जे न देखे रवी...

जगण्याचे कित्येक मजला अर्थही कळाले

Primary tabs

धन्य भाग देवा ऐसे प्रेम ही मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले

वार्‍यावर उडणारा, मी केर, धूळ, माती
येता तू सांगाती दगडांचे झाले मोती.
परीस तो जाणू कैसा ,सांग काय केले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

गहिवरले मन माझे ,ओळखले नाही तुजला
र्‍हदयात काटा रुतला , माफी दे प्रेमा मजला
तालाच्या सोबतीला, बासरीचे सूर आले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे
डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे
पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

एक दिवा मंदीरात ,अंधार संपवून गेला
निरागस स्पर्ष तुझा, विश्वास जागवून गेला.
रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.
......चकोर शाह.
०१०९२०२१

राघव

चांगलं गीत आहे. थोडं मीटर अजून ठीक केलं तर आणिक बहरेल.
शेवटचे कडवे विशेष आवडले.

Bhakti

रंग एक मागता , इंद्रधनू मला मिळाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

क्या बात है विजूभौ, मस्त रचना.

आकाशी मेघ दाटे , पाणी हे डोळ्यावाटे
डोळे गहीरे हे सांगती , प्रेमाचे हे गूज मोठे
पावसाच्या सरींनी माळ हिरवे झाले
जगण्याचे कित्येक मजला अर्थ ही कळाले.

मस्तय...! कोणतंही प्रेम असे धडेच देता बघा.
एक लक्षात ठेवायचं. कोणी कोणाचं नसतं.

-दिलीप बिरुटे