Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

ए
एकुलता एक डॉन
गुरुवार, 08/12/2021 - 00:52
💬 72 प्रतिसाद
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे नमस्ते २००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते बरेच ,९९% बंद पडले त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ मनोगत मायबोली मिसळपाव इसाहित्य मराठीमाती ऐसी अक्षरे मागे वळून पाहताना बंद पडलेली मीमराठी भुंगा मराठीप्रेमी मराठीकिडे काय वाटेलते कृपया यात अधिक भर घालावी

प्रतिक्रिया द्या
29913 वाचन

💬 प्रतिसाद (72)
क
कंजूस Sat, 08/14/2021 - 13:23 नवीन
स्वप्रकाशन असलेली आणि। नसलेली. प्रतिसाद रिअल टाइममध्ये अपडेट होतो/ होत नाही. मे सगळी मजा जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Fri, 08/13/2021 - 18:28 नवीन
marathiliha.com marathibola.com असा देखील प्रयोग झाला होता. ही संकेतस्थळे प्रसिद्ध होण्याची प्रसिद्धी केली गेली नाही, पण एक संकेतस्थळ कसे ऑपरेट होते, मराठी लिहीण्यात काय अडचणी येतात, लोकांची मानसिकता कशी असते, लोकं का लिहीत नाही, संकेतस्थळ सुरू होण्याअधीच मानपान, अपमान, रुसवे, फुगवे याबाबत सगळा अभ्यास झाला. मराठी संस्थळ अन त्याच्या अनुषंगांच्या विषयांचा पद्धतशीर अभ्यास होवू शकतो इतका अभ्यास झाला. टेक्नॉलॉजी मध्ये आपण कोठे कमी पडतो, अन नक्की काय आवश्यकता असायला हवी याबाबतही काही मते ठाम झाली. सदर दोन्ही संकेतस्थळांमध्ये फोरमला आवश्यक असणारे अनेक नवी तंत्रे जोडली गेली होती. बरेचशी संस्थळे स्पर्धेतून तयार झाली, पण वरील दोन्ही संस्थळे हे एक प्रयोग म्हणून सिद्ध केले गेले होते. टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली. उपक्रम, मिपा, माबो, मीमराठी.नेट, लोकायत, मराठीलिहा.कॉम, मराठीबोला.कॉम, दर्जेदार.कॉम इत्यादी संस्थळाच्या जन्माच्या कहाण्या, विकास, लय, लोप इत्यादी प्रक्रिया अगदी जवळून अभ्यासता आली. अनेक जण आपले दिवसाचे अनुभवाचे लेखन म्हणजेच साहित्य आहे असा समज करून घेतल्याने अन लगेचच लाईक्स मिळणे या कारणामुळे फोरम्सला कालबाह्य समजू लागले आहेत. काळाच्या शरण जाणे वेगळे अन काळाला वश करणे वेगळे. मराठी लिहीणे वेगळे अन मराठी साहित्य लिहीणे अन ते प्रसारीत करणे या देखील भिन्न प्रक्रिया आहेत. एखादा विद्यार्थी या विषयावर पीएचडी करू शकेल इतका अभ्यास केला गेला तर यातून पुढे काही निष्पन्न निघेल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 08/14/2021 - 06:25 नवीन
याच संकेतस्थळावर दुसरीकडे जर्मनीच्या भिंतीबद्दल धागा आहे. त्याचा संदर्भ घेवून स्पष्ट लिहीतो आहे, राग नसावा. जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. याविषयी लेखकाने येथे सुरूवातीचा परिच्छेद टाकून, येथे त्रोटक लिहून पुढील लेख त्यांच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक खाजगी संस्थळावर जावेत. असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे. वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता. असल्या प्रकारांना संस्थळाच्या मॉडरेटर्सनी आळा घालायला हवा. हे एक उदाहरण झाले. कोणत्याही भाषीक लिहीणार्‍याची मानसिक स्थिती सारखीच असते. मानव सगळीकडे सारखाच आहे. वर लिहील्याप्रमाणे प्रत्येक संस्थळ, फोरम, ब्लॉग, सामाजिक माध्यमे यांचे काही फायदे तसेच तोटे असतात. वाचक अन लेखक त्या त्या संस्थळाला वर नेत असतो. पण लेखकाचा उद्देश संस्थळाच्या भुमिकेचा विचार करणे नसते. त्याचा उद्देश त्याचा लेख लिहून प्रसिद्धी मिळविणे हा असतो. असो. या अनुषंगाने लिहीण्यासारखे अनेक मुद्दे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
B
Bhakti Sat, 08/14/2021 - 09:33 नवीन
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
श
शानबा५१२ Sat, 08/14/2021 - 12:01 नवीन
आणि वरुन गुगल अ‍ॅड्स मिळत नाहीत मराठी ब्लॉगस्पॉटला तरीपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
त
तुषार काळभोर Sat, 08/14/2021 - 18:21 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
स
सतिश गावडे Sat, 08/14/2021 - 12:33 नवीन
टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली.
यशस्वी संस्थळ बंद करण्यामागे काय कारण असावे? खर्च?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ग
गॉडजिला Sat, 08/14/2021 - 18:25 नवीन
फक्त टेक्नोलॉजी काय असते याचा अभ्यास यशस्वी झाला असावा म्हणुन बंद केले असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 08/14/2021 - 19:19 नवीन
अरे हा टेक्नॉलॉजी म्हणत आहेत ते. POC केली असेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 08/14/2021 - 07:19 नवीन
याबाबत मला वाटते की 1. ज्या प्रकारे इथे तू तू मै मै चालते त्यामुळे बरेच जण नाउमेद होत असावेत. काही जण उगीचच स्पॅम करतात आणि मग काही जण त्याला रिप्लाय देतात. ते कधी तरी ठीक आहे, पण तेवढंच असणे इरिटेटिंग आहे. 2. मिपा चा फॉरमॅट ट्री स्ट्रक्चर पेक्षा sequential करता येईल का? एक दुसऱ्याला उगीचच प्रत्युत्तर देणे त्यामुळे कमी होईल. जे आपल्याला वाटते ते लिहिणे वेगळे. या पद्धतीने अनावश्यक प्रत्युत्तर कमी होण्यास मदत होईल आणि मोबाईल वरून वाचनीयता वाढेल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 08/14/2021 - 08:46 नवीन
@रावसाहेब, फोरम्स चा उद्देश खरे तर चर्चेसाठी आहे. अन मिपाचे किंवा मराठी संस्थळाचे बलस्थान चर्चा, रिप्लाय, प्रतिसाद, प्रतिवाद उपलेख आदी आहे. अन्यथा अशा संस्थळाला ब्लॉगचे स्वरूप प्राप्त होईल. बाकी तांत्रिक बदल करणे न करणे हे सर्वस्वी त्या त्या फॉर्मॅट्च्या अधीन असते.
  • Log in or register to post comments
भ
भागो Sun, 08/15/2021 - 10:07 नवीन
मराठी संस्थालामध्ये असे संस्थळ आहे का जे विज्ञानकथा,भयकथा, गूढकथा, विचित्रकथा अश्या प्रकारांना वाहिलेले आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/15/2021 - 16:55 नवीन
म्हणजे संध्यानंद. आजचे विनोदाचे पान विशेष सूचना - उद्या सुटी आहे.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Tue, 08/24/2021 - 12:44 नवीन
https://www.kolaj.in हे एक आहे लेख असतात. चर्चा असतात का कल्पना नाही
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/26/2021 - 14:15 नवीन
ही https://www.aksharnama.com/ सारखीच फिचर वेबसाईट आहे. मिपा / माबो सारखी धुडगुस कट्टा प्रकारची नाही चर्चा दिसत नाहियेत, लेखांच्या खाली प्रतिक्रिया द्यायची सोय आहे, अर्थात आजकाल अस्ल्या साईटीवर कुणी प्रतिक्रिया द्यायचे कष्ट घेत नाहीत. कोणे एके काळी दै सकाळच्या साईटवर खाली प्रतिक्रिया वाचायला धमाल याचची. मला तर वाटायचं वात्रट मिपाकरच इथं पण लिहित असतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
त
तुषार काळभोर गुरुवार, 08/26/2021 - 14:25 नवीन
ट्रोलिंगचा पहिला अवतार सकाळवरच दिसला होता. विशेषतः मुक्तपीठावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ग
गॉडजिला गुरुवार, 08/26/2021 - 22:57 नवीन
ओहोहो... रम्य त्या आठवणी... काय मॅजिकल पिरियड होता तो. ऑसम. काहीही करा कायद्याची भीती नाही एडमींनचा अनावश्यक बडगा नाही... फार थोर लोक तिथं येत असत मग हळुहळु त्याचे मुतपिठ होत गेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हस्तर Fri, 08/27/2021 - 05:36 नवीन
सो मि च्या उदयाआधी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
च
चौथा कोनाडा Fri, 08/27/2021 - 09:16 नवीन
मुक्तपीठ म्हंजे धमाल असायची ! तेथूनच "लुनावाले ब्रम्हे" जगप्रसिद्ध झाले ! ट्रोलींगचा कळस गाठला गेला होता !

😃

@हस्तर, हो... हे सो मि च्या प्रचलित व्ह्यायच्या आधी होतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ह
हस्तर Sat, 08/28/2021 - 14:47 नवीन
सो मि ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Mon, 08/30/2021 - 13:42 नवीन
सो(शल) मि(डिया) महान आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर
च
चौथा कोनाडा Mon, 08/30/2021 - 16:10 नवीन
ही एक नविन पाहण्यात आली. सर्वसाधारणच दिसते http://www.linkmarathi.com
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा