Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
१. ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
२. ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते.
=====================================================================
इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स
ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत.
१. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे
2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?
इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत
Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते.
=====================================================================
इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स
ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत.
१. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे
2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?
इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत
💬 प्रतिसाद
(62)
H
hrkorde
Fri, 10/01/2021 - 12:45
नवीन
आज लगेच 3500 प्लस झाले आहे एकच दिवसात.
ओम फट स्वाहा

- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 10/06/2021 - 05:05
नवीन
५५०० प्लस
- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 10/06/2021 - 07:14
नवीन
October 37000 short straddle 6000 रु प्रॉफिट मध्ये आले होते, पण मार्केट फारच वाढले आणि ते 3100 प्रॉफिटमध्ये काढले .
त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले.
सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series :
सप्टेंबर (36500) 6000
ऑक्टोबर ( 37000) 3100
ऑक्टोबर (38000) सुरू आहे.
- Log in or register to post comments
H
hrkorde
Wed, 10/06/2021 - 14:22
नवीन
मार्केट पडल्याने ब्यानी 2000 लॉस , निफ्टी 1000 रु लॉस मध्ये आहे.
पण short straddle मध्ये हेच तर तपासून बघायचे आहे. आपल्या ब्रेक इव्हनमध्येच मार्केट वरखाली होत राहिले तर नफा नुकसान कसे व कितपत होते ?
माझ्या मते , short straddle 1 तारखेला/ त्याच्या आधीच करावे व 15/20 तारखेच्या आत मोकळे करावे.
- Log in or register to post comments
H
hrkorde
गुरुवार, 10/07/2021 - 11:22
नवीन
मार्केट वर उठले
ब्या नि स्ट्रेडल 2000 प्लस
निफ्टी स्त्रदल 800 प्लस
पण निफ्टी स्ट्रेडल फारच वाकडेतिकडे वरखाली होते , समजत नाही
- Log in or register to post comments
H
hrkorde
Mon, 10/11/2021 - 07:08
नवीन
Off time मध्ये चेक केले तर पुढच्या महिन्यात बायर सेलर गॅप फार दिसतात
पण मार्केट चालू असताना नोव्हेम्बर 2021 चे ब्यांक निफ्टी ऑप्शन अगदी लिक्विड आहेत . 2,5 रुपयेच गॅप आहे , टोटल 2100 प्रीमियम
जी ललचाये रहा न जाये
निफ्टी स्ट्रेडल सकाळी 2000 रु नफ्यात होते , आता 600 रु नफा, फारच unpredictable आहे
मार्जिन जास्त गेले तरी ब्या नि च परवडते
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/12/2021 - 14:14
नवीन
धागालेखकाचा बाजार उठला.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 10/15/2021 - 18:06
नवीन
:-)))) पण त्यांनी शॉर्ट स्ट्रॅडलची पोजीशन कव्हर केली आहे ना?
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 10/15/2021 - 18:07
नवीन
बँकनिफ्टी ३९३४०!!!
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 10/15/2021 - 18:39
नवीन
आपण ईंट्राडे करुन ५० हजार रक्कमेवरुन महीन्याला काय दीवसाला २ ते ३ हजार सहज कमवु शकतात. ५० हजारावर ५ पट लेव्हरेज घ्या. कोणत्याही एकाच शेअरमध्ये ट्रेड करा, म्हणजे त्याचे लेवल्स समजतील. IBREALEST सारखा स्टॉक घ्या, १५४३ क्वान्टीटी असेल. ७० पैसे ते १ रुपया कींवा जास्त टारगेट ठेवा. १००० ते दीड हजार एकाच ट्रेड मध्ये येतील. प्रॅक्टीस झाल्यावर २ ते ३ ट्रेड करा. दीड लाख ऑप्शनमध्ये लावुन खुप खुप रीस्की खेळुन फक्त ६ हजार महीना?
चार्टईंन्क व तत्सम टुल्स वापरा. चांगले ट्रेड्स मिळतात.
मी १४ पट लेव्हरेज घेउन ईंट्राडे करायचो(कोटकचे सुपर मल्टीपल), आता फक्त ५ पट लेव्हरेज मिळते. लागोपाठ २६ ट्रेड्स जिंकलो आहे, फेसबुकवर ग्रुपमध्ये नोंद आहे. तुम्हाला एखादी रीस्क मॅनेज करायची ईंट्राडेची पध्दत स्विकारता आली तर लॉस नाहीच्या बरोबर असेल. अशी एक पध्द्त आहे, एव्हरेजिंग.
ह्या कोरोना फंद्यात ईतर काही कारणांमुळे कॅपीटल गमवुन बसलो, तेच ईंट्राडे करत राहीलो असतो, तर फुल टाईम फक्त ऑप्शन सेलिंग पर्यंत मजल गेली असती, जाईल कधितरी. सध्या फुल टाईम ईंट्राडे थोड्या प्रमाणात एन्जोय करतोय. आपणास सल्ला देतो तुम्हीही ईंट्राडे सुरु करा. व्यनिमधला तो मी नव्हेच असे समजा. :-)))))))) मला वाटले तो कोर्स म्हणजे जीव की प्राण असेल ऑप्शन्मध्ये ट्रेड करणा-यांसाठी.
माझी ईंट्राडेची पध्दत मी स्वःताच कधीच कुठेच बघितली नाही आहे व खुप लक्ष देउन ट्रेड केले तर फायदा सवय बनुन जाते, पण प्रॅक्टीस लागेल, व संकल्पना समजुन घ्याव्या लागतील. सध्या एका उच्चशिक्षित तरुणाला शिकवत आहे.
माझी जाहीरात नाही पण एक सल्ला आहे हा कींवा ईतर तत्सम कोर्स करुन ईंट्राडे सुरु करा.
https://sites.google.com/view/marketnotes (वेबसाईट बांधत आहे)
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 10/15/2021 - 18:43
नवीन
सुधारणा : दीवसाला कमीतकमी ७०० ते १००० नक्की येतील, चांगला ट्रेड मिळाला तर २ ते ५ हजार सहज शक्य आहे. प्रत्येक दीवस मार्केटमध्ये वेगळा असतो. ट्रेड योग्यवेली पुर्ण करने महत्वाचे. आणि मी कोणताच ईंडीकेटर शिकवत नाही. ग्राफचा अर्थ समजुन घेता येतो. आपला एक स्वःताचा ईंडीकेटर असेल, तो आपण स्वःता बनवु शकता, काही स्क्रीप्ट नाही.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 10/16/2021 - 08:04
नवीन
वाचतो आहे,
F&o आणी इन्ट्राडे कधीच केले नसल्याने बऱ्याच माहिती कळत नाहीयेत..
पण नक्कीच अभ्यास करून पुन्हा वाचेल..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2