जे न देखे रवी...
इम्पिरिकल डेटा
Primary tabs
आले कुटीस मेटा
सारे ओबीसी नेता
हा इम्पिरिकल डेटा
कुणी देता का हो डेटा
आरक्षणाचा रेटा
वकिलांना जा भेटा
इलेक्शन ती येता
बांधू कुणाचा फेटा
75 वर्षात भरल्या तुंबड्या
जनतेस मात्र कुबड्या
बाता त्या बड्या बड्या
कोर्टात पडल्या उघड्या
पाहिजे जरी आरक्षण
सीमेवर करा त्या रक्षण
सैन्यात जो दणादण
त्या कुटुंबास आरक्षण
येता नवीन ती पिढी
नका लावू ही शिडी
व्यसने दारू काडीबिडी
आयुष्य नाही सापशिडी
धमनीत लाल रक्त
सर्वांच्याच आहे फक्त
आला आता हा वक्त
फेकून कुबड्या व्हा मुक्त !
फेकून कुबड्या व्हा मुक्त !!
पण असे काही होत नसते, बळी तो कान पिळी हे सत्य आहे.
विनासायास मिळत असलेला आरक्षणाचा लोण्याचा गोळा कोणता बोका सोडेल?
पैजारबुवा,
बरोबर बोललात.
आरक्षणमुक्त मांडे मनातच राहणार,,छान मनातलं लिहीले आहे.
विनासायास मिळत असलेला आरक्षणाचा लोण्याचा गोळा कोणता बोका सोडेल?सहमत