Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण

च
चौथा कोनाडा
Mon, 09/06/2021 - 11:24
💬 72 प्रतिसाद
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला. PGA01 काही लोकांनी कागदी गणेशमुर्ती तयार करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव अश्या हाळ्या द्यायला सुरुवात केली. (एका पंथाने त्यांच्या अनुयायांकडून नामजपाच्या वह्या भरून घ्यायला सुरुवात केली आणि हाताने नामजप लिहिलेल्या वह्या परत जमा करून घेऊन त्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवून " हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव" असे सांगत अनुयायांना विकायला सुरुवात केली असे ऐकण्यात आले) या वर्षी पुण्याच्या हॅण्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने व्यापारी तत्वावर आशय मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणलेल्या आहेत. कागदी गणेशमुर्ती वजनाने हलक्या असल्यामुळे ९ इंचापेक्षा उंच मुर्ती घरगुती सजावटीत वापरता येतात त्यामुळे अश्या मुर्तीना ग्राहकांकडून पसंती मिळेल. कदाचित पुढे अशाच गणेशमुर्तीचा ट्रेण्ड येईल. कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा ९० % + माती १०% पासून बनवलेल्या) च्या विसर्जनासाठी "मुर्ती मोठ्या पात्रात पाणी घेऊन विसर्जित करा १०-१२ तासानंतर पात्रातील राहिलेला कागदी लगदा वाळवून जवळच्या रद्दी वाल्याला द्या जेणे करून पाणीप्रदूषण टाळलं जाईल"अश्या विल्हेवाटीच्या सूचना आहेत. यामुळे असं कुणी करत असेल असं वाटत नाही. कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच. PGA02 दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे. pga03 आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो. मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?

प्रतिक्रिया द्या
22956 वाचन

💬 प्रतिसाद (72)
प
प्रचेतस गुरुवार, 09/09/2021 - 05:43 नवीन
मूर्तीची स्थापनाच न करणे हा पर्याय कुणीच निवडलेला दिसत नाही :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/09/2021 - 15:05 नवीन
या न्यायाने पांढरेच कपडे घालायला हवेत किंवा चामड्याच्या चपला सुद्धा घालायला नकोत. कपड्याचा रंग किंवा चामड्याच्या उत्पादनात किती तर्हेची रसायने वापरली जातात आणि ती पाण्यात मिसळून किती प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते याचा विचार व्हावा. Leather industry is one of the most polluting industries. Environmental Problems Caused By Leather Processing Units. बाकी चामडं नैसर्गिक/ ऑरगॅनिक असतं इ इ पण चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/10/2021 - 07:08 नवीन
मूर्तीची स्थापनाच न करणे हा पर्याय कुणीच निवडलेला दिसत नाही :)
सुचना उत्तम आहे पण , मी अन्यत्र म्हणल्याप्रमाणे - आजचा हिंदु धर्म हा सनातन वैदिक धर्म , बौध्द धर्म आणि जैन धर्म ह्या ट्रिनिटीचे, ह्या तीन धर्मातील परंपरांचे कॉन्व्हेक्स काँबिनेशन आहे . मुळ सनातन धर्मात मुर्तीपुजाच नाही . खुद्द समर्थ म्हणाले आहेत -
"अरे जो जालाचि नाही | त्याची वार्ता पुससी काई | परंतु सांगो जेणे काही | संशय नुरे ||"
किंव्वा
"जयासी लटिका आळ आला | जो माया गौरी पासोनी जाला | जालाचि नाही तया अरुपाला | रूप कैचे || श्रीराम || "
मुळात शिव शक्ती असे द्वैतच नाही , ते एकच आहेत तर मग माया गौरी पासुन गणपतीचा जन्म झाला असे म्हणणेच लटिका आळ आहे , तो जालाच नाही , तो नित्यच आहे! मुर्ती स्थापन करणे , विसर्जन करणे ह्या सगळ्या गोष्टी जीवनमुक्ताच्या नजरेतुन पाहिल्यातर अगदीच निरर्थक आहेत ! तस्मात मुर्ती स्थापन च न करणे हे कोणताही पुर्णावस्थेतील सिध्दासाठी अगदीच स्विकारार्ह सुचना आहे ! (अवांतरः आमच्या गावी , घरी बाबा गणेशमुर्तीची स्थापना करत नाहीत. ) पण महावीरांनी सांगितलं - वस्त्रांचा त्याग करा , ह्या उपदेशाचे भौतिक जगात सर्वांनाच अनुकरण करणे शक्य आहे का ? म्हणुन मग पर्याय म्हणुन केवळ पांढरी वस्त्रे घालणे ! किंव्वा भगवान बुध्दांनी कुठेही सांगितले का की माझी उपासना करा ? केवळ सम्यक बुध्दीने मोक्ष प्राप्ती होते पण हे सगळ्यांना जमणारे आहे का ? म्हणुन मातीचे ढिगारे करणे अन त्याच्या भोवती प्रदक्षिणा वगैरे घालणे हे सारे सव्यापसव्य करावे लागतात. तसेच काहीसे हे देखील आहे .
"नातुडे मुख्य परमात्मा | म्हणोनी करावी लागे प्रतिमा | "
सगळेच धप्पकन नुसत्या चिंतनाने सिध्दावस्थेला प्राप्त होणे अशक्य आहे , साधना हवीच अन साधनेसाठी अनुष्ठान हवेच ! ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी खुप रसाळ शब्दात विवेचन केले आहे : देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥
म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥
तस्मात , जोवर शिवशक्तीशी आपली एकरुपता होत नाही तोवर गणेशाची स्थापना करुन चिंतनाने हळुहळु त्या स्थितीकडे जाणे हाच योग्य मार्ग आहे ! http://www.misalpav.com/node/28790 अशारीतीने मुर्ती स्थापन करायची गरजच नाही ह्या शंकेचे निराकरण झाले ! इत्यलम ! ||गणपती बप्पा मोरया||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गॉडजिला Fri, 09/10/2021 - 18:41 नवीन
कुणीच न निवडलेला पर्याय का निवडला गेला नाही हे सर्वांना उत्तम समजले. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Fri, 09/10/2021 - 18:44 नवीन
कोणाची शिवशक्तीशी एकरुपता झालेली नाही हे स्पश्ट होते हा भाग कितीही दुखद असला तरीही... आपण संतांचे म्हणने योग्यपणे लोकांपर्यंत पोचवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
प
प्रसाद गोडबोले Sat, 09/11/2021 - 18:50 नवीन
आपण गट क्रमांक २ मधील असुन शिवशक्ती ऐक्य वगैरे बाबींबर टिप्पण्णी करताय हीच आमच्यासाठी खुप मोठ्ठी आश्चर्याची अन कौतुकाची बाब आहे ! आपले ह्या इथले प्रतिसाद म्हणजे गट क्रमांक १ / २ मधील तळ्यात मळ्यात चाललंय की अन्यत्र तुम्हीच कबुल केले तशी लोणकढी थाप ह्या प्रश्नाचे मात्र उत्तर नाही . असो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
R
Rajesh188 Sat, 09/11/2021 - 20:56 नवीन
हिंदू धर्मीय श्री गणेश ह्या देवतेची मना पासून पूजा अर्चा करतात .आणि बाकी बुध्दी भेद करणाऱ्या नास्तिक,पुरोगामी,हिंदू विरोधी लोकांच्या matana कचऱ्याच्या पेटीत टाकतात. समीक्षा करायची असेल,धर्मावर चर्चा करायची असेल तर भारतातील सर्व महत्वाच्या धर्मावर झाली पाहिजे बौद्ध,हिंदू,मुस्लिम ह्या तिन्ही धर्माची समीक्षा झाली पाहिजे फक्त हिंदू धर्मावर चर्चा आणि बौध्द आणि मुस्लिम धर्म वर मात्र चर्चा नाही. हे कसे शक्य आहे हिंदू विरोधी मत बौध्द धर्मीय आणि मुस्लिम हेच व्यक्त करत असतात . ख्रिस्त धर्मीय खुलेआम टीका करत नाहीत . म्हणून त्या धर्माची समीक्षा नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Sun, 09/12/2021 - 14:07 नवीन
१ नंबरच्या भामटेगीरीवर करावी मग एखाद्याला कोणी गट क्रमांक एकचे वाटो अथवा गट क्रमांक दोनचे… अथवा तळ्यात मळ्यातले वाटो…राहीला प्रश्न इतर धर्मांचा तर त्यावर त्यांचे पाइक ना धागा काढतात ना प्रतिसाद लिहतात मग त्यावर चर्चा सुरु होणार तरी कशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गॉडजिला Sun, 09/12/2021 - 13:52 नवीन
१ नंबरच्या भामटेगीरीपासुन दुर राहणे या जगात शिवशक्ती ऐक्यापेक्शा महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sun, 09/12/2021 - 22:11 नवीन
आत्ता कसं एकदम साजेसं बोलात ! एकदम परफेक्ट २ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
स
सुबोध खरे Sun, 09/12/2021 - 19:49 नवीन
अशारीतीने मुर्ती स्थापन करायची गरजच नाही ह्या शंकेचे निराकरण झाले ! लहान मुलांच्या खोकल्यावर उपाय विचारला असता मूल होऊच न देणे हा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sun, 09/12/2021 - 22:10 नवीन
बेक्कर हसतोय =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौथा कोनाडा Wed, 09/15/2021 - 09:12 नवीन
मूल होऊच न देणे हा पर्याय सुचवल्याबद्दल धन्यवाद

😂

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
R
Rajesh188 गुरुवार, 09/09/2021 - 15:24 नवीन
मातीत न मिसळणारे आणि त्याचे नैसर्गिक रित्या विघटन लवकर न होणारे अनेक पदार्थ आहेत. ते सर्व वापरायचे नाही ठरवलं तर अवघड होईल. विषारी घटक मातीत,पाण्यात,हवेत मिसळू नये इतकीच काळजी घेतली की जीवसृष्टी ला काही धोकादायक नाही. आता जास्त मागे जाता येणार नाही. अगदी आदिमानव युगा पर्यंत आता जाता येणार नाही
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 09/10/2021 - 20:27 नवीन
गणेश मुर्ती मातीच्या असाव्यात असे माझे वैयक्तिक मत! आजच एका मित्राकडे मातीची ही सुंदर मुर्ती बघीतली. Image removed.
जर मातीच्या मुर्ती इतक्या सुंदर बनत असतील तर पी.ओ.पी किंवा कागदाच्या लगद्या पासुन बनवलेल्या मुर्त्या घ्यायची गरजच काय?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/11/2021 - 05:32 नवीन
व्वा, किती सुंदर मूर्ती! कलाकाराने चांगलंच कसब दाखवलंय. आमच्याकडे या वर्षी बहुतांश लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती स्थापना केलीय. स्वागतार्ह पाऊल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
स
सुक्या Sun, 09/12/2021 - 00:08 नवीन
मी तर कित्येक वर्षांपासुन कटाक्षाने फक्त शाडु ची मुर्तीच बसवतो. पी.ओ.पी ची मुर्ती कितीही सुंदर असली तरी नको. विसर्जन झाल्यावर (बादलीत) ती माती कुंडीत टाकुन झाड लावतो . . . त्या मातीवर पाय पडु नये इतकीच काळजी घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
च
चौथा कोनाडा Wed, 09/15/2021 - 09:17 नवीन
एकंदरीत इथं कुणी कागदी गणेशमुर्ती बसवलेली दिसत नाही ! कालच एका परिचितांकडे त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यास गेलो होतो. ते त्या पंथाचे होते ज्याच्या उल्लेख धाग्यात केला आहे. कागदी गणेशमुर्ती होती, १७-१७ इंची. मनपा हौदात विसर्जन करणार म्हणाले. आता मनपावाले कागदी लगदा कसा वेगळा करणार आणि रद्दीवाल्याला / कागद कारखान्याला देणार हाच प्रश्न आहे,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/25/2021 - 07:19 नवीन
Image removed. माझा मित्र निलेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोमय गणपती मूर्तीसाठी पुरस्कार मिळाला असून त्याची मुलाखत उद्या दाखवणार आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालयाने आयोजित पर्यावरण पूरक गणपती देखावा स्पर्धा आपल्या "ग्रामउदय ते राष्ट्रउदय " या पर्यावरण पूरक गणपती देखाव्याला राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार Zee २४ तास या न्युज चॅनलवर सकाळी ११.३०ला दाखविणार. नरेंद्र सोनावणे, निलेश राजाराम चिपाडे, सुरेंद्र सोनावणे व सतिश भांबरकर उपस्थित.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/02/2022 - 18:38 नवीन
माहितीसाठी धन्यवाद, भक्ती. लिंक असेल तर पोस्ट कराल प्लीज ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
B
Bhakti Mon, 01/03/2022 - 02:46 नवीन
https://youtu.be/NDkXsIu9NCM इथे इतर गणपती मूर्ती विषयीही माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 01/07/2022 - 08:14 नवीन
फारच छान केलेत या मंडळींनी ! अ ति श य अनुकरणीय ! हॅटस् ऑफ ! त्यांच्या मुर्तींचे सजावटींचे व्हिडिओ दाखवले असते तर दुधात साखरच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा