गोकुळ अष्टमी ..स्त्रीला भेटत राहतो कान्हा
कृष्णा ..सावळा..बासुरीवाला..राधेचा सखा..अगदी लहानपणापासून आपण याची अनेक रूपे पाहत मोठे होत आलो आहोत.मुलींना त्याच बासारीधारक रूप आवडतं.
लहान असताना कान्ह्याच्या रम्य नटखट गोष्टी ऐकल्या आहेत.अजूनही छोटा कान्हा माती खातो तेव्हा यशोदामय्या त्याला दरडावून तोंड उघडायला सांगते तिला विश्वरूप ब्रम्हांड दिसते आणि तिला भोवळ येते.हि गोष्ट फार फार आवडते. कालिया मर्दन ,सखे सवंगडी जमवत लोण्यावर मारलेला डल्ला,करंगळीवर तोललेला पर्वत असो बालपण या गोष्टींनी समृद्ध झाले आहे.
गोकुळ अष्टमीला शाळा लवकर सुटायची.घरी येऊन आजीला मातीचा गोकुळ बनवायला मदत करायची लगबग असायची.आजी खूप सुरेख गोकुळ बनवायची.चौरंगावर मातीने चार भिंती,प्रवेशद्वार तयार करायचा .मग चार भाग पाडत कृष्णाच्या आयुष्याचे चार वेगवेगळे प्रसंग मातीने बनवायचे.पहिल्या भागात बालपण जन्म,दुसऱ्या भागात बाळलीला त्याचे पराक्रम,तिसऱ्या चौथ्या भागात गोकुळचे प्रसंग मातीच्या वेगवेगळ्या मुर्त्या बनवायच्या.
छोटे छोटे प्रसंग मांडताना चिखलाने भरलेले हात .ज्वारीच्या दाण्याने त्याना सजवायचे.मग सहा वाजले की,पंजरी,खिरापत कधी हातावर पडतेय अस व्हायचं.
राधा होत दांडिया खेळ.रास धरत फिरत राहाण आजपण राधा बनण्याचा मोह आपण सोडू शकत नाही.
थोड मोठ झाल की कृष्णसखी समजायला लागते.”राधे कृष्ण” म्हणताना राधेचे नाव आधी का ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समजते.प्रेमाची तल्लीनता अनुभवायला मिळते.प्रेमात वाहून जाणे,रासक्रीडा सार सार काही आनंद देत. राधा कृष्ण हे नात अमर आहे.त्याची पवित्रता प्रेमाला चारचांद लावते.
आई झाल्यावर इतक्या दिवस न कळलेली यशोदा समजते.कृष्ण किती भाग्यवान आहे.वात्सल्याच्या दोन मूर्तिमंत “यशोदा-देवकी” माता त्याला लाभल्या.जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारी यशोदा आवडायला लागते.निरागस माया लावणे हेच आईपण आहे.आई होताना “कृष्णाचा फोटो रोज पाहत जा,असे हसरे बाळ होईल” म्हणून प्रत्येकीने नऊ महिने हा फोटो मनात जपला असतो.
या जगात कसे वागायचे,संकटांवर,कपटीपणावर कशी मात करायची.याचे न कळत संस्कार महाभारत आपल्या आणि येणाऱ्या पिढीला देत आला आहे.गीतेचे अध्याय आपल्या मुलांना शिकवताना आपणही पुन्हा घडत राहतो.
गोकुळकाल्याला मटकी फोडणाऱ्या साहसी मुली पाहिल्या की साहसाचे बाळकडू मुलींना देणे किती गरजेचे आहे याच भान येत.
असा कान्हा भेटतो आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रुपात,पूजन करीत राहुया.
“देवकी का पुत्र कान्हा
यशोदा घर सजाये
गिरिधर मुरली बजावे
सांज तटपर राधाको बुलावे
पुकारो मनसे तुम जब जब
पाप को मिटाने आये तब तब”
-भक्ती
गोकुळष्टामी २०२०.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Bhagavad Gita Chapter 2 (Full) | The Teaching In Brief | Sankhya Yogaरंग सावळा तव कांतीचा परि मुखी हास्य उजळले शतसूर्यांचे... सखा,प्रेमी,मुक्तीस्थान माझे इवलेसे तू घर... तुझ्या या सौंदर्याला मी शरणागत व्यापला कण कण ज्याने काळाच्या वाळूचा... -भक्ती (अनुवादित)