारखेला गावातली पालखी वारीला निघणार आहे.तुझ्यासाठी मी रेनकोट,चांगले शूज ,काही पैसे देतेय .तू यंदा वारी करायची आणि तुझ्या विठूला मोठे गार्हाण घालून यायचं बघ” नंदा म्हणाली “पण madam माझी सुट्टी ,इतक्या दिवस मला सुट्टी मिळे का?” “सुट्टी मंजूर” मानसीने अर्ज दाखवला. “madam तुम्ही एवढ करताय ,पण माझ्या मुलाला मी एकट्याला सोडून ...” नंदाच वाक्य मधेच खोडत मानसी म्हणाली “त्याची काळजी करु नको ,त्याला मी सांभाळेल” बास ..नंदाच स्वप्न....पंढरीची वारी पूर्ण होणार होती. ठरल्या दिवशी पालखी सोबत नंदा आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहमाया ठेवत गेली.तिच्या थकलेल्या जीवाला भक्ती रंग ,साज सगळ कस भारवलेल होत.विठूच्या पायी माथा ठेऊन ती पुन्हा आली. नंदा ऑफिसला आली तेव्हा मानसीने उठून तिचे पाय धरले. “madam हे काय करताय ?”  नंदा संकोचली. “वारकर्याच्या पायाची पंढरीची धूळ माथी लावतेय” मानसी म्हणाली. “नाही madam मी तुमच्या पायी पडायला हवे ,माझ स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झाल” नंदा खाली वाकणार तोच मानसीने तिला गळाभेट दिली . “माझ्या विठूदेवाच्या पायी माथा ठेवण्यासाठी जसा मला माणसातला देव भेटला तसा सगळ्यांना भेटो”.... तिच्या कानी भजन गुंजत होत ... “देव देव्हार्यात नाही ....” -भक्ती

प्रतिक्रिया द्या
3441 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ह
हेमंतकुमार Tue, 07/20/2021 - 10:31 नवीन
'भक्ती'मय कथा. छान.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 07/20/2021 - 18:27 नवीन
उलगडा होइलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
B
Bhakti Wed, 07/21/2021 - 04:21 नवीन
हा हा हो पण अर्धसत्यकथा आहे.नंदा मावशी खरी आहे. @जिला असे सगळे पत्ते खुले केले तर कसं होईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला गुरुवार, 07/22/2021 - 11:00 नवीन
पण मई सिर्फ व्यक्तिगत पातलीपे लोगोका दिमागी अभ्यास क्रेनु वास्ते लेख के बारेमे सोच्या तो पत्ता खुल्या हुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
ग
गॉडजिला Tue, 07/20/2021 - 10:34 नवीन
त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 07/20/2021 - 14:08 नवीन
भक्तीकडून भक्तीमय धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/22/2021 - 10:38 नवीन
भक्तीभावाने फ़ुललेली कथा पोहोचली. धन्यवाद. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा